मौल्यवान धातूंसाठी होणार 'समुद्रमंथन ' Dainik Gomantak
ब्लॉग

आता मौल्यवान धातूंसाठी होणार 'समुद्रमंथन'

भारतीय सागरी आर्थिक क्षेत्रात विविध प्रकारचा संशोधन सुरू आहे. आता ही संशोधन मोहीम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत असल्याने समुद्र विज्ञान क्षेत्रात अनेक पैलू हाती लागतील अशी आशा आहे.

अनिल पाटील

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि हिंदी महासागरच्या (Indian Ocean) दरम्यान खोल समुद्रात असणाऱ्या कार्ल्सबर्ग रिज (Carlsberg Ridge) ते सेंट्रल इंडियन रिज (Central Indian Ridge) मधील देशासाठी अत्यंत मौल्यवान धातूच्या (precious metals) शोधा बरोबरच समुद्रातल्या पर्वतीय हालचालींची माहिती घेणारी अत्यंत महत्वकांशी असणारी संशोधनाची नवी मोहीम 30 ऑगस्टला सुरु होत असल्याची माहिती राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे (National Institute of Oceanography) संचालक डॉ. सुनील कुमार सिंग यांनी दिली आहे. 

देशाला लाभलेल्या 7 हजार 500 हून अधिक लांबीचा समुद्र किनारपट्टीवर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून विविध क्षेत्रातील संशोधनाचे काम केले जाते. त्याबरोबरच या संस्थेच्या वतीने अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरात खोल पाण्याखालील संशोधनाचे कामही केले जाते. आता नव्याने हिंदी महासागरातील रमण आणि पणीकर समुद्र पर्वत (Sea Mountain) च्या पुढे मालदीव जवळ ही नवीन शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. हे पर्वत 'समृद्ध रॉक' मानले जातात. या समुद्रीय पर्वतरांगेमध्ये सोने, तांबे, जस्त, लीथोनिम यासारख्या धातूंचे साठे असून आहेत हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. आता इतर धातूंच्या सूक्ष्म कणांचा अभ्यास करण्यात येणार आहे. शिवाय सूक्ष्मकणांची जिनोम मायक्रो न्यूट्रन चा अभ्यास होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा भाग भूकंपप्रवण भाग असल्याने या भागातील भूगर्भीय हालचाली साठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि आफ्रिकन प्लेट या  एकमेकांवर आदळत असल्याने या भागात सतत भूगर्भीय हालचाली होत असतात. त्यात या टेक्टॉनिक प्लेट्स दरवर्षी 18 मिलिमीटरने उत्तर पश्चिम भागाकडे सरकत आहेत. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर सूक्ष्म लक्ष ठेवणे खूप गरजेचा बनले आहे. येथे महासागरांचे थंड पाणी आणि पृथ्वीच्या पोटातील 400 अंश सेल्सिअस तप्त तापमानाचा लाव्हा यांच्यात संपर्क येत असल्याने रोज खनिज डिपॉझिट होत असतात. सोबत समुद्र जीव जलसृष्टी, मायक्रो फ्लोरा, सूक्ष्मजीवजंतू यांची निर्मिती होत असते. यावर ही संशोधन होणे अपेक्षित आहे. यामुळे या बहुउद्देशीय  मोहिमेला विशेष महत्त्व आले आहे. यात विविध क्षेत्रातील 40 हून अधिक शास्त्रज्ञ सहभागी होणार असून ही मोहीम तीन वर्ष चालणार आहे. या मोहिमेचे नेतृत्व राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. यातीश करणार आहेत. 

अभ्यास क्षेत्र
  • अभ्यास क्षेत्र 

अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील कार्ल्सबर्ग ते सेंट्रल इंडियन रिज दरम्यान खोल समुद्रात 3 हजार 500 ते 3 हजार 800 मिटर वर हे संशोधनाचे काम चालेल. याशिवाय टेक्टॉनिक फ्लॅटच्या हालचालीसाठी आफ्रिकन प्लेट आणि इंडो ऑस्ट्रेलियन फ्लॅटच्या अभ्यास केला जाईल. हा भाग लक्षद्वीप च्या पुढे आणि मालदिव शेजारी म्हणजे देशापासून सुमारे 2 हजार किलोमीटरच्या पुढे आहे.

आर व्ही सिंधू साधना
  •  आर व्ही सिंधू साधना 

सागरी संशोधनासाठी सर्वात महत्त्वाचे असते आधुनिक प्रयोगशाळा असलेली संशोधन जहाज. सद्या हे काम आर व्ही सिंधू साधना हे संशोधन जहाज करत आहे. या बहुउद्देशीय जहाजावर 200 कर्मचारी राहण्याची सोय असून हे जहाज एका ठिकाणी सहा महिन्यांहून अधिक काळ समुद्रात उभे केले जावू शकते. यामध्ये सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा असून त्यावर अत्याधुनिक रडार यंत्रणा आहे.आपत्कालीन स्थितीत हेलिकॉप्टर उतरण्याची ही सोय आहे.

  •  संशोधनाची गरज 

हिंदी महासागरातील हा समुद्र भूभाग मौल्यवान खनिजे, तेल, नैसर्गिक वायू यांच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध मानला जातो. तो भारतीय आर्थिक क्षेत्रात येत असल्याने त्यावर आपला हक्क आहे व त्यावर संशोधन करणे गरजेचे आहे. हा भाग भूकंपप्रवण असल्याने इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि आफ्रिकन टेक्टॉनिक प्लेट यांच्यात चलन सुरू आहे त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या दृष्टीने हे संशोधन खूप गरजेचे आहे. किनारपट्टीच्या भागातील लोकांच्या जीवनात समुद्र अन्न म्हणजे सीफूड मोठ्या प्रमाणात असते. त्यादृष्टीने इथल्या जल जीवसृष्टीचा अभ्यास आणि जलजीवनाचा अभ्यास महत्त्वाचा आहे.

डॉ सुनीलकुमार सिंग संचालक, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था

"राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या वतीने विविध प्रकारचे संशोधन चालू असते. त्यातील हा संशोधन प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी असून अशा प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या संशोधनाची दखल घेतली जाते आणि देशाच्या आर्थिक क्षेत्राला मदत आणि प्रोत्साहन मिळते."

डॉ सुनीलकुमार सिंग संचालक, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था

डॉ. यातिश मोहीम इन्चार्ज

"भारतीय सागरी आर्थिक क्षेत्रात विविध प्रकारचा संशोधन सुरू आहे. आता ही संशोधन मोहीम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत असल्याने समुद्र विज्ञान क्षेत्रात अनेक पैलू हाती लागतील अशी आशा आहे."

डॉ. यातिश मोहीम इन्चार्ज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT