Wild vegetables  Dainik Gomantak
ब्लॉग

Wild vegetables : रानभाज्या ओळखायला शिका

उन्हाळ्याच्या काळात घरात फोडलेल्या फणसाचे गरे खाऊन झाल्यावर चाणाक्ष गृहिणीने साठवून ठेवलेल्या फणसाच्या आठळ्या (फणसाच्या बिया) आता बाहेर निघतील

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे -नायक

पावसाने आपली किमया दाखवायला सुरुवात केली असून ही किमया आता रानभाज्यांच्या रूपाने आपल्या ताटापर्यंत पोहचणार.

वर्षातल्या याच दिवसात वेगवेगळ्या रानभाज्या खायला मिळतात. यातली प्रत्येक भाजी आपले वेगळेपण घेऊन येते. त्यामुळे या भाज्यांना एक वेगळंच महत्व आहे. या भाज्यांची मूळ चव किंचितही कमी होऊ न देता, उगाचंच मसाल्यांचा मारा न करता, सर्वात महत्वाचं यातील काही भाज्या एक थेंब तेलाचा वापर न करता केल्या जातात आणि तरीही अतिशय चविष्ट लागतात हेच यांचं वैशिष्ट्य. हा काळ मुद्दाम भाजी मंडईत चक्कर मारावी असाच असतो.

पुण्या-मुंबईमध्ये सहजपणे बघायला मिळणार नाहीत अशा अनेक स्थानिक अपरिचित भाज्यांनी इथली मंडई फुलून जाते. पावसाळा सुरु होताच गोव्यातल्या स्वयंपाकघरांना वेध लागतात ते या काळात मिळणाऱ्या भाज्यांचे. केवळ पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्या खाण्यासाठी घरातले अनेकजण आतुरतात. तायखिळा, आकूर, अळू, तेरे, फागला, फोडशी, पिडूशी, कील्ल, कुडूक आणि गोव्यातली खास 'अळमी' म्हणजेच नैसर्गिकरीत्या उगवलेले मशरुम्स. या काही भाज्या आहेत ज्या फक्त पावसाळ्यातच उगवतात.

पाऊस सुरु होतो आणि याच काळात खोल समुद्रात केली जाणारी मासेमारी दोन महिन्यांसाठी बंद होते. मासळी बाजारात मोठी मासळी नसली तरी अगदी छोटी छोटी अतिशय रुचकर लागणारी मासळी या काळात मिळते.

पण अनेकजण याकाळात सात्विक आहार घेणं पसंत करतात. मासळीची कसर या पावसाळी भाज्या भरून काढत नसल्या तरी पुढे वर्षभर ताटात मासळी असतेच म्हणूनच कदाचित पाहुण्या बनून आलेल्या आणि थोडा काळ सोबत करणाऱ्या पावसाळी हिरव्यागार रानभाज्या ताटात आपली हक्काची जागा तयार करतात. रानभाजी आणि फणसाच्या आठळ्या

उन्हाळाच्या काळात घरात फोडलेल्या फणसाचे गरे खाऊन झाल्यावर चाणाक्ष गृहिणीने साठवून ठेवलेल्या फणसाच्या आठळ्या (फणसाच्या बिया) आता बाहेर निघतील. रानभाज्यांना या फणसाच्या बियांशिवाय चव नाही. मग ती तायखिळा असो की कुडुकीची भाजी असो. यात फणसाच्या बिया हव्याच.

भाजी खाताना दाताखाली येणारे फणसाच्या बियांचे तुकडे काय छान लागतात. परत वर्षभर या रानभाज्या खायला मिळत नाही कि या फणसाच्या बिया देखील एवढ्या चवीनं खाल्ल्या जात नाही. फणसाच्या बिया वर्षभर टिकवण्याची खोतीगावातल्या महिलांकडे मी एक वेगळीच युक्ती बघितली. या साऱ्याजणी फणसाच्या बियांना अंगणातली माती लावून ठेवतात. यामुळे वर्षभर त्या व्यवस्थित राहतात. जेव्हा केव्हा भाजी करायचीय तेव्हा माती लावलेल्या आठळ्या धुवून घ्यायच्या आणि भाजीत घालायच्या. बायकांकडे अशा कितीतरी वेगळ्या युक्त्या असतात ज्या त्यांच्या अनुभवातून आलेल्या असतात.

या दिवसात बाजारात रानभाज्या दिसतातच पण अनेकजणांना बघितलं आहे जे खरोखर स्वतः माळरानात जाऊन रानभाज्या काढून आणतात. यात फक्त तुम्हाला रानभाजी ओळखता आली पाहिजे. गोवा विद्यापीठाच्या परिसरात पावसाळ्याच्या काळात अनेक रानभाज्या उगवतात. आमच्याकडे घरकामाला येणाऱ्या ताई याच परिसरातून बऱ्याच रानभाज्या घेऊन यायच्या आणि आम्हाला भाजी बनवून द्यायच्या.

विद्यापीठ रस्त्याने जाताना मी प्रत्येक दिसणाऱ्या झाडपाल्याकडे ही रानभाजी तर नसेल ना अशा शंकेतून बघत असते. पण खरंच या भाज्या ओळखण्याचं थोडंसं ज्ञान असायला हवं. दरवर्षी पावसाळा आला कि हा विचार मनात येतो. यावर्षी मात्र मी हे फार मनावर घेतलं आहे. यावर्षी रानभाजी ओळखण्याचा एक प्रयोग करायचा विचार आहे.

खोतीगावातील महिला ''रानभाजी'' बद्दल माहिती देतील आणि ती भाजी कशी बनवायची याचं प्रात्यक्षिक देखील दाखवतील. गोमन्तक ''तनिष्का व्यासपीठ''च्या माध्यमातून आम्ही हा प्रयोग लवकरच करणार आहोत. लवकरच याबाबतची घोषणा आम्ही गोमन्तकमध्ये करू. यात तुम्ही देखील सहभागी हाऊ शकता. आम्ही दरवर्षी रानभाजी महोत्सव साजरा करतोच. पण यावर्षी त्या कशा बनवायच्या हे खुद्द रानात राहणाऱ्या महिलांकडून शिकू या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Exam: आधारकार्ड तपासले आणि सापडले बोगस परीक्षार्थी! NIO परीक्षेत ‘डमी’ उमेदवार; दोघांना अटक

NFF Meeting: पाक, श्रीलंकन तुरुंगातील मच्छिमारांना सोडवा! ‘एनएफएफ’ची मागणी; 6 किनारी राज्यांशी चर्चेअंती विविध ठराव

Chorla Ghat Accident: ..चालकाने मारली उडी, ट्रक गेला दरीत! चोर्ला घाटात दाट धुके, दरड कोसळल्याने दुर्घटना; लाखोंचे नुकसान

Sunburn Dhargalim: धारगळवासीयांचा ‘सनबर्न’ला विरोध, सुनावणीला मात्र गैरहजर; न्यायालयाकडून याचिका निकाली

Goa Politics: ..हा तर लोकशाहीचा खून! विधानसभा रणनीतीच्या बैठकीच्या जागी सभापती तवडकर; विरोधकांचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT