Ram Manohar Lohia Dainik Gomantak
ब्लॉग

गोवा मुक्तीची प्रेरकशक्ती, थोर समाजवादी: डॉ. राममनोहर लोहिया

गोवा स्वातंत्र्याची तीव्रतेने मशाल प्रज्वलित केली, ती डॉ. राममनोहर लोहिया यांनी आणि ही व्यक्ती त्यामुळे गोवा मुक्ती लढ्याची खऱ्या अर्थात प्रेरकशक्ती ठरली.

शंभू भाऊ बांदेकर

18 जून 1946 रोजी डॉ. राममनोहर लोहिया (Ram Manohar Lohia) यांनी मडगावच्या सभेत गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले नसते तर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला असता की नाही, यााबाबत शंकाच आहे नाही. गोव्यातील व गोव्याबाहेरील देशभक्त गोवा मुक्तीसाठी आपापल्यापरीने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या कार्यरत होतेच, पण त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची तीव्रतेने मशाल प्रज्वलित केली, ती डॉ. राममनोहर लोहिया यांनी आणि ही व्यक्ती त्यामुळे गोवा मुक्ती लढ्याची खऱ्या अर्थात प्रेरकशक्ती ठरली.

डॉ. लाोहिया हे जाज्वल्य देशाभिमानी होते. त्यामुळे त्यांनी गोवा मुक्ती चळवळीस झोकून देऊन जसा, तुरुंगवास पत्करला त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींच्या सत्य अहिंसेला प्रमाण मानून देसाच्या स्वातंत्र्यचळवळीत उडी घेऊनही तुरूंगवास पत्करला. शिवाय त्यांची निष्ठा समाजवादी विचाारवंतांवर आधारित होती. अखेरपर्यंत या विचारांशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहून त्यांनी देशभर समाजवादी विचारांची पेरणी केली व या विचारधारेतून त्यांनी देशापुढे आपला असा एक आगळा आणि वेगळा ठसा उमटविला. त्यांचे हे समाजधिष्ठित विचार आजही कसे पोषक आहेत हे त्यांचे विचार वाचून आपल्या लक्षात येऊ शकेल.

डॉ. लाोहियांच्या एकूण समजवावयाचे सार त्यांच्या सप्तकांतीमध्ये आहे. ते जगभर सर्व माणसांना बरोबरीने वागविले जावे, कातडीच्या रंगावरून भेदभाव केला जाऊ नये, वंशभेद, वर्णभेद यांना थारा देता कामा नये! त्यांचे स्पष्ट म्हणणे होते की, भारतात चालत असलेल्या जन्मावर आधारित जातीय व्यवस्थेला कुठलाही शास्त्रीय अधार नाही. ही व्यवस्था पूर्णतः निपटून टाकली पाहिजे. ज्या जाती जमातींना परंपरेेने शिक्षण घेणे तसेच स्वतःच्या नावाने संपत्ती धारण करणे इ. मानवाधिकार नाकारण्यात आले होते, त्यांना विकासासाठी विशेष संधी दिली गेली पाहिजे. समाजाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना निर्णायक स्थान देण्यात आले पाहिजे. `पिछडे पावे सौ में साठ` म्हणजे सत्तास्थानांतील साठ टक्के जागा त्यांना मिळतील, अशी व्यवस्था केली गेली पाहिजे नर-नारी यांच्यात समता असली पाहिजे स्त्रियांना दुय्यम लेखणे अन्यायकारक आहे. समाज व्यवहारात व नीतिनियम बनवितानासुद्धा स्त्रियांवर अधिक बंधने लादू नयेत, अधिकार व बंधने स्त्रियांना समान असावीत व यासाठी पुरुषवर्गाने पुढाकार घेतला पाहिजे.

समाज परिवर्तन करू पाहणाऱ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी समर्पित वृत्तीने कार्य करणे आवश्‍यक आहे, असे सांगून त्यांनी प्रतिपादन केले होते कीं, `भाषा, भूषा, भूवन आणि भोजन ही चार प्रस्थापितांची, सत्ताधा-यांची हत्यारे आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे, तसे०च तुरूंग, फावडे आणि मतपेटी ही तीन परिवर्तनाची साधने आहेत. या तिन्ही साधनांचा काळ, काम, वेग पाहून समाजपरिवर्तन करू पाहणाऱ्यांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी संघटित केले पाहिजे व स्वतः निस्वार्थीपणे या कार्यास वाहून घेतले पाहिजे, तेव्हाच आपणांस जो `समाजवाद` अभिप्रेत आहे, त्याची फळे चाखता येतील.

डॉ. लोहियांना आपल्या वाणी व लेखणी या दोघांचा सारखाच वापर देशात समाजवाद कार्यक्रम तपशीलात जाऊन मांडण्यासाठी काम केले. त्यांचे स्पष्ट म्हणणे होते की, भांडवलदार कामगारांचे शोषण करतात, तर जमीनदार व सावकार यांच्याकडून गरीब कुळे, छोटे शेतकरी यांचे शोषण होत हे सारे शक्य िततक्या लवकर थांबले पाहिजे, पण हे फक्त सांगून प्रत्यक्षात येणार नाही. तर त्यासाठी आवश्‍यक त्या चळवळी चालविल्या पााहिजेत आणि म्हणूनच ही कामे संघटितपणे व विनाविलंब करता यावीत, यासाठी ज्या बत्तीस तरुणांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली, त्यात डॉ. लोहिया हे एक प्रमुख होते.

`समाजवाद` म्हणजे नक्की काय? या प्रश्‍नाचे विश्‍लेषण करताना त्यांनी सांगितले. `समाजवाद` म्हणजे समता! यासाठी संपन्न व दुर्बल समाजातील सर्व प्राथमिक गरजा चांगल्या रीतीने भागविल्या जातील इतके उत्पादन होत राहिले पाहिजे. त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा विवेकाने वापर केला गेला पाहिजे.भाषा आणि शाळा सुधार याबाबतीतही त्यांनी परखडपणे विचार मांडले होते. त्यांना कोणत्याही एका भाषेचे दुकान थाटावयाचे नव्हते. त्यांचा विरोध फक्त `इंग्रजी हटाव` पुरता सीमित नव्हता. त्यांच्या भाषाभिमानाच्या मागे भारतीय भाषांवरील प्रेम आणि भारतीय भाषा बोलणाऱ्या सर्वसामान्यांबद्दलचा विलक्षण कळवळा होता. इंग्रजी भाषा भारतातील फक्त दोन ते पांच टक्के लोकांनाच येते, तरी ती भारतावर सत्ता गाजवेल याची त्यांना मनस्वी चीड होती. इंग्रजीचा स्वीकार म्हणजे विलासीसांम तीव्रतेचा स्वीकार, इंग्रजीच्या गुलामगिरीचा स्वीकार असे त्यांचे स्पष्ट मत होते. मंत्री आणि कोट्याधीश या साऱ्यांची मुले जेव्हा एका शाळेत शिकतील तेव्हाच शाळा सुधारतील, असा त्यांचा रोखठोक निर्वाळा होता. देशात समाजवादाचा पाया भक्कम करणाऱ्या या समाजवादी विचारवंतास त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्रपणे

अभिवादन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT