Goa: आकर्षक गणेश मूर्ती लक्ष वेधू लागल्‍या

Goa: नोंदणीही सुरू : लहान मूर्ती बनवण्‍यावर भर, दरांमध्‍येही मोठी वाढ
Goa: Ganesh Idols For Sale In Various Cities.
Goa: Ganesh Idols For Sale In Various Cities.Dainik Gomantak

गोवा वेल्हा : अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival) सुबक व देखण्या गणेशमूर्ती तिसवाडी तालुक्‍यातील ठिकठिकाणच्या चित्रशाळांत विक्रीस उपलब्ध आहेत. दि. १० सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. (Ganesh Idols For Sale In Tiswadi, Goa)

राज्यात कोविडचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. त्‍यामुळे यंदाही गणेशोत्सव मर्यादित स्‍वरूपात साजरा होणार आहे. तिसवाडी भागात ठिकठिकाणी लहानमोठ्या आकाराच्या मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. आगाऊ नोंदणीही सुरू झाली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे मूर्तिकारांना बराच आर्थिक फटका बसला होता. हे ध्यानात ठेवून यंदा मूर्तिकारांनी लहान मूर्ती तयार करण्यावरच अधिक भर दिला आहे. मोठ्या आकाराच्या मूर्ती सार्वजनिक गणेश उत्सवासाठी तयार करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीचे भाव वाढले आहेत. मूर्ती बनविण्‍यासाठी लागणाऱ्या साहित्‍याचे दर वाढल्‍याने मूर्तिकारांसमोर दुसरा पर्याय नव्हता, असे काही मूर्तिकारांनी या प्रतिनिधीला सांगितले. यंदा ६०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत दर ठेवण्‍यात आले आहेत.

Goa: Ganesh Idols For Sale In Various Cities.
Goa Politics: दाबोळीत कॉंग्रेसच्या 33 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

तिसवाडीत अनेक ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. अनेकांनी आपल्या घरच्या गणेशोत्सवासाठी आपल्या आवडीच्या मूर्तीची निवड केली आहे. गणेश चतुर्थीच्या काही दिवस अगोदर ग्राहक आपापल्या मूर्ती घरी नेणार आहेत. त्‍यामुळे आगाऊ नोंदणीही सुरू झाल्‍याचे काही मूर्तिकारांनी सांगितले.

वास्‍कोत पर्यावरणपूरक मूर्ती दाखल

गणेश चतुर्थी अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली असून, वास्‍को परिसरात पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेश चतुर्थी अत्‍यंत मर्यादित साजरी करण्‍यात आली. यंदा कोरोना संसर्ग काही प्रमाणात ओसरला असल्याने गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मनोदय लोकांनी बाळगला आहे. चित्रशाळांमध्‍ये गणेशमूर्ती साकारण्‍यात येत आहेत. तसेच पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्‍या आहेत. पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या मूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत.

Goa: Ganesh Idols For Sale In Various Cities.
Goa: आदिवासी समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या मोठ्या घोषणा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com