नीलमोहर Dainik Gomantak
ब्लॉग

निळ्या बॅकग्राऊंडवरील हे निळे तुरे...

शिशिराच्या पानगळीनंतर कळ्यांचे फुलोरे बाहेर येऊ लागतात.

दैनिक गोमन्तक

आल्तिनोच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील काम संपवून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरून खाली येताना हे महाशय दिसले. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी कुणी तरी लावले असणार. पानाफुलांसह एकदम फ्रेश. वसंतातील याचे असे बहरणे मनाला नक्कीच आल्हाददायक वाटते. नवीन पालवीबरोबरच फुलणाऱ्या, अगदी बोटावर मोजणाऱ्या झाडांमध्ये त्याचा समावेश होतो. शिशिराच्या पानगळीनंतर कळ्यांचे फुलोरे बाहेर येऊ लागतात आणि त्याखालोखाल कोवळ्या पालवीचे कोंब आणि मग एकदमच हा पानाफुलांचा महोत्सव सुरू होतो.

निळ्या जांभळ्या फुलांचे फुलोरे आकाशाकडे झेपावू लागतात. सध्याच्या निरभ्र निळ्या आकाशी हे तुरे जणू एकमेकांच्या भेटीला आतुरलेले भासतात. निळ्या बॅकग्राऊंडवरील हे निळे तुरे अवर्णनीयच. पादचाऱ्यांनाही ते सहज नजरेस पडतात. सकाळी नाजूक, कोमल, मुलायम फुलांचा जणू गालिचाच झाडाखाली पाहायला मिळतो. निळा, जांभळा, फिका जांभळा किंवा मॉव्ह कलरसारखी ही फुले अतिशय तजेलदार फ्रेश. हे उत्साहवर्धक फुलोरे मन आकर्षून घेतात.

हा मूळचा दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आणून लावलेला आहे. आता तो इथं स्थिरावलेला दिसतो. सुरुवातीला कलकत्त्याच्या प्रसिद्ध वनस्पती शास्त्रीय उद्यानात तो १८४१ मध्ये लावला गेल्याची नोंद आहे. आता तो देशभर दिसतो आहे. आपल्या गोव्यात तो कधी आला हे निश्चित माहिती नाही. मात्र त्या काळात वनस्पतीवर काम करणारे हौशी युरोपियन प्रवासी सोबत झाडे घेऊन येत असत. त्यामुळे पोर्तुगीजानी आणला असावा असा कयास आपण करू शकतो. सध्या तो अनेक ठिकाणी दिसतो.

आल्तिनोवर जॉगर्स पार्कमध्ये हा दोन ठिकाणी आहे. कांपाल येथील महावीर गार्डन व पाटो येथील आंबेडकर गार्डनमध्ये प्रत्येकी एक- एक वृक्ष आहे. सध्या हा बहरलेला असल्याने हा सोहळा पाहण्याची संधी सोडू नये. अन्यथा वर्षभर वाट पाहावी लागणार..

- अनिल पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT