तामण Dainik Gomantak
ब्लॉग

वसंताच्या आगमनासोबतच तामण घेऊन येतो मुलायम, लवदार पालवी ...

दैनिक गोमन्तक

वसंतोत्सवामध्ये आणखी एका वृक्षाचे पुष्पवैभव पाहणे हा नयनरम्य सोहळा असतो. अत्यंत नाजूक, तलम, मुलायम फुले असणारा वृक्ष म्हणजे तामण होय. शिशिराच्या पानगळीनंतर वसंत ऋतुच्या आगमनासोबत तामणाला मुलायम, लवदार पालवी येऊ लागते. ही पालवी स्थिरावून पोपटी व्हायला लागली की मग पालवीच्या शेंड्यातून कळ्यांचे कोंब बाहेर येऊ लागतात. आणि चैत्राच्या सुरुवातीपासून ही फिकट गुलाबी, गुलाबसर जांभळी फुले, आपल्या अनोख्या रंगाचा आविष्कार आपल्यासमोर मांडू लागतात. हा पुष्पोत्सव अगदी जूनपर्यंत सुरू राहतो. आपल्याकडे आता तो सुरू झाला आहे.

तामणाच्या फुलांचे एक वैशिष्ट्य म्हणजे फुलातील विरोधी रंगसंगती. शांत, शीतल, प्रसन्न रंगाच्या नाजूक पाकळ्या, त्याच्या मध्यभागी विरुद्ध रंगाचे पिवळेधमक पण नाजूक पुंकेसर आपल्याला नक्कीच आकर्षित करतात. हातभार लांबीचे फुलोरे, खालून हळूहळू फुलत जाणारे असतात. त्यामुळेच त्याचा पुष्पसोहळा महिनाभर चालतो.

अस्सल भारतीय असणारा तामण, सह्याद्रीच्या कुशीत अनेक ठिकाणी आपल्याला नैसर्गिकरित्या वाढलेला दिसतो. मात्र चांगली जमीन मिळाली तो अधिक सुखावतो. त्याच्या आयुर्वेदिक गुणवैशिष्ट्यांशिवाय त्याच्या लावण्यगुणांमुळे आता तो भारतभर पसरला असून विदेशातील महत्त्वाच्या उद्यानामध्येही तो दिसतो. नव्याने उभारलेल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी आवर्जून लावलेला दिसतो.

तामणाला इंग्रजीमध्ये ‘प्राइड ऑफ इंडिया’, ‘क्वीन ऑफ फ्लावर्स’, ‘जॉईंट क्रेप मर्टल’ अशी छान नावे आहेत. महाराष्ट्राचे ते राज्यपुष्पही आहे. त्याची फॅमिली लिथ्रेसी असून वनस्पतीशास्त्रीय नाव ‘लॅगरस्ट्रोमिया रेगिनी’ आहे. ताळगावमधल्या रस्त्यावर, कलेक्टर ऑफिससमोरच्या उद्यानात आल्तिनोच्या रस्त्यावर तामण फुलत आहे. या फुलांचा आविष्कार जवळ जाऊन आवर्जून पहा.

- अनिल पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पणजीत मांडवी पुलावर पुन्हा अपघात, तिघेजण जखमी

Colva Crime: कोलव्‍यात पुन्हा राडा! पार्टीतील वादातून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण; अर्धमेल्‍या युवकाला बाणावलीत सोडले

हॉटेलमध्ये झाली मैत्री, लग्नाचे आमिष देऊन केला लैंगिक अत्याचार; गोव्याच्या तरुणाला छत्तीसगड येथे अटक

Goa Dairy: ..अन्यथा संप पुकारु! थकीत महागाई भत्त्यासोबत इतर मागण्यांवरुन 'गोवा डेअरी’च्या कामगारांचा इशारा

Cutbona Jetty: 'मतदारसंघात आम्हालाच बोलावले जात नाही!' कुटबणबाबत क्रुझ सिल्वांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT