Bridge सत्तरी तालुक्यातील गुळेली पंचायत क्षेत्रातील पैकुळ पूल 2021 साली जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे कोसळला होता. त्यामुळे या गावांमध्ये जाण्यासाठी सर्व संपर्क रस्ते बंद झाले होते. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेऊन बारा कोटी खर्चून नवीन पूल उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
गोवा पायाभूत साधन सुविधा मंडळातर्फे पुलाचे काम पूर्ण झालेले आहे. पैकुळ पूल उद्घाटनासाठी सज्ज आहे. पूल झाल्यामुळे पैकुळ-गुळेली, वाळपई, धारबांदोडा अंतर कमी झाले असून ग्रामस्थांची उत्तम सोय झाली आहे. त्यामुळे उद्घाटनापूर्वीच पुलाचा वापर सुरू झाला आहे.
गावात जाण्यासाठी इतर कुठल्याही सुविधा नसल्याने सध्या नागरिकांनी या पुलाचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. गोवा मुक्ती नंतर या गावात जाण्यासाठी तत्कालीन सरकारने पैकुळ गावांमध्ये जाण्यासाठी एक छोटा पूल उभारला होता, त्यावरून फक्त दुचाकी, चारचाकी वाहने जात होती, तेव्हा इतर सुविधा नसल्याने या पुलाचा वापर होत होता.
आता या गावातील लोकसंख्या वाढली आणि नवीन पुलाची मागणी जोर धरू लागली होती. अशातच 2021च्या जुलै महिन्यातील पुरामुळे सदर कमकुवत झालेला पूल कोसळला आणि आता पैकुळवासियांना नवीन सुसज्ज असा रुंद पूल मिळाला आहे.
पैकुळहून धारबांदोडा येथे जाण्यासाठी लागणारा सुमारे चार ते पाच किलोमीटर रस्ता निर्माण झाला, तर पैकुळबरोबर गुळेली पंचायत क्षेत्रातील व वाळपई भागातील नागरिकांना धारबांदोडा या ठिकाणी जाण्यासाठी अवघ्या सात किलोमीटरचे अंतर कापावे लागणार असून यामुळे पैकुळ गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या संदर्भात विशेष लक्ष घालून या रस्त्याची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.
2021 रगाडा नदीला पुराचा झटका बसला. यामुळे पैकुळ गावातील जुना छोटा पुल कोसळला. या पुलाच्या जागी नवीन पूलाचे बांधकाम करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी निवडणुकीच्या वेळी केली होती.
मात्र याला चालना मिळाली नव्हती. जुना पूल कोसळल्यानंतर नवीन पुलाची निर्णय लवकरात लवकर घेण्यात आला. जुलै 2021मध्ये जुना पूल कोसळल्यानंतर पैकुळ व गुळेली दरम्यानचा संपर्क तुटला होता.
पावसाळ्यात बोंडलामार्गे असलेल्या रस्त्याने नागरिकांना वाहतूक करावी लागत होती, तसेच जलसिंचन खात्यातर्फे बंधाऱ्यावर लोखंडी फरशा बसवून लोकांची सोय केली होती.
निसर्ग पर्यटन
निसर्ग पर्यटनाला या पुलामुळे उत्तम संधी आहे. हा पूल रगाडा नदीवर उभारण्यात आलेला आहे. या पुलाची रुंदी चांगल्या प्रकारची आहे. उत्तम पद्धतीने हा पूल बांधण्यात आला आहे. पुलाच्या सभोवताली परिसरामध्ये उत्कृष्ट अशी नैसर्गिक साधन संपत्ती आहे.
पुलाच्या खालून नदी वाहत आहे. पावसाळी मौसमामध्ये या नदीचे रूप सुंदर असते. त्यामुळे पावसाळी मौसमामध्ये या पुलाच्या माध्यमातून या भागांमध्ये पर्यटन विकासाला चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.