कामेच्छा आणि धर्म

लैंगिक क्रियेचा आनंद माणूस फक्त शारीरिक पातळीवरून घेत नाही, तर भावनिकदृष्ट्याही तो त्यामध्ये गुंतत जातो.
libido
libidoDainik Gomantak
Published on
Updated on

प्रसन्न शिवराम बर्वे

गेल्या लेखात आपण काम या विषयावर थोडा विचार केला. काम हा शब्द ‘सेक्स’ किंवा मैथुन या अर्थानेही त्याचा विचार, अगदी थोडा असला तरीही पुरुषार्थ चतुष्टयात येतो. आहार, निद्रा, भय आणि मैथुन ही चार लक्षणे जशी इतर प्राण्यांत असतात तशी मनुष्यप्राण्यातही ती आहेत.

मनुष्याला विचार करण्याची, व्यक्त होण्याची अतिरिक्त क्षमता निसर्गाने देऊनही माणूस आज इतर प्राण्यांपेक्षा ‘मैथुना’मध्ये अत्यंत हिणकस पातळीवर पोहोचला आहे.

लैंगिक आकर्षण, कामेच्छा ही सहजसुलभ व नैसर्गिक भावना आहे, याबद्दल दुमत नाही. पण, याचा अर्थ ती कशीही व कुठेही व्यक्त करावी असा होत नाही. भावना नैसर्गिक असणे, हा ती व्यक्त करण्याचा परवाना ठरत नाही.

माणूस वगळता इतर प्राण्यांमधील नर-मादी फक्त विणीच्या हंगामापुरते एकत्र येतात. माणसाचे तसे नसते. वयात येणे आणि लैंगिक आकर्षण उत्पन्न होणे सोबतच घडते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लैंगिक क्रियेशी असलेले भावनिक नाते.

लैंगिक क्रियेचा आनंद माणूस फक्त शारीरिक पातळीवरून घेत नाही, तर भावनिकदृष्ट्याही तो त्यामध्ये गुंतत जातो. यातून प्रत्येक वयात वेगवेगळ्या समस्या उभ्या राहतात. त्या त्या वयोगटाला, मानसिक प्रगल्भतेप्रमाणे लैंगिक इच्छेला नियंत्रित करावे लागते.

फारच स्पष्ट लिहिता येणे तसे अवघड आहे, पण माझ्या मैत्रिणीने सांगितलेला मुद्दा मांडतो. आम्ही कॉलेजला जायचो तेव्हा नेहमीच्या प्रवासामुळे ओळखी व्हायच्या. बसमध्ये तरुणांनी लगट करण्यासाठी खेटाखेटी करणे वगैरे अनेक प्रकार घडायचे.

गर्दीचा गैरफायदा घेऊन मुलींना त्रास दिला जातो हे लक्षात यायचे. मग, आमच्यातलाच कुणीतरी उठून त्या मुलीला बसायला सीट द्यायचा किंवा प्रसंगी ‘वेगळ्या प्रकारे’ अशा तरुणांची समजूतही घालायचा. हा विषय एकदा आमच्या मित्रांच्या घोळक्यात चर्चेला आला.

libido
Gomantak Editorial: शेजाऱ्याची युद्धखोरी

एक खमकी व प्रसंगी मारझोड करायलाही मागेपुढे न पाहणारी मैत्रीण सहज म्हणाली, ‘तरणाटे खूप बरे. एऽऽ म्हूण आवाज चडयत जाल्यार कडेन सरता, भियेता. पूण जाण्टे सामके हळशीक (तरुण खूप परवडले. जरा खमकेपणा दाखवला की, बाजूला होतात व घाबरतात. म्हातारे एकदम खराब)’.

स्पष्टवक्ती असल्याने तिने जे पुढे किळसवाणे प्रकार सांगितले ते इथे लिहिणे अशक्यच आहेत. त्यातल्या त्यात तिने सांगितलेला व मला त्रास देऊन गेलेला तो प्रकार म्हणजे, आशीर्वादासाठी वाकलेल्या तरुण मुलीच्या पाठीवर ‘हूक’ शोधत फिरणारा हात.

पण, त्यासाठी ‘मी कधीच कुणाच्या पाया पडणार नाही. आशीर्वाद हवेच कशाला?’ हे म्हणणे योग्य नाही. ती विकृतीच आहे, पण त्यासाठी संस्कृतीला नावे ठेवणे, संस्कृती दूर सारणे हा उपाय नव्हे.

libido
Changed Weather And Rainfall: संहार

शरीर थकलं, लैंगिक सुख देणारी इंद्रिये थकली तरी इच्छा काही थकत नाहीत. ‘तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा..’ हाच प्रकार. चौदा पंधरा वर्षांचा मुलगा जेव्हा समकालीन मुलीवर बलात्कार करतो तेव्हा तो फक्त शरीरच ओरबाडतो, असे नव्हे तर कधी न भरून येणारी भावनिक नासधूसही करत असतो.

ज्यातून ती बिचारी पोरगी कधीही सावरत नाही. अगदी सुरुवातीपासून या अनिर्बंध कामुकतेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पूर्वी माहितीचे स्रोत कमी असायचे; आता कुठे काय झळकेल व लहान मूल ते पाहील याचा नेम नाही.

पूर्वी कुठे तरी आतल्या बाजूने असलेल्या गाड्यावर लटकलेले ‘हैदोस’चे अंक असत. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याचेही वाचन झाले. पण, एक महिनाभरात त्यातला फोलपणा लक्षात आला. कुठलीही रसनिष्पत्ती न करणारे तेच ते संदर्भ, त्याच त्या क्रिया; कंटाळा आला.

त्यानंतर आजतागायत तसले वाचण्याची इच्छाही झाली नाही. मागे एकदा अनिल थत्तेंचा एक व्हिडिओ या विषयावर पाहिला होता. त्यात त्यांनी मांडलेला मुद्दा फार महत्त्वाचा होता. ‘या अशा पुस्तकांतून शारीरिक संबंधांच्या कथेसाठी नाती निवडली जातात, त्यामुळे नात्यातील महिलेकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टिकोनच दूषित होत चालला आहे,’ असे मत थत्तेंनी व्यक्त केले. दीर-वहिनी(भाभी)पासून सुरू झालेले हे अनैतिक प्रकार आई-मुलापर्यंत येऊन पोहोचले आहेत.

libido
18 जून: लोकशाहीत नागरी स्वातंत्र्याचे स्मरण

पौगंडावस्थेतील कामेच्छांवर नियंत्रण हे केवळ लैंगिक शिक्षणातून साध्य होईल का, हा प्रश्‍न विचार करण्यासारखा आहे. अशी इच्छा जागृत होण्यापूर्वीपासून त्यावर संस्कार केले, अभ्यास, जीवनाचे ध्येय, त्याच्यात उपजत असलेल्या कलाकौशल्याच्या दिशेने त्याला वळवले तर? तरुण वयात विवाहाद्वारे त्यावर नियंत्रण मिळवता येते.

वास्तविक विवाह करून एकत्र राहण्यामागच्या वेगवेगळ्या उद्देशांमध्ये लैंगिक सहजीवन हा महत्त्वपूर्ण घटक असतो. वयोपरत्वे ही इच्छाशक्ती कमी होते. याचा अर्थ ती अजिबात नाहीशी होत नाही. प्रत्येकाबाबत त्याची तीव्रता कमीजास्त असते.

कुठल्याही वयातील अनियंत्रित कामेच्छा विकृती बनते. त्यावर नियंत्रण ठेवण्याचा योग्य मार्ग म्हणजे धर्माने कामेच्छेचे नियंत्रण हा आहे. थत्तेंनी व्यक्त केलेली भीती फक्त त्या पुस्तकांपुरती मर्यादित नाही. ती आता सिरियल, वेबसिरीज या माध्यमातून घरोघरी पोहोचली आहे.

धर्म, संस्कार, संस्कृती हा त्यावर उपाय आहे. दशग्रंथी ब्राह्मण असलेला रावण अनियंत्रित कामेच्छा असलेला बलात्कारीच होता. पण, ती विकृती आहे, संस्कृती नाही; तो अपवाद आहे, नियम नाही.

त्यामुळे, धर्माचे, संस्कारांचे व संस्कृतीचे महत्त्व कमी होत नाही. आज आपण संस्कृतीला विकृतीशी जोडत आहोत. पंचपक्वान्नांच्या ताटा विष्ठा वाढली तर अन्नावरची वासना उडते. म्हणूनच धर्म अधिक आवश्यक ठरतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com