Uttarakhand Crime Dainik Gomantak
देश

100 शाळकरी मुलींचा विनयभंग; कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने टेलरचे घाणेरडे कृत्य!

Uttarakhand Crime: उत्तराखंडमध्ये 100 शाळकरी मुलींच्या विनयभंगाची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Uttarakhand Crime: उत्तराखंडमध्ये 100 शाळकरी मुलींच्या विनयभंगाची घटना समोर आली आहे. खटिमा येथील आदिवासींच्या निवासी शाळेत काम करणाऱ्या दोन टेलरविरुद्ध सुमारे 100 विद्यार्थिनींच्या कपड्यांचे माप घेताना त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खटिमाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) वीर सिंग यांनी सांगितले की, सोमवारी पालक संघटनेचे अध्यक्ष राजबीर सिंग राणा यांच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 354 (महिलेचा विनयभंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोन टेलर (शकील आणि मोहम्मद उमर) विरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुसरीकडे, ही निवासी शाळा उधम सिंह नगर जिल्ह्यातील खटिमा येथील आहे, जिथे 120 मुलींसह अनुसूचित जमाती (एसटी) समुदायाचे 250 विद्यार्थी शिक्षण घेतात. खटिमाचे एसडीएम रवींद्र बिश्त यांनी सांगितले की, दोन टेलरविरुद्ध सुमारे 100 विद्यार्थिनींच्या कपड्यांचे माप घेताना त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसपींनी पुढे सांगितले की, शाळेतील तीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा घाणेरडा प्रकार घडला, जे मूक प्रेक्षक होते.

एफआयआरमध्ये अशोक आर्य, ममता खोलिया आणि चंद्रशेखर या तीन कर्मचाऱ्यांवर विद्यार्थ्यांच्या मदतीला येण्याऐवजी त्यांची चेष्टा केल्याचा आरोप आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, अशोक आर्यने मुलींना सांगितले की, त्यांच्यावर बलात्कार झाला तरी काहीही होणार नाही. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी सांगितले की, हे तिन्ही कर्मचारी शाळेतील कंत्राटी कर्मचारी होते, ज्यांचा या घटनेनंतर करार संपुष्टात आला आहे. एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की, शाळेत अशा घटना यापूर्वीही घडल्या होत्या, परंतु शाळेतील कर्मचाऱ्यांनी मुलींना धमकी दिली होती की, त्यांनी कोणाला काही सांगितले तर त्यांना शाळेतून काढून टाकले जाईल. त्यामुळे आता शाळा प्रशासनाचीही चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT