Panjim Smart City: प्रतीक्षा ‘स्‍मार्ट सिटी’ची; मात्र मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष

समस्‍या, अडचणींचा महापूर : बाह्यविकास आराखड्याअंतर्गतची विकास योजना खोळंबली
Panjim Smart City:
Panjim Smart City: Dainik Gomantak

Panjim Smart City: राज्यात येणारा पर्यटक म्हापसा शहरात प्रवेश केल्यानंतरच आपल्या नियोजितस्थळी मार्गक्रमण करतो. आर्थिकदृष्ट्या हे महत्वाचे शहर अनियोजित विकासाच्या दृष्टीने आजवर दुर्लक्षित दिसतेय. आजही या शहराच्या अनेक मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले असून म्हापसा शहर स्मार्ट बनण्याची प्रतीक्षा शहरवासीयांना तसेच व्यापारीवर्गास आहे.

Panjim Smart City:
Fishing Season In Goa: मासेमारीच्या हंगामाला अजून गती नाहीच; कामगारांची कमतरता....

बाह्यविकास आराखड्याअंतर्गत शहराचा विकास करण्यासाठी योजना हाती घेतली होती, परंतु अनेक अडथळे निर्माण झाल्यानंतर या योजनेला गती प्राप्त होऊ शकली नाही.

बार्देश तालुक्यातील नागरिक आपल्या दैनंदिन कामांसाठी, गरजांसाठी या शहरावर अवलंबून आहेत. बाजारपेठेसह मुख्य शासकीय कार्यालये तसेच उच्च शिक्षणासाठी लोकांची व विद्यार्थ्यांची शहरात वर्दळ पाहायला मिळते. पण आज या शहरावर वाढलेला ताण व त्याच्या विकासाकडे झालेले दुर्लक्ष यातूनच या समस्यांना सध्या तोंड द्यावे लागतेय.

दरम्यान, शहरात नवीन आंतरराज्य बसस्थानक सुरू केले असले तरी ते ‘फुल फ्लॅश’ नाही. सध्या शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. विकासाच्या दृष्टीने हे चांगले पाऊल आहे. मात्र, मनोरंजनबाबत हे शहर इतर शहरांच्या तुलनेत बरेच मागे आहे. श्री हनुमान नाट्यगृह सोडल्यास इथे इतर मनोरंजनाची साधने नाहीत. त्यामुळे शहरवासीयांना पर्वरी किंवा पणजीला जावे लागते. कचरा ही शहरातील मोठी समस्या.

नदी झालीय पूर्णपणे प्रदूषित

मलनि:स्सारण प्रकल्पाची पायाभरणी सुमारे दहा वर्षांपूर्वी केली, पण हे काम संथगतीने पूर्ण झाले. या प्रकल्पात जोडणी करून देण्याचा ठराव पालिकेकडून घेतला, मात्र त्यासही गती प्राप्त होऊ शकली नाही. परिणामी शहरातील प्रमुख नदी असलेली म्हापसा नदी दूषित झाली आहे. कारण आजही शहरातील अनेकजण सांडपाणी थेट गटारात सोडतात. ते पाणी पुढे जाऊन या नदीत मिसळते. त्यामुळे नदीत जलपर्णी व्यापली आहे.

रवींद्र भवनाचे स्वप्न अधुरेच!

मागील दोन दशकांहून अधिक काळ म्हापसा शहर हे रवींद्र भवनाची आतुरतेने वाट बघत आहे. शहरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने किंबहुना भू-संपादनाच्या प्रश्‍‍नामुळे हा प्रकल्प रेंगाळला आहे. मध्यंतरी कला व संस्कृती खात्‍याच्‍या मंत्र्यांनी कुचेली येथील कोमुनिदादच्या जागेची पाहणी केली. त्यानुसार ही जागा रवींद्र भवनासाठी निश्चित केली. परंतु वर्ष उलटत आले तरीही प्रक्रियेचा थांगपत्ता नाही. राजकीय इच्छाशक्तीअभावी म्हापसा शहराचा विकास हा फक्त कागदावरच दृष्टीस पडतो. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

Panjim Smart City:
Mapusa Market: म्हापसा मार्केटचा श्‍‍वास कोंडतोय!

पार्किंग समस्‍या दिवसेंदिवस बनतेय उग्र

म्‍हापसा शहरात वाहन पार्किंगसाठी जागा मिळणे अवघड बनले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पणजी तसेच इतर भागातील लोक म्हापसा शहरात वाहने पार्क करून पुढे बसने प्रवास करतात. त्यामुळे नंतर शहरात कामानिमित्त येणाऱ्यांना जागा उपलब्ध नसते.

बाजारपेठ, बसस्थानक, टॅक्सीस्थानक आदी परिसरात पे-पार्किंगची सुविधा असूनही जागा मिळणे कठीण. यावर तोडगा काढण्यासाठी म्हापसा पालिकेने पे-पार्किंग अधिसूचित करून घेतली आहे. यामुळे शहरातील बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी मदत होईल.

युनियन फार्मसी ते लोजा चिमुलकर, कॅनरा बँक यादरम्‍यानच्‍या रस्त्याच्या कडेला फक्त दुचाकींना तासांनुसार शुल्क आकारले जाईल. त्याचप्रमाणे आराम सोडा बिल्डिंगच्या समोरील रस्त्यावर दुचाकी व चारचाकींसाठी शुल्क आकारले जाईल. मार्केटमधील उसापकर चणा शॉप बिल्डिंग, ‘ब्लॉक ए’समोरील रस्त्याच्या कडेला (आतील लेन) दुचाकींसाठी पार्किंग शुल्क.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com