Hospital Dainik Gomantak
ब्लॉग

Margao: मडगावचे ख्रिस्ती हॉस्पिटल

मडगाव येथील हे रुग्णालय जेझुइट बंधू चालवत असत

गोमन्तक डिजिटल टीम

वाल्मिकी फालेरो

मडगाव येथे १५६४/६५मध्ये (वर्षाचा अनेकदा चुकीचा उल्लेख १५७४ असा केला जातो. १५७१च्या विजापुरी हल्ल्यात चर्च, कॉलेजिओ आणि त्याच्याशी संलग्न प्राथमिक शाळा जाळण्यात आली. यावरून हे सिद्ध होते की १५७१पूर्वी कॉलेजिओ अस्तित्वात होते.

कॉलेजिओ खरोखरच १५६८ पूर्वी अस्तित्वात होता हे जेसुइट फादरच्या पत्रावरून सिद्ध होते. जॉर्ज कॅल्डेरा यांनी ११ नोव्हेंबर १५७४ रोजी लिहिले की हॉस्पिटल डो एस्पिरिटो सँटो १५६८मध्ये मडगाव येथे हलविण्यात आले आणि ते कॉलेजिओच्या शेजारी आहे.) कॉलेजिओ दे तोदोस उश सांतोस म्हणून सुरू झालेल्या आजच्या राशोल सेमिनरीचे भविष्य काय आहे, माहीत नाही.

दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपपासून सुदूर पूर्वेतील जपानपर्यंत पसरलेल्या संपूर्ण जेझुइट प्रांतांमधून भारतातले हे चौथे महाविद्यालय होते व ज्याचे मुख्यालय गोव्यात होते. भारतातील जुनी तीन महाविद्यालये जुने गोवे, कोचीन आणि वसई येथे होते.

(१५७६ मध्ये मलाक्का येथे पाचवे कॉलेजिओ प्रस्तावित करण्यात आले होते. ते त्या शहराच्या एका प्राचीन स्थळी बांधण्यात आले होते आणि १५७९च्या जे खुले झाले होते. १६४१ मध्ये मलाक्काच्या पतनानंतर, डच गव्हर्नरने कॉलेजिओचा राजवाडा म्हणून वापर केला.)

कॉलेजिओ दे तोदोस उश सांतोस हे चर्चच्या पूर्वेला थोड्या अंतरावर होते. कोलेजिओ ज्या जमिनीवर बांधले गेले त्याचा काही भाग मडगावच्या गावकरांनी भेट म्हणून द्यायचा होता तर शेजारचा भाग जेझुइट्स पेरो गोंसाल्व्हिस आणि पिलिकू आणि माको या गावातील ताडी-टॅपर बंधूंकडून विकत घ्यायचा होता.

तथापि, पाउलो डी सिल्वा, बॅस्टियाओ डी ब्रागांझा आणि आंतोनियो डी नोरोन्हा (नाईक) यांच्याशी खरेदी करावयाच्या जमिनीवर काही वाद होता. तसे, पे यांच्या लेखी विनंतीवरून तोमास इस्तेवाव (फादर थॉमस स्टीफन्स), कॉलेजिओचे रेक्टर, सासष्टीचे कॅप्टन, क्रिस्टोवांव दा तौरा (तावोरा), यांनी कॉलेजिओला जमिनीच्या हस्तांतरणाचे प्रमाणीकरण आणि नोंदणीकरण करण्याचे आदेश दिले.

६ डिसेंबर १५७६ रोजी, राशोल किल्ल्याचा कॅप्टन दामियांव दी सौसा, मंदिराच्या जमिनीचा खजिनदार लुईस डी’ओर्ता आणि कारकून जुआंव गोम्स डी’आंद्राद, मडगाव येथील महाविद्यालयीन आवारात आले, जिथे त्यांच्यासोबत मोर्तू शणै, लिपिक सामील झाले.

गावकरी आणि तालुक्याचे नोटरी फाल्काओ गोंसालो रोइझ यांनी डीड नोंदवली. विकार आंतोनियो दा कोस्ता, मडगावचे गावकर आणि तीन खाजगी जमीन मालक उपस्थित. चौकशी केली असता, जमलेल्या गावकरांनी सांगितले की, कॉलेजिओ ज्या जमिनीवर उभे होते ती जमीन एका बाजूला लोहारांनी, दुसऱ्या बाजूला रस्त्याने आणि मोचींनी तर दुसरीकडे गावकरांच्या घरांच्या बाजूने रस्ता असलेली होती.

(ज्या ठिकाणी लोहारांची घरे होती ते ठिकाण अलीकडच्या काळापर्यंत ‘कामरां वाडो’ (लोहारांचा वाडा) म्हणून ओळखले जात होते. यांपैकी बहुतेक लोक निपुण संगीतकार, लाकूड आणि दगडी कारागीर बनले. बार्बोसा घर (चर्च स्क्वेअरमधील क्रमांक १२) आणि त्याच्या पूर्वेला आजूबाजूची काही घरे जिथे आहेत तिथे मोची राहत असत.

एका ओळीत असलेली गावकरांची घरे बहुधा बार्रेतो हाउस (चर्च स्क्वेअरमधील क्रमांक ३०) या जागी असावीत. चौथ्या बाजूला चर्चची जमीन होती.) कॉलेजिओची अर्धी जमीन गावकरांची होती आणि ती त्यांनी कॉलेजिओला कोणत्याही बंधनाशिवाय किंवा अटींशिवाय भेट म्हणून दिली होती आणि उरलेली अर्धी जमीन पेरो गोन्साल्विस आणि पिलिकू आणि माचोची होती जी त्यांनी विकली. दोन परदोस खजिनदार लुईस डी’ओर्ता यांनी मंदिराच्या जमिनीच्या महसूलातून अदा केले होते.

जुने गोवे येथील सेंट पॉलशी संलग्न असलेल्या कोलेजिओ दा सांता फे येथून अध्यापन साहित्य आणण्यात आले. मडगाव कॉलेजिओमध्ये पोर्तुगीज आणि लॅटिन भाषा, इतिहास, गणित, नैसर्गिक विज्ञान, न्यायशास्त्र, संगीत, अगदी पर्यायी तत्वज्ञान आणि पंथशास्त्र शिकवले जात असे.

त्या काळातील इतर विद्यालयांप्रमाणे हे एक हायस्कूल होते जे सर्वांना सामान्य शिक्षण आणि याजक व्हायची इच्छा बाळगणाऱ्यांना ख्रिस्तपंथी सूचना देत होते.

महाविद्यालयाचे नंतर कोलेजिओ दा एस्पिरितो सांतो असे नामकरण करण्यात आले, जरी ते सामान्यतः कोलेजिओ दा मडगाव किंवा ‘कोलेजिओ दा साल्सेत’ म्हणून ओळखले जात असे. प्राथमिक स्तरावरील वर्ग नंतर जोडले गेले.

कोलेजिओ दा एस्पिरितो सांतोच्या पुढे हॉस्पिटल होते. १५५१ मध्ये जुने गोवे येथे कोलेजिओ दा सांता पावलोच्या फादर पावलो कामेर्त यांनी १०० खाटांचे हॉस्पिटल निर्माण केले ज्यात एक कपेलही होते. हे हॉस्पिटल १५६४पूर्वी राशोल येथे हलविण्यात आले होते.

१५६८ मध्ये हे हॉस्पिटल मडगाव येथे हलविण्यात आले आणि हॉस्पिटलचे नामकरण एस्पिरितो सांतो असे करण्यात आले, असे ११ नोव्हेंबर १५७४ रोजी फादर जॉर्ज कार्देला यांनी त्यांच्या युरोपमधील जेझुइट्स मित्रांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. असे असले तरीही जनमानसात हे हॉस्पिटल, ‘हॉस्पिटल दा पाद्रे पाउलो कार्मेत’ या नावानेच प्रसिद्ध होते.

महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी लागणाऱ्या निधीचा मोठा भाग शाही खजान्यातून येत असे. १५६९च्या राजा सेबॅस्टिओच्या आदेशाने सासष्टीे, तिसवाडी आणि बार्देश येथील पाडलेल्या मंदिरांच्या जागेच्या भाड्यातून काही भाग सासष्टी हॉस्पिटलला दिला गेला.

किंग-कार्डिनल हेन्रिकने १५७९/८०मध्ये या अनुदानाची पुष्टी केली. जेझुइट्सनी सासष्टीत मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केली किंवा भेट म्हणून मिळविली व त्यांच्या भाड्यातून कॉलेजिओला आणि हॉस्पिटलला निधी पुरवला. ही मालमत्ता मडगावसह राय, लोटली, कुडतरी, मुरगाव, बेतालभाटी, वेळ्ळी, कुठ्ठाळी आणि अनेक ठिकाणी होती.

मडगाव येथील हे रुग्णालय जेझुइट बंधू चालवत असत. त्यांपैकी पेद्रो अफोंसो हा एक निपुण शल्यविशारद, तर लाझारो रिबेरो यांना औषधांचे उत्तम ज्ञान होते.

त्यामुळे, या हॉस्पिटलने केवळ सासष्टीतच नव्हे तर विजापूर प्रदेशातील रुग्णांनाही आकर्षित केले. ख्रिश्चन तसेच हिंदूंना चांगले स्वागत आणि वागणूक मिळत असे. त्यामुळे, ख्रिस्तीकरणातही या हॉस्पिटलचे मोठे योगदान होते.

१५७१मध्ये विजापुरी हल्ल्यात संलग्न असलेल्या प्राथमिक शाळा आणि चर्चसह कॉलेजिओ जळून खाक झाले. हॉस्पिटल मात्र वाचले, कारण तेथील उत्कृष्ट डॉक्टर जखमी विजापुरी सैनिकांवर उपचार करत होते! त्याच वर्षी चर्चची पुनर्बांधणी केली जात असताना, कॉलेजिओसह इतर जळलेल्या संरचनांची पुनर्बांधणी करण्यात आली आणि १७ मे १५७४ रोजी त्या पुन्हा खुल्या करण्यात आल्या.

चर्चच्या मागे असलेल्या नवीन संकुलात आता ख्रिश्चन पंथाची शिकवण देणारी एक शाळा होती. ज्यात पांथिक माहितीसोबत नव्याने आलेल्या युरोपियन जेझुइट्ससाठी कोकणी शिकवली जात असे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT