करवंद Dainik Gomantak
ब्लॉग

रानात पिकली आंबट गोड चवीची 'करवंदे'

करवंदांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठे असते

दैनिक गोमन्तक

वसंत ऋतूच्या चैत्र आणि वैशाख महिन्यात पालवीबरोबर अनेक फळझाडे बहरून जातात. या फळांची चव वेगवेगळी असते. काही अगदी गोड, काही आंबट तुरट तर काही आंबट गोड मात्र आरोग्यशास्त्राच्या आहारशास्त्रानुसार या महिन्यात मिळणाऱ्या रानमेव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील करवंदाला आंबट गोड चव असते. सध्या आपल्याकडे या फळांचा बहर सुरू आहे.बाजारातही ती सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे या करवंदाची चव चाखलीच पाहिजे. कारण या फळांना अनेक अर्थाने महत्त्व आहे.

करवंदाचे झुडूप मध्यम आकाराचे असून काटेरी असते. सुरुवातीला पांढरी फुले येतात आणि त्यातून फळधारणा होऊन हिरवी फळे लगडू लागतात. ही फळे हळूहळू लाल, जांभळी आणि शेवटी काळपट रंगाची होऊन पिकतात. ही पिकलेली करवंदे खाण्यासाठी सुमधुर आणि योग्य बनलेली असतात. करवंदांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठे असते जे या दिवसातील शारीरिक थकवा घालवण्यासाठी मदत होते. याशिवाय करवंदांमध्ये सायट्रीक ॲसिड आणि क जीवनसत्वही मोठ्या प्रमाणात असते जे अनेक आजारांसाठी, प्रामुख्याने त्वचारोगाच्या विकारावर नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. करवंदाचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. करवंदांची चटणी, लोणचे, मुरंबा व सरबतही करता येते. हे आरोग्यासाठी गुणकारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT