Olive Ridley Turtle Dainik Gomantak
ब्लॉग

Olive Ridley Turtles Goa: आगोंद-गालजीबागमध्ये ऑलिव्ह रिडले यंदा विक्रमी संख्येने

आश्चर्य म्हणजे गजबजाट असलेल्या आगोंद किनाऱ्यावर आतापर्यत सर्वाधिक कासवांचे आगमन झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सुभाष महाले

काणकोण तालुक्यातील आगोंद आणि गालजीबाग कासव संवर्धन केंद्रात यंदा आगमन केलेल्या सागरी कासवांची संख्या शंभरपर्यंत पोचली आहे. आगोंद किनाऱ्यावर 67 कासवांचे आगमन होऊन त्यांनी सुमारे 6 हजार अंडी घातली.

त्यापैकी, 37 घरट्यातून बाहेर पडलेल्या पिलांना सुरक्षित समुद्रात सोडण्यात आले आहे. गालजीबाग किनाऱ्यावर, सेंट अ‍ॅन्थनी चर्चच्या मागे असलेल्या भागात, आतापर्यंत 30 सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी तिथे अंडी घातली आहेत.

काणकोणमधील दोन समुद्र किनाऱ्यांवर आगमन झालेल्या सागरी कासवांचा यंदाचा आकडा गेल्या वर्षीपेक्षा खूपच वाढलेला आहे.

गेल्या वर्षी गालजीबाग किनाऱ्यावर 11 ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली होती तर आगोंदा किनाऱ्यावर 28 कासवांचे आगमन झाले होते आणि या दोन्हीकडे मिळून 3000 पिल्ले अंड्यातून बाहेर आली होती.

मात्र यंदा या जागी विक्रमी संख्येने कासवांच्या पिल्लांनी जन्म घेतला आहे. यंदा, पहिल्या ऑलिव्ह रिडले कासवाची मादी तळपणच्या किनाऱ्यावर आली होती आणि तिने तिथे 89 अंडी घातली होती. त्यानंतर ही अंडी तिथून गालजीबागच्या केंद्रावर हलवण्यात आली.

आश्चर्य म्हणजे पर्यटन व्यवसायामुळे गजबजून असलेल्या आगोंद किनाऱ्यावर आतापर्यत सर्वाधिक कासवांचे आगमन झाले आहे. अर्थात, ही आनंदाची बाब आहे. बुधवारी आगोंद किनाऱ्यावर एका घरट्यातून 100 पिल्लांना सुरक्षित समुद्रात सोडण्यात आले.

असं म्हणता येईल की दर आठवड्यात सरासरी दोन सागरी कासवानी, आगोंद किनाऱ्याजवळ उभारलेल्या वनखात्याच्या टेहळणी घराजवळच येऊन अंडी घातली आहेत. त्या अंड्याचे स्थलांतर अन्य ठिकाणी न करता, त्याच ठिकाणी त्यांचे संवर्धन होत आहे.

सागरी कासवासाठी आरक्षित असलेल्या गालजीबाग किनाऱ्यावर आतापर्यंत 30 सागरी कासवांचे आगमन झाले आहे व त्यांनी 1427 अंडी घातली आहेत.

आगोंद किनाऱ्यावर 11 मार्चपर्यत 45 ऑलिव्ह रिडले कासवांचे आगमन होऊन त्यांनी अंडी घातली होती मात्र त्यानंतर पांच सागरी कासवांचे आगमन होऊन ती संख्या पन्नास वर पोचली होती.

या आठवड्यात सोमवारपासून पांच सागरी कासवांचे आगमन समुद्र किनाऱ्यावर होऊन त्यांनी 495 अंडी घातली. यंदा आगोंद किनाऱ्यावर आणखी सागरी कासवांचे आगमन होण्याची अपेक्षा असल्याचे सागरी कासव प्रकल्पाच्या दक्षिण गोवा झोनचा ताबा असलेले

उपक्षेत्रीय वनाधिकारी राजेश नाईक यांनी दिली. काणकोण तालुक्यातील गालजीबागचा संपूर्ण किनारा व आगोंद किनाऱ्याचा काही भाग सागरी कासवांच्या संवर्धन व जतनासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

तळपण किनाऱ्यावरून गालजीबागला स्थलांतरित करण्यात आलेल्या या मोसमांतील पहिल्या सागरी कासवांच्या घरट्यातून 67 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. गालजीबाग किनारा हा सागरी कासवांसाठी आरक्षित आहे.

तसेच दक्षिण गोवा मरीन झोनचे ते मुख्यालय आहे त्यामुळे आगोंद वगळता दक्षिण गोव्यात कोणत्याही समुद्र किनाऱ्यावर सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी अंडी घातल्यास, त्यांच्या संरक्षणासाठी ती गालजीबाग किनाऱ्यावर स्थलांतरित करण्यात येतात. अंड्यांमधून पिल्ले बाहेर येण्यास सुमारे 45 ते 50 दिवसांचा कालावधी लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT