Painting  Dainik Gomantak
ब्लॉग

चमत्कार प्रस्थापित करणारा चित्रकार 'रबिन' गोव्यात

दैनिक गोमन्तक

-नितीन कोरगावकर

एकाच वेळी दोन्ही हातांचा आणि पायांचा उपयोग करून वेगवेगळ्या तीन कॅनव्हासवर (3×4 फूट) अवघ्या तीन मिनिटात चित्र साकारून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवणारे व 2011 मध्ये 2×3 फूट आकाराच्या कागदावर तीन मिनिटात तीस स्केचेस साकारून असाच चमत्कार घडवून दोन अद्वितीय जागतिक विक्रमांचे मानकरी ठरलेले गुवाहाटी-आसाम येथील विलक्षण प्रतिभा घेऊन जन्मलेले रबीन बार यांच्या थक्क करणाऱ्या प्रात्यक्षिकांचा  व सिग्नेचर पेंटिंगची किमया अनुभव घेण्याची संधी गोमंतकीय चित्रकार व रसिकांना लाभणार आहे. निमित्त आहे एलोरा आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी, आसाम या सरकारी नोंदणीकृत संस्थेतर्फे 11 ते 14 दरम्यान मेकानिझ पॅलेस(ईएसजी) येथील कला दालनात भरणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे.

विविध दूरदर्शन वाहिन्यांच्या मंचावर अफलातून आपल्या कलेचे सादरीकरण करून रसिकप्रिय बनलेल्या रबीन यांनी, सोनी टीव्ही, कलर्स, ईटीव्ही (मराठी, बांगला,तमिळ, तेलगू),इन ई टीव्ही, झी न्युज अशा वाहिन्यांवरुन चमत्कृतीपूर्ण चित्रकलेचे (Painting) कार्यक्रम करून ख्याती मिळवली आहे.

11 पासून भरणाऱ्या चित्रप्रदर्शनात (Exhibition) ठिकठिकाणचे तीस चित्रकार, शिल्पकार सहभागी होणार असल्याने ,विविध माध्यमातील, वैविद्यपूर्ण कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधी येथील रसिकांना लाभणार आहे. रबीन हे समकालीन वरचनात्मक अशा दोन्ही अंगांनी चित्रे साकारतात. त्यांची सर्जसनशील क्षमता तर अफलातून आहे. कुठल्याही गोष्टीवर ते तात्काळ चित्र रेखाटतात. कुठलाही प्रसंग,क्षण ते सहज टिपतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT