11 family members write letter to president for wish death in madhya pradesh Dainik Gomantak
देश

एकाच कुटुंबातील 11 जणांची राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे इच्छा मरणाची मागणी

राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे इच्छा मरणाची, कारण वाचून व्हाल थक्क

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील 11 जणांनी इच्छामरणाची मागणी केली आहे. या संदर्भात कुटुंबीयांनी राष्ट्रपतींना उद्देशून पत्रही लिहिले आहे. हे प्रकरण ग्वाल्हेर जिल्ह्यातील घाटीगाव तालुक्यातील वीरबाली गावातील आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, त्यांच्या जमिनीवर कब्जा करायचा असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे.

जितेंद्र अग्रवाल आणि विजय काकवानी नावाच्या आरोपींनी त्यांचा छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हे लोक कुटुंबाची 1.2 बिघा जमीन (Land) जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पीडित कुटुंबाचा प्रमुख साबीर खान सांगतात की, सर्व्हे क्रमांक 1584 ही जमीन त्यांच्या नावावर आहे.

पण गुंड लोक आमच्या वडिलोपार्जित जमिनीवर कब्जा करून वसाहत उभारणार आहेत. त्यावरील भूखंड कापून हे लोक इतरांना विकण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना समजवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र उलट त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. वादग्रस्त जमिनीच्या सीमांकनासाठी दोन महिन्यांपूर्वी तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तरीही तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महसूल विभागावरही मिलीभगत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

जमीन हा उदरनिर्वाहासाठी एकमेव स्त्रोत आहे

त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हीच जमीन असल्याचे या कुटुंबाचे म्हणणे आहे. जमीन गेली तर कुटुंबातील सर्व सदस्यांना आत्महत्या (suicide) करण्यास भाग पाडले जाईल. यासोबतच या कुटुंबाने वसाहतधारक जितेंद्र अग्रवाल यांच्याकडे स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेची विनंती केली आहे. राष्ट्रपतींच्या (president) नावाने लिहिलेला त्यांचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय आणि एसपी कार्यालयाला देण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत एसपी अमित सांघी यांनी सांगितले की, सध्या तपास सुरू आहे. ही जमीन कोणाच्या नावावर आहे, याबाबत महसूल विभाग अधिकाऱ्यांना पत्र देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT