International Day of Sign Languages
International Day of Sign Languages Dainik Gomantak
ब्लॉग

International Day of Sign Languages: खुणांची भाषा समजून घ्या

दैनिक गोमन्तक

आज ‘इंटरनॅशनल डे ऑफ साईन लँग्वेजेस’ (International Day of Sign Languages) खुणांच्या भाषेचा आंतरराष्ट्रीय दिवस! जगात साधारण तीनशे प्रकारच्या खुणांच्या भाषा आहेत आणि जगातले सुमारे सात कोटी वीस लाख कर्णबधिर ही भाषा वापरतात. सुमारे ऐंशी टक्के कर्णबधिर हे विकसनशील देशात राहतात. खरं म्हणजे खुणांची भाषा ही एक पूर्ण भाषा आहे तिचे स्वरूप पूर्णतया नैसर्गिक आहे. ही भाषा कर्णबधिर त्यांच्या दैनंदिन आयुष्यात वापरतातच पण आंतरराष्ट्रीय मंचावर देखील ती औपचारिकरित्या वापरली जाते.

अपंगांच्या हक्क चळवळीने खुणांच्या भाषेला मान्यता दिली आहे आणि या भाषेच्या प्रसारालालाही ती पूर्ण पाठिंबा देते. खुणांच्या भाषेला इतर भाषाप्रमाणेच समान दर्जा आहे आणि साऱ्याच पातळीवरच्या प्रशासनिक व्यवस्थेने या भाषेचा पुरस्कार करावा आणि कर्णबधिरांच्या व्यक्तित्वाचा आदर करावा अशी त्यांची अपेक्षा असते.

पहिला जागतिक ‘खूण भाषा’ दिवस तेवीस सप्टेंबर २०१८ साली आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताहाच्या निमित्ताने साजरा केला गेला. जागतिक कर्णबधिर संघटनेची स्थापना १९५१ साली याच दिवशी झाली होती. खुणांच्या भाषेचे आणि कर्णबधिरांचे जतन हे या संघटनेचे उद्दिष्ट राहिले आहे जेणेकरून कर्णबधिराना मानवी हक्कांपासून पासून कधीच वंचित केले जाऊ शकणार नाही.

कर्णबधिरांना लवकरात लवकर खुणांची भाषा शिकवणे आणि त्यांना त्या अनुषंगाने सर्व सुविधा देणे हे एक हा एक महत्त्वाचा ठराव होता जेणेकरून खुणांच्या भाषेमधून कर्णबधिरांना उत्तम दर्जाचे शिक्षण घेणे शक्य होईल त्याशिवाय या भाषेच्या अंतर्भावाने भाषिक आणि सांस्कृतिक विविधता अधिक समृद्ध होण्याच्या शक्यतांचाही विचार त्यात होता. जगात आज अनेक समृद्ध भाषा आहेत त्यांच्या जतनासाठी आणि जोपासनेसाठी अनेक लोक जीव तोडून काम करत आहेत कारण भाषा ही केवळ एकमेकांशी बोलून, संदेशांचे आदान-प्रदान करणारी गोष्ट नसते.

एकेका भाषे मागे विशाल सांस्कृतिक पट उभा असतो जो त्या त्या समुदायाचा उत्क्रांत प्रवास कथन करत असतो. त्यात आपल्या साऱ्या भावभावनांचे, त्यातून निर्माण झालेल्या मानवी सामंजस्याचे, संघर्षाचे प्रतिनिधित्व तो करत असतो. या साऱ्या भाषांसारखीच खुणांची भाषा आहे. तिचे स्वरूप इतर भाषांसारखे सामान्यपणे लिखित नसले तरी त्यातही मानवी भावनांची आंदोलने आहेत.

माणूस म्हणून आपले अस्तित्व मांडणाऱ्या साऱ्या शक्यता त्या भाषेत आहेत आणि मुख्य म्हणजे ती भाषा या जगातल्या सुमारे सात कोटी इतक्‍या प्रचंड संख्येच्या लोकांची आहे. या भाषेतून आपले जीवन घडणाऱ्या त्या सर्वांना आजच्या ‘खूण भाषेच्या’ जागतिक दिवसाच्या निमित्ताने अभिवादन!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

SCROLL FOR NEXT