Heritage Arts Festival in Nepal Gomantak Digital Team
ब्लॉग

Heritage Arts Festival in Nepal : अनिता कुबल यांची चित्रे नेपाळ हेरिटेज कला महोत्सवात

प्रदर्शनात भारतातून पूर्णिमा कौल, प्रो. राजेश यादव, डॉ. गोपाळ प्रसाद, डॉ. चित्रा सेन, ईशिता जैन, डॉ. रघुनाथ शर्मा व श्लोका अग्रवाल या चित्रकारांचाही समावेश

गोमन्तक डिजिटल टीम

द आर्ट पिव्होट इंडिया, जी. पी. कोईराला फाऊंडेशन व आर्ट अँड कल्चर खाते, नेपाळ यांच्यातर्फे अलीकडेच काठमांडू नेपाळ येथे झालेल्या हेरिटेज कला महोत्सव २०२३ मध्ये गोमंतकीय प्रतिभाशाली चित्रकार अनिता कुबल यांना सतत दुसऱ्यांदा आपला चित्राविष्कार प्रदर्शित करण्याची संधी लाभली.

तुर्की, मलेशिया, फिलिपाईन, यूएई, ऑस्ट्रीया व भारत या देशांतील २५ चित्रकार या कला महोत्सवात सहभागी झाले होते. वास्तू विशारद असलेल्या अनिता यांच्या कन्या अंकिता यांनाही तिच्या दोन चित्रकृती प्रदर्शित करण्याची संधी लाभली त्यामुळे मायलेकीचा एकत्रित चित्राविष्कार अनेकांना पहाता आला व याचा आनंद अनिता यांना जास्त झाला.

अनिता यांनी आपल्या जलरंगातील आठ चित्रकृती प्रदर्शित केल्या होत्या व त्यांना चांगला प्रतिसादही लाभला. कला अकादमी गोवा ते न्यू जर्सी व नेपाळ असा त्यांचा कलाप्रवास झाला आहे. या प्रदर्शनात भारतातून पूर्णिमा कौल, प्रो. राजेश यादव, डॉ. गोपाळ प्रसाद, डॉ. चित्रा सेन, ईशिता जैन, डॉ. रघुनाथ शर्मा व श्लोका अग्रवाल या चित्रकारांचाही समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fire In Gujarat Titans Team Bus: फायनलनंतर मोठी दुर्घटना! गुजरातच्या बसला आग; शुभमन गिल, बटलरसह सर्व खेळाडू 1 तास रस्त्यावर! वाचा नेमकं काय घडलं?

Goa Tourist Car Stunt: एकाच कारमध्ये 10 तरुण, दोघे चक्क डिकीच्या आत; बागा रोडवर पर्यटकांचा थरारक स्टंट! व्हिडिओ व्हायरल

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा दणका, गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ; आजपासून नवे दर लागू

Horoscope: जूनचा पहिलाच दिवस 'या' राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'; करिअरमध्ये सुवर्णसंधी, बँक बॅलन्स वाढणार

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

SCROLL FOR NEXT