Sea Dainik Gomantak
ब्लॉग

लाटा बदलत आहेत..

समुद्र केवळ मत्स्य संपत्ती देतो असे नाही तर पृथ्वीच्या हवामानाचेही तो नियंत्रण करतो

गोमन्तक डिजिटल टीम

अलिकडे काय खळबळत असेल समुद्राच्या पोटात? मानवी विकासाचे सारे हिडीस बाय-प्रॉडक्ट आपल्या तळाशी चुपचाप ठेवत आपल्या बागडणाऱ्या लाटांना तरीही वर्षानुवर्षे तो पाठवत आला आहे किनाऱ्यावर- आपले सौहार्द सांगत. पण वैज्ञानिक म्हणतात, अलीकडच्या वर्षांमध्ये त्याच्या लाटांमधून जाणवायला लागला आहे एक वेगळाच इशारा.

आपण फारच गृहीत धरून चाललो आहोत समुद्राची हद्द. दरवर्षी वाढत्या प्रमाणात होणारा मानवी हस्तक्षेप जेव्हा समुद्राला आपली सीमा पार करण्याला प्रवृत्त करेल तेव्हा माणसांच्या हाल अपेष्टांना पार उरलेला नसेल.

समुद्र केवळ मत्स्य संपत्ती देतो असे नाही तर पृथ्वीच्या हवामानाचेही तो नियंत्रण करतो. आपल्या पाण्याने 70 टक्के पृथ्वी व्यापणारा तो, लाखो प्रजातींचे घर आहे.

अनियंत्रित मासेमारी, त्यात ओतले जाणारे रसायनिक पदार्थ, कचरा यामुळे आम्ही समुद्राला चिंतेच्या पातळीवर आणून सोडले आहे. यावर्षीच्या समुद्र दिनाचे त्यामुळेच युनायटेड नेशनकडून ठरवण्यात आलेले घोषवाक्य आहे- ‘प्लॅनेट ओशन: टाइड्स आर चेंजिंग’.

आजच्या जागतिक समुद्र दिनी, आम्ही आमच्या पापांची जाणीव करून घेऊ व समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करू आणि त्याच्या बदलणाऱ्या लाटांचा संदेश समजून घेण्याचा प्रयत्न निकराने करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: वळणावर दुचाकी घसरली अन् दोन्ही पाय तुटले, झुआरी पुलावर भयंकर अपघात! 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IND VS PAK: मैदानावर हाय-व्होल्टेज ड्रामा! वैभव सूर्यवंशी पाकिस्तानच्या फलंदाजावर भडकला; उपकर्णधाराला करावा लागला हस्तक्षेप VIDEO

कोकण किनारपट्टीवर 'मत्स्य दुष्काळ', थंडीमुळे मासेमारीला फटका; बोटी मासळीविनाच किनाऱ्यावर, मच्छीमार हवालदिल

Gold Silver Price: सुवर्णवार्ता… सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! बजेटनंतर भाव उतरल्याने ग्राहकांची चांदी, जाणून घ्या आजचे नवे दर

Nuvem: नुवे ग्रामसभेत मेगा प्रकल्प, नक्शा सर्वेक्षणाला विरोध! 7.51 कोटी रुपयांच्‍या अर्थसंकल्पास मंजुरी

SCROLL FOR NEXT