St. Cruz Dainik Gomantak
ब्लॉग

गोवा विकासाच्या बाबतीत कसर करु नका; अन्यथा रस्त्यावरती उतरु

सांताक्रुझमध्ये विरोधी पक्षांनी पैशांचा आणि गुंडगिरीचा मते मिळवण्यासाठी वापर केला.

विलास महाडिक

सांताक्रुझमधून लढताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले?

सांताक्रुझमध्ये काँग्रेसचा गड कायम राखताना आमदार रुदॉल्फ फर्नांडिस म्हणाले की, सांताक्रुझमध्ये (St. Cruz) विरोधी पक्षांनी पैशांचा व गुंडगिरीचा मते मिळवण्यासाठी वापर केला. मात्र लोकांनी त्या दबावाला बळी न पडता व ‘मामी’ या नावाने ओळखली जाणारी माझी आई व्हिक्टोरिया फर्नांडिस यांच्या आठवणीने मतदारांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला. माझे मते कमी करण्यासाठी भाजप (BJP) व आपच्या (AAP) उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न केले मात्र ते मतदार माझ्या पाठीशी राहिले. (Opposition parties in St. Cruz used money and bullying to get votes)

‘मामी’ यांच्या अनुपस्थितीत निवडणूक लढवणे कितपत सोपे होते?

अनेक पक्षाचे उमेदवार असल्याने मते विभाजनची भीती होती. व्हिक्टोरिया फर्नांडिस ऊर्फ मामी यांच्याशी या मतदारसंघातील मतदारांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्या कोणत्याही वेळ गरीबांच्या पाठिशी उभ्या राहायच्या त्यामुळे या मतदारसंघातील लोक माझ्या पाठिशी होते. माझी मते कमी करण्यासाठी मतदारांना आमिषे दाखविली गेली तरी मामीचे कट्टर कार्यकर्ते व मतदार माझ्याबरोबर राहिले. प्रचारावेळी मतदारांना भेटताना अजूनही ‘मामी’ची आठवण काढतात. पैशांचा किंवा बळाचा वापर न करता मला मिळालेली मते लोकांचा माझ्यावर असलेला विश्‍वास स्पष्ट करतात, असे रुदॉल्फ यांनी सांगितले.

सांताक्रुझ हा अविकसित राहिलेला मतदारसंघ त्यासाठी काय नियोजन आहे?

पणजीला (Panaji) जोडलेला सांताक्रुझ मतदारसंघ नेहमीच मागासलेला राहिला आहे. या मतदारसंघाच्या आमदाराला आजपर्यंत कधीच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही त्यामुळे विकासात तो मागे राहिला. ‘मामी’ने प्रयत्न केला मात्र इतर आमदारांनी प्रयत्न करण्याकडे दुर्लक्ष केले. रस्ते, पाणी व वीज या मुख्य समस्या या ठिकाणी आहे. या मतदारसंघात असलेल्या शेतजमिनी तसेच वनक्षेत्र असलेल्या जमिनी गिळंकृत करण्यासाठी मला पाडण्याचा बिल्डरांचा डाव होता. त्यासाठी त्यांनी विरोधी उमेदवारांना आर्थिकबळही दिले होते; मात्र लोकांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास साध्य करताना सांताक्रुझचा विकास करण्यासाठीच मी वावरणार आहे, असे रुदॉल्फ फर्नांडिस यांनी आश्वासन दिले.

लोकांकडून मतदारसंघातील कामांबाबत अनेक अपेक्षा असतील त्या विरोधात राहून कशा पूर्ण कराल?

सरकार ते राज्याचे असते. त्यामुळे सरकारने सर्व मतदारसंघात समान विकासकामे करणे त्यांचे कर्तव्यच आहे. मात्र त्यासाठी आमदारानेही ते करवून घेण्यासाठी सरकार व अधिकाऱ्यांच्या मागे लागणे गरजेचे आहे व ते मी करणार आहे. लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होऊ लागल्यास किंवा दुजाभाव केल्यास मी लोकांना घेऊन रस्त्यावर उतरण्यास मागे राहणार नाही, असे रुदॉल्फ यांनी सांगितले.

काँग्रेस सत्तेत नसल्याने विकासकामांत येणारे अडथळे कसे सोडवणार?

राज्यात भाजपविरोधी वातावरण होते. त्यामुळे काँग्रेस सत्तेवर येईल हे स्पष्ट होते; मात्र मतविभाजनाचा फटका बसून त्याचा फायदा भाजपने उठविला. सांताक्रुझ मतदारसंघातील विविध समस्या व प्रश्‍न विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न करून ते करून घेण्यासाठी काँग्रेस (Congress) पक्षातर्फे एकजुटीने लढा देऊ. यापूर्वीही ‘मामी’ने जी आंदोलन उभारली तेव्हा लोकांनीही पाठिंबा दिला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जाणार आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास जनतेला सोबत घेऊन तीव्र लढा दिला जाईल, असे आश्वासन रुदॉल्फ फर्नांडिस यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT