Seaweed In Goa: समुद्री शेवाळ: दुर्लक्षित खजिना

अतिशय उच्च प्रतीची पोषण मूल्ये असलेले समुद्री शेवाळ ही जादूई समुद्री वनस्पती म्हणून ओळखली जाते.
Seaweed
SeaweedDainik Gomantak
Published on
Updated on

लक्ष्मी सरदेसाई

आपल्या राज्याच्या संबंध पश्चिम भागाला किनारपट्टी लाभलेली आहे. मासे हे गोमंतकीयांच्या आहारातला मुख्य घटक आहे.

समुद्रामधून लाभत असलेल्या या मत्‍स्य संपत्तीचे साऱ्यांना कौतुक असले तरी समुदात उत्पन्न होणाऱ्या आणखीन एका महत्वाच्या घटकाकडे मात्र आपण फार उदासीन आहोत- तो घटक म्हणजे समुद्री शेवाळ!

अतिशय उच्च प्रतीची पोषण मूल्ये असलेले समुद्री शेवाळ ही जादूई समुद्री वनस्पती म्हणून ओळखली जाते. अनेक देशांत त्याच्या व्यावसायिक उपयोगामुळे समुद्रात शेती केली जाते.

सुमारे 12अब्ज अमेरिकन डॉलर किंमत होईल इतके त्याचे वार्षिक उत्पादन जगभर होते. फक्त गोव्यालाच नव्हे तर आपल्या देशाला देखील भरपूर लांबीची समुद्री किनारपट्टी लाभुनसुद्धा समुद्री शेवाळाचे उत्पादन आपल्या देशात खूपच कमी आहे.

गोव्याच्या गाब्रिएला डिक्रूझ समुद्री शेवाळासंबंधाने काम करतात. समुद्री पर्यावरणाबद्दल आस्था असलेल्या गाब्रिएला डिक्रूझ यांनी ऑक्सफर्डमधून ‘बायोडायव्हर्सिटी कन्सर्वेशन’ या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि 'समुद्री शेवाळ' हा एक गंभीर व्यवसाय बनू शकतो असे त्यांचे मत आहे.

समुद्री शेवाळाच्या मदतीने जीवन बदलणे आणि समुद्राचे पुनरुज्जीवन करणे या तिच्या मोहीमेसाठी बीबीसीने तिला ‘ग्लोबल यूथ चॅम्पियन’ पुरस्कारही बहाल केला आहे. तिने काही काळापूर्वी गोव्यात आणि कर्नाटक राज्यात स्थानिक जातीच्या समुद्री शेवाळ्याची लागवड करण्यासाठी शेती प्रकल्पही उभारले आहेत.

पण असे जर काही अपवादात्मक प्रयत्न सोडले तर  समुद्री शेवाळाकडे आपण संपूर्ण दुर्लक्ष केले आहे ही गोष्ट खरी आहे आणि ‘समुद्री शेवाळ’ हा एक लपलेला खजिना बनून राहिला आहे.

Seaweed
Ambedkar Jayanti 2023 : डॉ.बाबासाहेबांमुळेच देशाला महत्त्व - डॉ. चंद्रकांत शेट्ये

गोव्याला लाभलेल्या सुमारे 115 किलोमीटर लांबीच्या समुद्रपट्टीत ‘सरगासम’ जातीचे समुद्री शेवाळ प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. हे तपकिरी रंगाचे शेवाळ समुद्राच्या पाण्यावर तरंगत् असते.

वाळलेल्या स्वरुपातले हे शेवाळ त्यातल्या पोषक मूल्यांमुळे एक उत्तम खत म्हणून काम करते. सुमारे एक आठवडाभर वाळवलेले समुद्री शेवाळ हा सर्वोत्तम खताचा एक प्रकार आहे. काही वेळा हे समुद्री शेवाळ 4 आठवडे स्वच्छ पाण्यात बुडवून ठेवले जाते.

शेवाळामध्ये उपजतच सूक्ष्म पोषक द्रव्ये असतात. त्यातली पोषक मूल्ये पाण्याला लाभून त्याचे खतमिश्रीत द्रव्य बनते. या द्रव्यात पाणी मिसळून नंतर ते झाडांना दिले जाऊ शकते.

Seaweed
Evolution: इव्होल्युशन: मिथ्‌स ॲण्ड बिलिफ्‌स

हे समुद्री शेवाळ वाळवून, त्याचा चुरा बनवूनही तो झाडांच्या मुळात वापरला जाऊ शकतो. इतर कंपोस्ट खते आणि समुद्री शेवाळ याचा दुहेरी वापरही पिकांसाठी एक अद्‌भूत परिणाम देऊ शकतो.

उन्हाळ्याच्या दिवसात झाडाच्या मुळाशी अंथरलेले समुद्री शेवाळ जमिनीचा ओलसरपणा आणि थंडावा राखण्यातही मदत करतो. 60 पेक्षा अधिक पोषक मुल्य असलेले हे समुद्री शेवाळ, ज्याला जग ‘जादूई वनस्पती’ म्हणून ओळखते. तिच्याकडे आपण मात्र दुर्लक्ष करून आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com