Uttarakhand: पौड़ीच्या जंगलात वाघाचे भय! 3 दिवसात 2 जणांचा मृत्यू

Uttarakhand: गावकऱ्यांना रणवीर सिंह नेगी यांचे अर्धे खाल्लेले शरीर पाहायला मिळाले होते.
Tiger
TigerDainik Gomantak
Published on
Updated on

Uttarakhand: उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एकाच आठवड्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. वाघाने यावेळी एका 75 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला होता. यानंतर अधिकाऱ्यांनी 25 गावात रात्री कर्फ्यू लावला होता.

डीएम आशिष चौहान यांनी दिलेल्या माहीतीनुसार, 25 गावात रात्री 7 पासून सकाळी 6 पर्यत कर्फ्यू लावला होता. या परिसरातील सर्व शाळा आणि अंगणवाडी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

वन रेंजर महेंद्र सिंह रावत यांनी दिलेल्या माहीतीनुसार, गावकऱ्यांना रणवीर सिंह नेगी यांचे अर्धे खाल्लेले शरीर पाहायला मिळाले होते. रणवीर सिंह नेगी हा कॉर्बेट नॅशनल पार्कजवळ एकटाच राहत होता. शनिवारी त्याचे नातेवाईक त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु रणवीर सिंह नेगी यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

Tiger
Bhagalpur Station: रेल्वे स्थानकावरील LED स्क्रिनवर अचानक पॉर्न Video चालू, लोकांनी रेकॉर्डिंग...
  • झुडपात मिळाला मृतदेह

नातेवाईकांनी गावकऱ्यांबरोबर संपर्क साधून रणवीर सिंग नेगी यांच्याशी संपर्क होत नसून त्यांच्या घराकडे जाऊन त्यांच्याविषयी माहीती देण्यास सांगितले होते. गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचे अर्धा मृतदेह झाडीत सापडला आहे. तीन दिवसात घडणारी अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. याआधी 13 एप्रिलला अशी घटना घडली होती.

  • वाघाला आदमखोर घोषित करण्याची मागणी

वन रेंजर रावत म्हटले आहे की, ज्या लोकांना मारण्यात आले आहे, त्यांच्या परिवाराला 4 लाख रुपए देण्यात येणार आहेत. याबरोबरच, कोटद्वार आमदार दिलीप सिंह कुंवरने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे वाघाला आदमखोर म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

DR. Ram Manohar Lohia Journey:
Chamba Road Accident Himachal Pradesh Bolero Crash
Tiger Death In Goa 2026
Tiger Death Sakorda Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com