Children Cleanliness campaign Gomantak Digital Team
ब्लॉग

Summer Holiday Activity: नादोडा गावातील मुलांचा सुट्टीतील उपक्रम

ह्या पत्रकात कचरा विलगीकरणाची माहिती देण्याबरोबर स्वच्छता मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही मुलांनी गावकऱ्यांना केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

ummer Holiday Activity: मातृदिनाचे औचित्य साधून, रविवार 14/05/23 रोजी नादोडा-रेवोडा गावातील मुलांनी स्वच्छता मोहीम राबवली. ‘#गावाखातिर’ हे टॅक सेव्ही नाव देऊन ह्या उपक्रमाची सुरवात मुलांनी केली.

आदल्या दिवशी, शनिवारी, मुलांनी आपण स्वतः तयार केलेली माहिती पत्रके घरोघरी वितरित केली होती. ह्या पत्रकात कचरा विलगीकरणाची माहिती देण्याबरोबर स्वच्छता मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही मुलांनी गावकऱ्यांना केले होते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता, ह्या उपक्रमाची सुरवात नादोडा पंचायतींच्या प्रांगणात एका औपचारिक कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात गावचे सरपंच परेश दयानंद गावस, माजी सरपंच योगानंद सखे गावस ह्यांनी मुलांना मार्गदर्शन केले आणि हा उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. सृष्टी गावस आणि अक्षता गावस या मुलांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमात आणि स्वच्छ्ता मोहिमेत गावचे पंच सदस्य, मुलांचे पालक, काही सामाजिक बांधिलकी असलेले गावकरीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. गावासाठी असे अनेक उपक्रम राबवण्याचा या मुलांचा मानस आहे. या उपक्रमाचे अनुकरण इतरही गावातील मुलांनी करावे आणि अशा मुलांचा एक मोठा समूह तयार व्हावा अशी स्वप्ने हे बालवीर उराशी बाळगून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

SCROLL FOR NEXT