रोतेसांव’ कला Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यातील लोकांची खुर्च्या विणण्याची पारंपारिक ‘रोतेसांव’ कला

पूर्वीच्या काळात या खुर्च्या विणणारे पारंपारिक कारागीर गोव्यातल्या (Goa) अनेक गावात होते.

दैनिक गोमन्तक

बैठकीचा आणि पाठीचा भाग बांबूच्या चपट्या पट्ट्यानि विणून, लाकडी खुर्च्या तयार करणे ही पोर्तुगीजकालीन (Portugal) पारंपरिक पद्धत होती. त्या काळात (आज देखील असतील पण बांबूच्या पट्ट्या आज कोणी वापरत नाहीत बहुतेक घरात अशाप्रकारे हाताने विणलेल्या खुर्च्या (Chair) असायच्या.(Goa Tradition News)

जर व्यवस्थित काळजी घेतली गेली तर ह्या खुर्च्या पंचवीस ते तीस वर्षे टिकायच्या. पूर्वीच्या काळात जरी या खुर्च्या बनवताना फक्त बांबूच्या पट्ट्यांचा वापर विणकामासाठी व्हायचा, तरी हल्लीच्या काळात प्लास्टिक किंवा नायलॉनच्या पट्ट्यानी त्यांची जागा घेतली आहे. कारण निगा आणि खर्चाच्या बाबतीत त्या अधिक सोयीस्कर ठरतात.

पूर्वीच्या काळात या खुर्च्या विणणारे पारंपारिक कारागीर गोव्यातल्या (Goa) अनेक गावात होते. ते गावोगावी फिरून अशा प्रकारच्या फर्निचरची दुरुस्ती करायचे. (खुर्च्याशिवाय अन्य लाकडी फर्निचरमध्येही बांबूंच्या पट्ट्यांचा वापर व्हायचा) पण बहुतांशी खुर्च्यासाठीच त्यांचा वापर अधिक असायचा. दुर्दैवाने आता अशा खुर्च्या बनवणारे कारागीर गोव्यात फारच दुर्मिळ झालेले आहेत.

ज्यांच्यापाशी अशा प्रकारच्या खुर्च्या आहेत, त्यापैकी अनेकांनी केवळ कारागीर न मिळाल्यामुळे खुर्च्यांच्या बैठकीच्या भागावर नाईलाजाने प्लायवुड (Plywood) बसवून घेतले आहे. जे अवघे कारागीर अजून हे काम करतात त्यांच्या कुटुंबात कुणालाही परंपरा पुढे नेण्यात रस राहिलेला नाही हीदेखील वास्तवता आहे. खुर्च्या (Chair) विणण्याच्या या पारंपारिक ‘रोतेसांव’ कलेला आपल्या चित्रात स्थान दिले आहे कॉनराड पिंटो याने. ‘रोटेसांव’ हे कोन्राड पिंटोचे चित्र लीनोकट प्रिंट माध्यमात आहे.

खुर्च्या विणण्याच्या या पारंपारिक ‘रोतेसांव’ कलेला आपल्या चित्रात स्थान दिले आहे कॉनराड पिंटो याने.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT