परदेशातून आलेला खलाशी गोव्यात बनला ‘पाडेली' Dainik Gomantak
ब्लॉग

परदेशातून आलेला खलाशी गोव्यात बनला ‘पाडेली’ महिन्‍याला कमावतोय लाखो

गोव्यातील तरुणांनी ‘पाडेली’ रोजगाराकडे वळावे, यासाठी तो प्रशिक्षणही देत आहे. आता माडावर चढून महिन्‍याला कमावतो लाखभर रुपये

दैनिक गोमन्तक

सासष्टी: वर्षभर चांगले उत्पन्न देणारे वृक्ष म्हणून नारळाच्या झाडाकडे (coconut trees) पाहण्यात येते. गोव्यातील (Goa) बागायतदार मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड करतात. परंतु, नारळ पाडणाऱ्यांची (cutting coconut trees) म्‍हणजेच ‘पाडेलीं’ची संख्या घटत चालल्याने बागायती उत्पन्नाला फटका बसत आहे. याच संधीचे सोने करत कोरोनामुळे (Covid-19) मायदेशी परतलेला खलाशी विझियर कुयल्लो हा तरुण पूर्णवेळ पाडेली बनला आहे. महिन्‍याला सुमारे एक लाख रुपये तो कमावतो. दरम्‍यान, गोव्यातील तरुणांनी या रोजगाराकडे वळावे, यासाठी तो प्रशिक्षणही देत आहे. (Sailor from abroad earns lakhs of rupees month by cutting coconut trees in Goa)

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे मायदेशी परतलेल्या खलाशांवर बेरोजगार राहण्याची पाळी आली आहे. गोव्यातील अनेक खलाशी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. बेरोजगार राहण्यापेक्षा काही व्यवसाय करण्याचा निर्णय पिलार येथील विझियरया ३५ वर्षीय युवकाने घेतला. सुरुवातीला त्याने मासळीविक्री केली. पण चांगला नफा मिळाला नाही. त्‍यामुळे नंतर त्‍याने पाडेली बनण्‍याचा निर्णय घेतला. कारण गोव्‍यात माड मोठ्या संख्‍येने असून पाडेलींची संख्‍या खूपच कमी आहे.

विझियरला नारळाच्या झाडावर सरसर चढायला येते. पण ते शारीरिकदृष्ट्या कष्ट आणि जोखमीचे चार हजार रुपये खर्च करुन मशीन विकत घेतले. ते चालविण्यासाठी त्याला ‘आमचे शेतकार’ संघटनेने प्रशिक्षण दिले व त्‍यानंतर त्याला व्यवसाय मिळवून देण्यासही मदत केली.

गेल्या आठ महिन्यांपासून तो नारळ काढण्‍याचे काम करत आहे. यातून चांगला नफाही त्‍याला मिळतो. तसेच या व्यवसायात चांगला नफा असल्यामुळे विझियर तरुणांना नारळाच्या झाडावर चढण्यासाठी स्वतः प्रशिक्षण देत आहे.

आपण प्रत्येक माडावर चढण्यासाठी 100 रुपये घेतो. दिवसाला सरासरी 30 ते 40 माडांवर चढून नारळ पाडतो. साखळी, वाळपई, बार्देश या उत्तर गोव्‍यातील ठिकाणांबरोबरच दक्षिण गोव्याच्‍या विविध भागांत जाऊन नारळ काढतो. मात्र राज्‍यातील युवक हा व्यवसाय करण्यासाठी अजून तयार होत नाहीत. कुठच्‍या तरी कारखान्‍यात राबून महिन्‍याला दहा ते पंधरा हजार रुपये मिळवण्‍यात ते धन्‍यता मानतात. ‘पाडेली’ बनून आठवड्याला किमान दहा हजार रुपये कमवणे सहज शक्य आहे.

- विझियर कुयल्लो, पाडेली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT