टॉलीवूडमधील स्टार कलाकार महेश बाबू यांच्यासह ‘सरकारु वारी पाटा’ टीम गोव्यात आहे.  Dainik Gomantak
ब्लॉग

टॉलिवूडची टीम गोव्यात: पर्यटनावर बंदी; शूटिंग मात्र जोरात!

टॉलीवूडमधील स्टार कलाकार महेश बाबू यांच्यासह ‘सरकारु वारी पाटा’ टीम गोव्यात आहे.

सचिन कोरडे

पणजी : राज्यावर (Goa) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (Corona) संकट ओढवू शकते, असे आरोग्य खाते सांगते तर दुसरीकडे, राज्य सरकारवर (Government) हळूहळू निर्बंध शिथिल करू पाहत आहे. सध्या राजकीय (Politics) वातावरण तापत असल्याने बैठक, सभांमध्ये कोविड नियमांचे (corona virous) सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. पर्यटनावर (Tourism) अजूनही बंदी कायम आहे.

काही महिन्यांपूर्वी चित्रपटांच्या शूटिंगवरही (Shooting) बंदी होती. आता ती उठवण्यात आली असून दक्षिण गोव्यातील (South Goa) वार्का बीचवर तेलगू चित्रपटाचे शूटिंग (Telugu Film) जोमात सुरू आहे. त्यानिमित्त टॉलीवूडमधील स्टार कलाकार महेश बाबू यांच्यासह टीम गोव्यात आहे. सध्यातरी गोवा हे इतर राज्यांपेक्षा सुरक्षित मानला जात आहे. राज्यात दिवसेंदिवस कोविड नियंत्रणातही येत आहे. पर्यटकही गोव्यात दाखल होत आहेत.

काही पर्यटक तर चोरट्या मार्गाने कोणतीही चाचणी करताना दाखल होताना दिसतात. त्यामुळे कोविडचे संसर्ग वाढण्याचीही भीती आहे. अशा स्थितीत चित्रपटांच्या शूटिंगला परवानगी देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘सरकारु वारी पाटा’ हा तेलगू चित्रपट 13 जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. कोविडमुळे या चित्रपटाचे शूटिंग थांबले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन परसूराम यांनी केले असून यामध्ये महेश बाबू आणि किर्ती सुरेश हे मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाचे काही शूटिंग अमेरिकेतही करण्यात आले आहे. सप्टेंबर 2020 पासून या चित्रपटावर काम सुरू असून कोविडमुळे त्याला ब्रेक लागला होता. सेटवर एक चित्रपटाचा एक व्हिडिओ लिक झाल्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. महेश बाबू यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. ते क्रुवर चांगलेच भडकले होते. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहे.

रंगभूमी कधी?

राज्यात ‘परफॉर्मिंग आर्ट’ बंदच आहे. रंगमंच सुना आहे. मैफिली बंद आहेत. मात्र गर्दी होईल असे कार्यक्रम सर्रास सुरू आहेत. नाट्यकलाकारांना तोकड्या पैशांची मदत करण्यापेक्षा रंगभूमी सुरू करायला परवानगी दिली, तर त्यांच्यासाठी अधिक भल्याचे ठरेल, असे अनेक कलाकारांना वाटत आहे. त्यामुळे रंगभूमी कधी सुरू होईल, याची उत्सुकता या कलाकारांना लागून राहिलीआहे.

‘सरकारु वारी पाटा’ ची टीम गोव्यात आहे. दहा दिवसांपासून शूटिंग सुरू आहे. त्यांनी रितसर परवानगी घेतलेली आहे. 24 पर्यंत टीम गोव्यात असेल.

- दिलीप बोरकर, लाईन प्रोड्युसर

27 जुलैपासून काही चित्रपटांच्या शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. आमच्याकडे काही चित्रपटांची यादी आली होती. त्यातून काही चित्रपटांच्या शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे.

- मृणाल वाळके, गोवा मनोरंजन सोसायटी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT