Pratap Singh Rane said dont sit and do laptop laptop In Goa assembly  
ब्लॉग

गोवा विधानसभेतून: ‘भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी’

अवित बगळे

लीकडे जातीयवादी म्हणी आणि वाक्‍य‍प्रचार यांचा वापर टाळला जातो. विधानसभेत मात्र केंद्रीय यंत्रणांनी राज्यात आपला विस्तार कसा चालवला आहे, याचे उदाहरण देताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ‘भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी’ या म्हणीचा आधार घेतला. त्यांचे म्हणणे होते की, केंद्रीय यंत्रणा एकदा जमीन मिळेपर्यंत गप्प बसतात, नंतर अधिकार गाजवतात. आपल्या म्हणण्याच्या पृष्ठ्यर्थ त्यांनी मडगावचे उदाहरण दिले. ते म्हणाले, दक्षिण - पश्चिम रेल्वेचे पूर्वी मडगावात स्थानक होते. आता कोकण रेल्वेने दुसरे स्थानक बांधले. पूर्वीच्या स्थानक परिसरात त्यांनी कितीतरी इमारती उभ्या केल्या. त्यासाठी ना पालिकेकडून परवानगी घेतली ना नगर नियोजन प्राधिकरणाची मंजुरी घेतली. केंद्रीय यंत्रणा राज्याच्या यंत्रणांना जुमानत नाहीत. दाबोळी विमानतळाच्या विस्तारासाठी सरकारनेच जमीन मिळवून दिली होती. मात्र, समांतर टॅक्सी मार्गासाठी जागा परत मिळवताना थेट संरक्षणमंत्र्यांपर्यंत धाव घ्यावी लागली होती.

विधानसभेत आज प्रतापसिंह राणे यांनी पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याविषयी ठरावावर चर्चा करताना कोणत्या कायद्याने हा आराखडा केला ते सांगा, अशी जोरदारपणे विचारणा राणे यांनी केली. काहीही सरकार जनतेच्या माथी थोपू शकत नाही, असेही त्यांनी ठणकावले. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार आराखडा केला, असे काब्राल यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, तर राणे यांनी कायद्यातील कलमे सांगा, अशा घोषा लावला. अखेर कायद्याची प्रत देतो असे सांगून काब्राल यांनी आपला बचाव करून घेतला. अशाच एका चर्चेवेळी सत्ताधारी आमदार एलिना साल्ढाणा यांनी सरकारवर बॉंब टाकला. किनारी व्यवस्थापन आराखडा तयार करताना आपल्याला कोणी विश्वासातच घेतले नाही, असा सरळ आरोप त्यांनी केला. त्यावर काब्राल यांनी तालुकावार आपण भेटी दिल्याचे सांगत या विषय गुंडाळला.

विधानसभेत गंभीर चर्चा सुरू असतानाही एखादा मुद्दा असा समोर येतो की त्याचे उत्तर काय द्यावे, हे समजतही नाही. संजीवनी सहकारी साखर कारखानाविषयक चर्चा सुरू असताना पूर्वी 750 ऊस उत्पादक शेतकरी होते, आता 540 शेतकरी आहेत. उर्वरित शेतकरी कुठे गेले, अशी खोचक विचारणा विजय सरदेसाई यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी काही शेतकरी ऊसाऐवजी दुसऱ्या उत्पादनाकडे वळू पाहतात, असे सांगण्याचा प्रयत्न केल्यावर लगेच सरदेसाई यांनी ‘गांजा लागवडीकडे का?’ अशी विचारणा करत बोचकारे काढलेच. प्रश्नांची उत्तरे लिखित मिळत नाहीत, असे प्रतापसिंह राणे यांनी सांगताच त्यासाठी लॅपटॉप दिल्याचे सांगताच राणे यांनी ‘लॅपटॉप लॅपटॉप’ करत बसू नका, असे चिडक्या आवाजात सांगितले. त्यामुळे अवाक झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हाती त्यांना पाहत राहण्यापलीकडे काही राहिलेले नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT