Mapusa City Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Culture: कलाकारांची नगरी 'म्हापसा'....

गोवा मुक्तिपूर्वीपासून देवालयांच्या प्रांगणात कला आणि संस्कृती जोपासली गेली.

दैनिक गोमन्तक

म्हापशाला ‘कलाकारांची नगरी’ असेही म्‍हटले जाते. कला, संस्कृती व साहित्य क्षेत्रात ती प्रथमस्थानी गणली जाते. गोवा मुक्तिपूर्वीपासून देवालयांच्या प्रांगणात कला आणि संस्कृती जोपासली गेली. या माध्यमातून अनेक कलाकार उदयास आले. वेगवेगळ्या मंदिरांतील उत्सवांमधून संगीत, नाटक, कीर्तन असे कार्यक्रम होऊ लागले. त्यातून नवनवे कलाकार निर्माण झाले.

श्री शांतादुर्गा ही म्हापसेकरांची ग्रामदेवता. खोर्ली-म्हापसा येथील ग्रामदेवता श्री सातेरी देवी, म्हापसावासीयांचा रक्षणकर्ता श्री देव बोडगेश्‍‍वर, श्री लक्ष्मीनारायण देवस्थान, श्री दक्षिणमुखी महारुद्र संस्थान, श्री विठोबा-रखुमाई, श्री राष्ट्रोळी, श्री घाटेश्वर, श्री गणेश, श्री साईनाथ अशी अनेक मंदिरे म्हापसा परिसरात आहेत. तेथे वर्षाकाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. भजन, गायन, नाट्यकलेच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन केले जाते. या माध्यमातूनच मोठमोठे कलाकार, संगीतकार, साहित्यिक, नाटककार निर्माण झालेले आहेत.

या कलाकारांमध्‍ये सावकार घराण्यातील रघुवीर सावकार, त्यांचे पुत्र पद्मश्री प्रसाद सावकार, मनोहर सावकार, विनायक सावकार, पं. गोपीनाथ वाळके, श्रीरंग नार्वेकर, गजानन भर्तू, हनुमंत नाटेकर, हनुमंत टोपले, मोतीलाल बांदेकर, श्‍‍यामसुंदर नेवगी, प्रमोद नाईक, रवळनाथ शिरोडकर, हरी ढेकणे, गोविंद हिरवे, शंभू कोरगावकर, अनंत रघुनाथ टोपले, रघुनाथ टोपले, विष्णू लोटलीकर, बाळकृष्ण पेडणेकर, अरविंद चिखलीकर, रमेश वेरेकर, महाबळेश्‍‍वर रेडकर, जीवन मयेकर, दत्ताराम कोरगावकर, रंजन मयेकर,

सूर्यकांत नाईक, रामदास फळारी, उज्‍ज्वला नाटेकर, चंद्रकांत वेर्णेकर, मंगेश नागडे, नामदेव हरमलकर, डॉ. गुरुदास नाटेकर, सुरेंद्र सिरसाट, पांडुरंग कोरगावकर, उल्हास शिरोडकर, गोपाळ राऊत, महेश फळारी, पांडुरंग वराडकर, उल्हास बर्डे, शाबी किटलकर, नारायण राठवड, उदय धामस्कर, कृष्णा आजगावकर, मनोज आजगावकर, हनुमंत आजगावकर, दिवाकर शिंदे, ॲड. राजेश नार्वेकर, शिवदास शिरोडकर, सुरेश शिरोडकर, अमर कवळेकर, मंजिरी टोपले, गोविंद शिरोडकर, गौरेश शिरोडकर, रुद्रेश्वर नाटेकर, उल्हास शिरोडकर, संदीप गवंडळकर, प्रसाद कवळेकर, धर्मा कवळेकर, औदुंबर पांगम, प्रशांत कवळेकर, शोमित मिशाळ, प्रकाश धुमाळ आदींचा समावेश आहे.

नेपथ्य, चित्रकार, रंगभूषाकार

नेपथ्य, चित्रकार व रंगभूषा या क्षेत्रात दिवकर घराण्यातील गोविंद दिवकर, महाबळेश्वर दिवकर, दिवेश दिवकर, विवेक दिवकर, सोनू नाटेकर, भालचंद्र नाटेकर, रुद्रेश नाटेकर, जयंत नाटेकर, प्रमोद नाटेकर, वसंत नाटेकर, अलंकार नाट्यभांडार, महाबळेश्वर मणेरकर, अवधूत शेट नार्वेकर, रमेश मणेरकर यांचा तर साहित्य क्षेत्रात पद्मश्री सुरेश आमोणकर, प्रा. गोपाळराव मयेकर, सुधा आमोणकर, प्रा. अनिल सामंत यांच्‍यासह नवोदित कलाकार आपल्या कलागुणांनी कला व सांस्कृती संवर्धनाचे कार्य करीत आहे. गोव्यात पहिल्‍यापासून म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

Goa Live News: विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

SCROLL FOR NEXT