गोव्यामधला जर्मन देवदूत

जर्मनीमधील (Germany) त्याचे मित्रही त्याच्या या इच्छेने प्रभावित झाले. त्यांनीही रूडोल्फलाला पाठिंबा दर्शवला.
Rudolf Schwartz
Rudolf SchwartzDainik Gomantak
Published on
Updated on

एक नम्र मुलगा आपल्या घरच्या बागेत भाजीपाल्याचे पीक घेण्यात आणि कौटुंबिक मालकीच्या बेकरीत आपल्या आईला मदत करायचा. पाच भावंडात तो सर्वात मोठा होता आणि लहानपणातच स्वतंत्रपणे वागायला शिकला होता. चौदाव्या वर्षी त्याला मिळालेल्या सायकलवरून एम्डेनमधील बार्सम या खेडेगावात तो फिरायचा. फुटबॉल आणि रोईंग हे त्याचे आवडते खेळ होते. त्याचे नाव होते, रुडोल्फ श्वार्त्झ.

1990 मध्ये पत्नीसोबत भारताला (India) त्याने पहिली भेट दिली. तो गोव्यात आला आणि गोव्याच्या प्रेमातच पडला. हा जर्मन बँक मॅनेजर, गोव्याचे समुद्र किनारे आणि गोव्याच्या पाककृतींच्या मोहात पडलाच पण या भागात शाळा सोडलेल्या मुलांनी आणि इतल्या बेघरांनी त्याचे लक्ष सर्वात अधिक वेधून घेतले.

वेटर विन्सन डी’सौझाने त्याला शिवोलीतील एका शाळेच्या विद्यार्थ्यांना (Student) स्काऊट करण्यात मदत केली. त्याच्या मनात आता इथल्या अशा मुलांना मदत करायची इच्छा बळावली होती. जर्मनीमधील (Germany) त्याचे मित्रही त्याच्या या इच्छेने प्रभावित झाले. त्यांनीही रूडोल्फलाला पाठिंबा दर्शवला. ज्यावेळी तो पुन्हा गोव्यातला (Goa) परतला तेव्हा त्याने पंधरा ते वीस विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुरेसा निधी गोळा करून आणला होता.

Rudolf Schwartz
Goa: ‘स्वयंपूर्ण मित्रा’ चा स्वयंपूर्णतेसाठी हात

हरमल येथील ‘अवर लेडी ऑफ माउंट कार्मेल’च्या मुख्याध्यापिका स्टेला जेकब यांना तो भेटला. तिने त्याला मदतीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखण्यात मदत केली. ते या मुलांच्या घरी गेले व त्यांच्या पालकांशी बोलले. स्टेलाने नंतर त्यांना आपले पती जेकब मॅथ्यूशी ओळख करून दिली. जेकब हे स्वतः शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी नंतर पालये, पेडणे गावात ‘टर्नर’ आणि ‘इलेक्ट्रिशन’ अशा दोन व्यवसायांचे प्रशिक्षण देणारी संस्था, ‘भूमिका टेक्निकल इन्स्टिट्यूट’ सुरू केली. आज या संस्थेत ‘प्लंबिंग’, ‘वेल्डिंग’, ‘टेलरिंग’, ‘ऑटोमोबाईल मेकॅनिक्स’, ‘होम नर्सिंग’ इत्यादी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर 1997मध्ये शिवोली या गावात तांत्रिक शिक्षण देणारे ‘कीर्ती विद्यालय’ सुरू करण्यात आले.

त्यांनी अभ्यासक्रमात हुशार असणाऱ्या परंतु गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केली. त्यांच्या ‘इंडियन एज्युकेशनल एईड फाऊंडेशन’ने गेल्या तीस वर्षात तीन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली आहे. या फाउंडेशनच्या मदतीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले कितीतरी जण आज डॉक्टर (Doctor) , चार्टर्ड अकाउंटंट, वकील, शिक्षक (Teacher) , अभियंता आणि व्यवसायिक बनून समाजात अभिमानाने वावरत आहेत.

44 वर्षे वयाचा असताना रुडोल्फने या उपक्रमाला सुरुवात केली होती. या उपक्रमाचा पाठपुरावा करण्यासाठी त्याने अनेकदा त्यानंतर स्वत: आपल्या खिशातून पैसे खर्च करून गोव्यात ये-जा केली. आज जर्मनीमधील सुमारे पाचशे जणांचे पाठबळ त्याच्या या उपक्रमाच्या पाठीशी आहे, ज्यात न्यायाधीश आहेत, शिक्षक आहेत, छोटे व्यावसायिक आहेत. जेकब यांच्या नेतृत्वाखाली ही टीम समर्पितपणे गोव्यात आपले कार्य उत्तमपणे पुढे नेत आहे.

2005 साली त्यांनी स्थापन केलेली ‘होम नर्सिंग ब्युरो’ ही संस्था मैलाचा पुढील दगड होता. गरज वाढत गेल्याने मार्ना, शिवोली येथे ‘होली क्रॉस इंडो-जर्मन केंद्रा’ची स्थापना त्यांनी केली. हे आज गोव्यातील अव्वल दर्जाचे तांत्रिक श्रेणीतील सेवा पुरवणारे केंद्र बनले आहे.

गेल्याच आठवड्यात रुडोल्फ श्वार्त्झ यांनी आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. ते म्हणतात, ते जेव्हा गोव्यात (Goa)असतात तेव्हा त्यांना आपल्या देशाचा, जर्मनीचा विचारदेखील मनात अजिबात येत नाही. वंचितांना मदत करायचा त्यांचा उत्साह अबाधित आहे.

-  प्रवीण सबनीस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com