
गुरुग्राममधील प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेची जबाबदारी हरियाणातील भाऊ गँगने स्वीकारली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून स्पष्ट केले की हा हल्ला नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांच्या आदेशावरून हा हल्ला करण्यात आला.
गँगच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज एल्विश यादवच्या घरावर ज्या गोळ्या झाडल्या गेल्या त्या आम्ही नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी झाडल्या. त्याने सट्टेबाजीचा प्रचार करून अनेक घरे उध्वस्त केली आहेत. जो कोणी सट्टेबाजीचा प्रचार करेल त्याला गोळ्या झाडल्या जातील किंवा धमक्या मिळतील.
या पोस्टसोबतच गँगने इतर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्संना थेट इशारा दिला आहे की, सट्टेबाजीचा प्रचार केल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
माहितीनुसार, रविवारी सकाळी ५:३० ते ६ च्या दरम्यान तीन मुखवटा घातलेले गुंड दुचाकीवरून आले आणि गुरुग्राम सेक्टर ५७ मधील एल्विश यादवच्या घरावर गोळीबार केला. गोळीबारानंतर हे तिघेही घटनास्थळावरून पळून गेले. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. हल्ल्याच्या वेळी एल्विश घरात उपस्थित नव्हता.
गुरुग्राम पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली असून, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे, जेणेकरून हल्लेखोरांची ओळख पटवता येईल. पोलिसांनी सांगितले की, एल्विश यादव किंवा त्याच्या कुटुंबाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.
या गोळीबारामुळे संपूर्ण सेक्टर ५७ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रारी करत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. एल्विश यादव हा युट्यूबवरील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर असून, त्याच्या घरावर थेट हल्ला झाल्यामुळे या घटनेने सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.