अनेक कलांचा संगम साधणारी माशेलची महाशाला

 

Dainik Gomantak 

ब्लॉग

अनेक कलांचा संगम साधणारी माशेलची महाशाला

आज संस्थेकडे 60 नामांकित गोमंतकीय चित्रकारांच्या चित्रकृती आहेत.

दैनिक गोमन्तक

संगीत (Music) , नाटक (Drama) , चित्र-शिल्प, लोककला आदी कलाक्षेत्रांतील विविध उपक्रम राबवून लक्षवेधी कामगिरी बजावलेल्या ‘महाशाला कलासंगम’, माशेल या संस्थेला 2020 -21 चा उत्कृष्ट सांस्कृतिक संस्थेला दिला जाणारा कला-संस्कृती संचालनालयाचा राज्य पुरस्कार (Award) जाहीर झाला आहे. 1988 साली स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या तीन दशकांच्या काळात अनेक विविध उपक्रम राबवून विविध कलांचा संगम साधला.

प्रतिथयश गोमंतकीय चित्रकार (Painter) शिल्पकार कीर्तिकुमार प्रभू हे या संस्थेचे प्रमुख संस्थापक. त्यांनी आपल्या नवनवीन कल्पनांना संस्थेच्या उपक्रमाद्वारे आकार दिला. संस्थेचे पहिले अध्यक्ष वसंत कुंडईकर, कार्यवाह मधुकर लवंदे व कोषाध्यक्ष देवू चोडणकर यांनी कार्यभार सांभाळला. कीर्तिकुमार प्रभू यांच्या चित्रकलेच्या पहिल्या उपक्रमानंतर अनेक उपक्रम संस्थेने यशस्वी केले. 1988 मध्ये पहिल्यांदाच माशेल येथे चित्रकार (Painter) शिबीर भरवण्यात आले. हा उपक्रम 1993 पर्यंत चालला. या दरम्यान चित्रप्रदर्शनेही भरवण्यात आली.

‘ललित कला अकादमी’, नवी दिल्लीच्या सौजन्याने भारतातील (India) निमंत्रित चित्रकारांचे शिबिर भरवून संस्थेने पुढचे पाऊल टाकले. आज संस्थेकडे 60 नामांकित गोमंतकीय चित्रकारांच्या चित्रकृती आहेत. ख्यातनाम चित्रकार सुहास बहुलकर यांचे चित्रांवर पहिले सप्रयोग व्याख्यान झाले होते तेव्हा त्यांनी थोर साहित्यिक पत्रकार बा. द. सातोस्कर यांचे पोर्ट्रेट साकारले होते. संस्थेने 1990 ते 2000 पर्यंत गणेशोत्सवानिमित्त (Ganesh Festival) भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केली. या रांगोळ्या (Rangoli) पाहण्यासाठी विविध भागातून लोक गर्दी करायचे. 1989 ते 1998 अशी सलग दहा वर्षे ‘महाशाला’ने थोर कलाकारांच्या स्मृतीला वाहिलेली संगीत संमेलने घडवून आणली.

1990 पासून संस्थेतर्फे आषाढी एकादशी निमित्ताने अखिल गोवा भजन स्पर्धा आयोजित केली जात आहे. 1992 साली संस्थेने संगीत विद्यालयाची स्थापना करून शास्त्रीय गायन, तबला, हार्मोनियम, सतार, नृत्य आदींचे वर्ग सुरू केले. पंडित सुधाकर करंदीकर, तुळशीदास नावेलकर, माधव घाटवळ, बाळकृष्ण केळकर, योगराज नाईक आदी नामवंत गुरूंचे या संगीत वर्गाला मार्गदर्शन लाभले. संस्थेने साहित्यिक डॉ. विठ्ठल ठाकूर यांचे ‘संगीत-सरिता’ हे पुस्तक प्रकाशित केले. 1993 संस्थेने भव्य स्वरूपात आकाशकंदील स्पर्धा घेतली. उत्सवाच्या निमित्ताने वेशभूषा स्पर्धा, पारंपारिक लोककलांच्या संवर्धनासाठी ‘धेंडलो’ व ‘सांगोड, स्पर्धा, ‘तालगगडी स्पर्धा’ आयोजित केल्या. 1990 लोककला महोत्सवही (Festival) घडवून आणला. .

त्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता शिबिरे, विद्यार्थी गौरव, कला-संस्कृती खात्याच्या सौजन्याने सांस्कृतिक कार्यक्रमही केले. 1994 मध्ये ज्येष्ठ संगीत शिक्षक पं. सुधाकर करंदीकर गौरव समारंभाचे आयोजन केले. 1998 पासून ‘गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार’ सुरू करून पंडित प्रभाकर चारी, पंडित सोमनाथबुवा चारी, शुभलक्ष्मी मांद्रेकर, पंडित मारुती कुर्डीकर, नाना शिरगावकर यांना ते प्रदान केले. तर संस्थेला दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिलीप धारवाडकर यांना मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले. 2008 पासून ‘कलोपासक पुरस्कार’ सुरू केले. अशाप्रकारे ‘महाशाला’ची वाटचाल अखंड सुरू आहे. संस्थेच्या कलाक्षेत्रातील, संस्कृती क्षेत्रातील या योगदानामुळेच आज संस्थेला राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

SCROLL FOR NEXT