Makar Sankranti Dainik Gomantak
ब्लॉग

सूर्याचे संक्रमण होणे म्हणजे मकर संक्रांत

शास्त्रीयदृष्ट्या सूर्य मकर राशीत संक्रमण (प्रवेश) करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांत.

दैनिक गोमन्तक

भारतीय सण परंपरेमध्ये सोळा सण महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी मकरसंक्रांत हा महत्त्वाचा सण आहे. शास्त्रीयदृष्ट्या सूर्य मकर राशीत संक्रमण (प्रवेश) करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत (Makar Sankranti) ही आपल्याकडे एक इतर देवतांसारखीच एक देवता कल्पिलेली आहे. तिचं वर्णन असे, ‘षष्टी योजन विस्तीर्ण लांबोष्टी दीर्घ नासिका, एक वस्त्र नवभुजा संक्रांति पुरुषाकृती.’ यंदा संक्रांतीचे वाहन वाघ असून, उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. (Makar Sankranti)

मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होते व हा काळ शुभ समजला जातो. महाभारतात कथा आहेच की कौरव-पांडवांचे युद्ध कुरुक्षेत्रावर चालू असताना महाप्रतापी भीष्माचार्यांवर शिखंडीला पुढे करून अर्जुनाने बाणांचा वर्षाव केला. भीष्माचार्य शरपंजरी पडले. मात्र ते इच्छामरण होते. उत्तरायण सुरू व्हायला उशीर होता. सर्व मरणयातना सोसत त्यांनी स्वतःचे मरण थोपवले व नंतर उत्तरायण सुरू झाल्याबरोबर त्यांनी आपला प्राण सोडला.

इंग्रजी कालगणनेप्रमाणे या उत्सवाचे दिवस निश्चित आहेत. चांद्रमास गणनेप्रमाणे दरसाल या तिथीमध्ये बदल होत असतो. निश्चित दिवस नाही म्हणून मकर संक्रांतिबाबत ‘आडिनाडी संक्रांत’ अशी म्हण पडलेली आहे. 14 जानेवारी हा संक्रांतीचा मुख्य दिवस. संक्रांतीचा आदला दिवस 13 जानेवारी हा भोगी उत्सवाचा (Festival) दिवस तर 14 जानेवारी हा किंक्रांत उत्सवाचा दिवस.

मकर संक्रांती ऋतू परिवर्तनाशी, नक्षत्र परिवर्तनाशी आणि कृषी हंगामाशी जोडली गेली आहे. मार्गशीर्ष महिना हा थंडीचा महिना. सुखदायक महिना. ‘मासा नामु मार्गशीर्षोहम’ अशा शब्दात साक्षात श्रीकृष्णांनी मार्गशीर्ष महिन्याचं महात्म्य कथन केले आहे. हा महिना संपता, पौष महिन्यामध्ये मकरसंक्रांत येते. वातावरणही बदलते. वातावरणातला सळसळता आनंद, हवेच्या झुळकीबरोबर अंगाला स्पर्श करतो. या दिवसातले वारे ‘संक्रांतीचे वारे’ म्हणून प्रसिद्ध आहेच. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असं सांगत संक्रांत येते. तिळगुळाच्या वड्या करणे. तिळावर (sesame) साखरेचा पाक चढवून हलवा करणे, तीळ लावून भाकरी करणे, तीळगूळ वाटणे असे धार्मिक आचार मकर संक्रांतीच्या निमित्ताने आचरणात आणले आणले जातात. याची दोन-तीन कारणे आहेत.

पहिले कारण म्हणजे. सूर्य मकर संक्रांति दिनी मकर राशीत भ्रमण करू लागतो. थंडीच्या दिवसात लहान असलेले, थंडीने आक्रसलेले दिवस संक्रांतीपासून तिळातिळाने मोठे होऊ लागतात. दुसरे कारण, अंग गारठून टाकणाऱ्या थंडीत तीळासारखे उष्ण उपचारी पदार्थ जेवणात असावेत. अंग थंडीने फुटू नये म्हणून तीळ वाटून अंगाला लावणे इत्यादी आरोग्यदायक गोष्टी रितीरिवाज म्हणून पूर्वजांनी व्रतवैकल्यात दाखल केल्या आहेत. तिसरे तिलमहात्म्य,- तीळ हा पदार्थ स्नेहयुक्त, स्निग्ध असा आहे. स्नेहाचे दोन अर्थ: एक तैलयुक्त असा. दुसरा मैत्री. या दिवशी कुटुंबियांना, स्नेहीजनांना ‘तिळगुळ घ्या. गोड बोला’ असे म्हणून तीळ-गूळ वाटून स्नेहवर्धन करावे असा रीतिरिवाज आहे.

तिळगूळ लहानांनी मोठ्यांना द्यायचे नाहीत तर मोठ्यांनी लहानांना द्यायचे. या सणाला सामाजिक मूल्यही लाभलेले आहे. काही कारणाने कोणाकडे मतभेद, वैमनस्य असल्यास ते विसरायचं. व नवा पायंडा म्हणून, ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असं म्हणून मतभेद, वैमनस्य मिटवायचं. तिळाचा स्नेह आणि गुळाची गोडी हे प्रेम वाढवणारे असतात हाही एक विचार यामागे आहे. ज्याप्रमाणे सूर्य संक्रमण करतो त्याचप्रमाणे आपल्याही मनात चांगल्या विचारांचे संक्रमण (बदल) घडवायचं, हाही एक विचार यामागे असतो.

मकर संक्रांत हा हिंदू सुवासिनींनीच्या जीवनातील सौभाग्यदर्शक दिवस. या सणात तिळगुळाइतकेच मृत्तिका कुंभाचेही महत्त्व आहे. ‘सुघटा’त, मातीच्या घड्यात हळकुंडे, तीळ, गहू, तांदूळ, कापूस वगैरे घालून तेव्हा आश्वासने एकमेकांना देतात.

या दिवसात ऋतूत काही बदल होत असतात. शेतात धान्याच्या स्वरूपात धनसमृद्धी विकसित होत असते. मकर संक्रांतीला नवविवाहितेची कौतुक ते किती, तिला सजवणे काय नि नटणे काय! सुवासिनीत्वाची ओळख पटवणारी सौभाग्यचिन्हे म्हणून हळदकुंकू, गळेसर, बांगड्या यांना या सणांमध्ये सांस्कृतिक महत्त्व आहे.

सासर आणि माहेर यांना जोडणारा तसेच भगिनीभाव, मैत्रीभाव, स्नेहभाव वृद्धिंगत करणारा हा महिलांचा (Women) सण. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत, एकमेकींच्या घरी जाऊन तिळगुळ वाटला जातो. जात, धर्म, उच्च-नीच असे सामाजिक व धार्मिक भेदभाव नाहीसे करणाऱ्या या सणामागची ‘स्नेह’ ही समुहभावना महत्त्वाची. यंदाही कोरोनाचे संकट (Corona) समोर उभे आहेच. आरोग्यविषयक (Health) सर्व जबाबदारी आणि खबरदारी घेऊनच मकर संक्रांति साजरी करा. मकर संक्रांतीचा सण गोड व्हावा हीच शुभेच्छा!

- नारायण महाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाईचा धमाका; सर्वात जलद 'अर्धशतक' ठोकून मोडला मोठा रेकॉर्ड! VIDEO

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

SCROLL FOR NEXT