दीनानाथ दलाल यांचे पुस्तक Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्याच्या मातीतला रंगाचा जादूगार; दीनानाथ दलाल

चित्रकार म्हणून दलाल श्रेष्ठ होते हे सांगतानाच हे पुस्तक ते माणूस म्हणूनही किती उंच होते हे ही स्पष्ट करते.

दैनिक गोमन्तक

दीनानाथ दलाल हे नाव उच्चारताच आठवतात त्या कमनीय रेषांनी आकार घेतलेल्या मनमोहक वळणांच्या आकृत्या, आकर्षक रंगांच्या मिलीफातून घडणारा अस्सल भारतीय चित्रशैलीचा अविष्कार, पुस्तकांच्या मुखपृष्ठातून घडणारे पुस्तकाच्या अंतरंगाचे दर्शन, दिवाळी अंकांमधून त्यांच्या चित्रांच्या हातात हात घालून भेटीला येणाऱ्या कथा!! व्यंगचित्रे, भारतीय लघुशैली, आधुनिक चित्रशैली या चित्रकलांच्या साऱ्या प्रांतात आपला दिमाखदार ठसा उमटवणारे चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म गोव्यात झाला. रंग- रेषांच्या त्यांच्या हातात असलेल्या जादूई विश्‍वाचा विस्तार मात्र मुंबईत झाला. (Painter Dinanath Dalal who made his mark in painting, was born in Goa)

आपल्या चित्रांनी त्यांनी गेल्या शतकात महाराष्ट्रात प्रचंड प्रभाव पाडला. अनेकांनी त्यांच्यावर खूप प्रमाणात लेखन केले मात्र त्यांच्या आयुष्याचा एकंदर लेखाजोखा घेणारे पुस्तक मात्र आजवर लिहीले गेले नव्हते. ही त्रुटी डॉ. अनंत देशमुख यांनी लिहीलेल्या ‘‘रंगाचा जादूगार दीनानाथ दलाल’’ या पुस्तकाने भरुन काढली आहे. पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या सबंध जीवनप्रवासाचा साधकरीत्या वेध घेते. दलाल आर्ट स्टूडीओची स्थापना, ‘दीपावली’ दिवाळी अंकाचा जन्म, त्यांचा साहित्याशी (आणि साहित्यिकांशी) असलेला संबंध, त्याची चित्रकारीता, त्यांचे समाजकार्य, त्यांचे स्वतःशीच चाललेलं द्वंद इत्यादी बाबींवर हे पुस्तक प्रकाश टाकते.

दीनानाथ दलाल जरी जाहीराती, पुस्तकांची मुखपृष्ठे यात अडकलेले असले तरी त्यांनी स्वतःला प्युअर पेंटीगचेही आकर्षण होते. पुस्तकात अशोकजी परंजपे यांनी कथन केलेला एक प्रसंग आहे. एकदा दलाल आणि परांजपे जेष्ठ चित्रकार बेंद्रे यांचे चित्र प्रदर्शन पाहून परत येतात. प्रदर्शन पाहून दलाल विलक्षण बेचैन झालेले असतात. ते अशोकजीना म्हणतात,‘‘असं माझ्या हातून व्हायला पाहिजे. आता असं करतो, हा स्टुडीओचा व्याप बाजूला ठेवून कुठेतरी सहा महीने जाऊन राहतो. मग पहा तुम्हाला हा दलाल वेगळा दिसेल.

त्याची चित्रं सर्वस्वी वेगळी दिसतील.‘‘अशोकजी सांगतात की ह्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर उल्हास होता, डोळे चमकत होते पण पाहता पाहता त्यात विषण्णता भरुन येते आणि दलाल पुढे म्हणतात, ‘‘आता कसलं होतंय? लोकं, गिऱ्हाईक मागेल ते चित्र रंगवायचं एवढंच हातात राहिलंय पोटासाठी कलेची कुसर होते ती अशी.’’ पण पुन्हा ते सावध होतात आणि म्हणतात, ‘‘मी समर्थ आहे. आता मला हवं तसं जीवन मी माझ्या चौकटीत बसवून घेईन.’’ एका चित्रकाराचं द्वंद असं यातऱ्हेने पुस्तकात त्यांचं आयुष्य मांडताना नेमकं टिपलं गेलं आहे. अशातऱ्हेच्या द्वंदातून दीनानाथ दलाल स्वतः जात असले तरी चित्रकार म्हणून ते श्रेष्ठच होते त्यांची ग्वाही या पुस्तकात ठिकठिकाणी मिळते चित्रकार भय्यासाहेब ओंकार त्यांच्याबद्दल लिहीतात- त्या तळपत्या सूर्याची आराधना माझ्या पिढीतले अनेक चित्रकार करत होते. वाटत होते, एक दिवस या गुरुची पावले स्पर्श करायला मिळावीत.’’

चित्रकार म्हणून दलाल श्रेष्ठ होते हे सांगतानाच हे पुस्तक ते माणूस म्हणूनही किती उंच होते हे ही स्पष्ट करते. लेखक अनंत काणेकर, प्रकाशक रा.ज. देशमुख, अनंतराव कुलकर्णी हे त्यांच्या दलालांशी असलेल्या हदय संबंधाबद्दल आत्मियतेने सांगतात. कवी दिलीप चित्रे सांगतात, ‘‘दलालांनी माझी कविता प्रथम मागवून घेऊन छापली... खरं तर ‘शिबाराणीच्या शोधात हे माझं प्रवासवर्णनात्मक पुस्तक लिहीलं जाण्यालाही दलालच जबाबदार मी एखाद्या माणसाच्या सांगण्यावरून पुस्तक लिहायला बसल्याचंहे एकमेव उदाहरण ‘दिलीप चित्रेंच्या या अनुभवावरुन दलाल हे साहित्याच्या बाबतीतही किती साक्षेपी होते हे कळतं.

माधव सातवळेकर यांनी आपल्या एका लेखात मांडलेले विचार या पुस्तकात आहेत. ते म्हणतात साऱ्या हिंदुस्थानात मराठी पुस्तकांचा आकर्षकपणा आणि दर्जा प्रसिध्द आहे. त्यात सिंहाचा वाटा श्री. दलालांचा आहे. या प्रथितयश चित्रकाराचा स्वभाव साधा, निरहंकारी आणि मनमोकळा होता. माणूस म्हणून त्यांची महती त्यांच्या कार्याइतकीच महत्वाची मला वाटते...’’ एक उत्तुंग उंचीचा चित्रकार आणि तेवढ्याच तोलामोलाचा माणूस या दलालांच्या दोन्ही वैशिष्ट्यांचा परामर्ष घेणारे हे पुस्तक दीनानाथ दलाल यांचा आयुष्यपट नेटकेपणाने मांडते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT