सैरभैर झालेले 'तियात्र'

हल्लीच लोकप्रिय व्यावसायिक ‘तियात्रां’चा महोत्सव पार पडला. त्यात केवळ 9 ‘तियात्रां’चा सहभाग होता.
Drama 

Drama 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

'तियात्रां'चा महत्त्वाचा मोसम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो व तो कार्निवलपर्यंत चालतो. तियात्रिस्ट या मोसमाला ‘दिवाळी सीझन’ असे म्हणतात. व्यावसायिक तियात्र करणाऱ्या नामांकित संस्था या मोसमात आपल्या ‘तियात्रां’चे निदान शंभर तरी प्रयोग करतात. किमान आठ ते दहा अशा संस्था आहेत ज्यांच्या ‘तियात्रां’चे शंभर प्रयोग सहजपणे या काळात होतात.

<div class="paragraphs"><p>Drama&nbsp;</p></div>
'स्त्री'चे आत्मसन्मानाने जगणे..

मारियो मिनेझिस हा गोव्यातला (Goa) एक महत्त्वपूर्ण तियात्र निर्माता आहे. तो स्वतः लेखक (Writer) आणि दिग्दर्शकही (Director) आहे. तो म्हणाला, जेव्हा तो त्याची नवीन निर्मिती जाहीर करतो तेव्हा त्या ‘तियात्रां’चा एकही प्रयोग झालेला नसतानाही त्याच्या त्या ‘तियात्रा’चे सुमारे पंचवीस प्रयोग बुक झालेले असतात. पण या वर्षीच्या त्याच्या ‘देवान घोडले पुण’ या नव्या ‘तियात्रां’चे केवळ पाचच प्रयोग कसेबसे बुक झाले होते. मारियोच्या म्हणण्याप्रमाणे या मोसमात त्याच्यात ‘तियात्रां’चे पंचवीस प्रयोग जरी घडून आले तरी फार झाले!

गोव्यात चर्च आणि गावातल्या आयोजक संस्था ह्या ‘तियात्र’ आयोजित करणाऱ्या महत्त्वाच्या घटक असतात. कोविडच्या (COVID-19) निर्बंधांमुळे यंदा चर्चचे हॉल अजून ‘तियात्रां’ना खुले झालेले नाहीत. तसेच गावातदेखील मंडप वगैरे उभारून तियात्र आयोजित करण्याचा उत्साह अजून गावकऱ्यांत बळावलेला नाही. निवडणुकीच्या (Election) तयारीसाठी ज्या प्रचारसभा चाललेल्या आहेत त्यात लोकांची अफाट गर्दी जमते. तेथे कुठल्याही प्रकारच्या निर्बंधाची व सुरक्षा उपायांची खबरदारी घेतली जात नाही. किंबहुना त्या गर्दीकडे सरकारी आरोग्ययंत्रणा सोयीस्कर दुर्लक्षही करते. परंतु तियात्र किंवा नाटक (Drama) सादरीकरणासाठी मात्र आयोजकांनी सुरक्षा उपायांची योजना करावी अशी सरकारी अपेक्षा असते.

हल्लीच लोकप्रिय व्यावसायिक ‘तियात्रां’चा महोत्सव पार पडला. त्यात केवळ 9 ‘तियात्रां’चा सहभाग होता. गोव्यातल्या गोव्यातले महत्त्वाचे ‘तियात्र’ निर्माते-दिग्दर्शकांनी यंदा ‘तियात्रां’ची निर्मिती केली नसल्यामुळे महोत्सवात त्यांची गैरहजेरी जाणवली. प्रिन्स जेकब, जॉन डिसिल्वा, अनिल-ओल्गा, एल्विस कार्मिन यांच्यासारख्या, गेली कित्येक वर्षे ‘तियात्र’ निर्मितीत सातत्य बाळगून असलेल्या तियात्र निर्मात्यांनी या वर्षी ‘तियात्रां’ची निर्मितीच केलेली नाही.

मारिओ मिनेझिस यानी जरी आपल्या ‘तियात्रां’चे प्रयोग सध्या चालूच ठेवले असले तरी तो म्हणतो, दर प्रयोगागणती त्याला नुकसान सोसावे लागते आहे. नाट्यगृहे त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्केच प्रेक्षकांना प्रवेश देतात. त्यामुळे नुकसान हे ठरलेलेच आहे. तो म्हणतो, पण खरा धोका पुढेच आहे. कारण ‘तियात्रां’त खंड पडल्यामुळे आणि इतर कारणांमुळेही ‘तियात्रां’चे प्रेक्षक ‘तियात्रां’पासून दूर जाऊ शकतात. वास्कोसारख्या ठिकाणी तर एकेकाळी ‘तियात्रां’साठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत घट झालेलीच आहे. पूर्वी एकेकाळी बोगमळो किंवा चिखली येथून प्रेक्षक बस करून तियात्र पाहायला यायचे. ही प्रथाच आता बंद पडलेली आहे. वाईट ध्वनियंत्रणा असलेली नाट्यगृहे हेदेखील याचे कारण होऊ शकते पण सध्याचे हे संकट वेगळेच आहे. ‘तियात्रां’साठी नाट्यगृहेच नाहीत. जी आहेत ती पूर्ण क्षमतेने प्रेक्षकांना सामावून घेऊ शकत नाहीत. त्याशिवाय गावात ‘तियात्र’ सादर करणे अडचणीचे होऊन बसले आहे. या सर्व कारणांमुळे तियात्र कलाकारांचाही उत्साह उणावला आहेच पण प्रेक्षकांवरही या साऱ्या वातावरणाचा प्रभाव नकारात्मकरित्या पडलेला आहे. प्रिन्स जेकब म्हणतो, ‘एक प्रकारची मरगळ आलेली आहे.’

<div class="paragraphs"><p>Drama&nbsp;</p></div>
‘तियात्र’, या अटीमुळे कसा तग धरणार?’

सरकारकडेदेखील ‘तियात्र’च्या या पीछेहाटीवर लक्ष द्यायला वेळ नाही. एक उद्योग म्हणून समर्थपणे चालत असलेल्या या व्यवसायाला गंभीरपणे आधार द्यायची आज गरज आहे. अभिनेते, कलाकार, गायक (Singer), संगीतकार, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, वाहतूकवाले, जाहिरात एजन्सी वगैरे ‘तियात्र’शी संबंधित असलेल्या या विविध घटकांची साधारण 800 ते 1000 गोमंतकीय जुळलेले आहेत. यातले 25 टक्के लोक केवळ ‘तियात्र’वरच आपली उपजीविका सांभाळतात. ‘तियात्र’ नावाचा हा फॉर्म, जो खास गोव्याचा आहे तोच आज धोक्यात सापडला आहे. मारियो आणि प्रिन्स म्हणतात. ‘फुडे किदे जातले, कायच सांगोक जायना!’

- ज्ञानेश मोघे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com