Leadership हे दृष्टी, पुढाकार आणि दृढविश्वासाबद्दल असलेले एक धैर्य  Dainik Gomantak
ब्लॉग

Leadership हे दृष्टी, पुढाकार आणि दृढविश्वासाबद्दल असलेले एक धैर्य

‘नेता म्हणजे जिचा इतरांवर प्रभाव पडतो ती व्यक्ती’

दैनिक गोमन्तक

नेतृत्वाच्या (Leadership) विचारात शूरत्व किंवा मर्दुमकी हे गुणविशेष महत्त्वाचे ठरतात असे आपण पारंपारिकपणे मानतो परंतु आधुनिक मानसशास्त्रीय (Psychological) व समाजशास्त्रीय (Sociological) अभ्यासात नेतृत्वातील व्यक्तींच्या व परिस्थितीच्या परस्पर संबंधांवर भर देण्यात येतो. नेतृत्वाच्या अभ्यासात चार गोष्टींचा विचार सामान्यपणे करण्यात येतो: 1) नेता: त्याची योग्यता; व्यक्तिमत्त्व व अधिकार, 2) अनुयायी: त्यांची योग्यता व अधिकार; 3) परिस्थिती: जिच्या संदर्भात नेता व अनुयायीसंबंध निर्माण होतात आणि 4) गटाचे उद्दिष्ट किंवा कार्य.

समूहात एकजूट राखणे, तो सुस्थिर ठेवणे, समूहाच्या प्रयोजनास पोषक अशी कार्यविभागणी करणे, सर्व व्यक्तींमध्ये सुसंवाद साधणे व सर्वांचे समाधान करणे यांची जबाबदारी नेतृत्वावर (Leadership) असते. समूहावर बिकट प्रसंग आला असता त्यातून निभावून जाण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना आखणे, व्यक्तींना मार्गदर्शन करणे, व्यक्तींच्या आकांक्षांचा समूहाच्या मूलभूत प्रयोजनांशी मेळ घालून समूहाच्या रचनाबंधामध्ये संतुलित परिवर्तन घडवून आणण्यास हातभार लावणे इत्यादींसाठीही नेतृत्वाची आवश्यकता असते.

नेता (Leader) या पदाची व्याख्या अनेक प्रकारे करण्यात येते. ‘नेता म्हणजे जिचा इतरांवर प्रभाव पडतो ती व्यक्ती’, अशी एक व्याख्या करण्यात आली आहे. परंतु अनुयायांचाही प्रभाव नेत्यावर पडत असतो. हे लक्षात घेता, वरील व्याख्या असमाधानकारक ठरते. ‘समूहातील लोकप्रिय व्यक्ती म्हणजे त्या समूहाचा नेता’ ही व्याख्यादेखील समर्पक म्हणता येत नाही. कारण केवळ लोकप्रियता हे नेतृत्वाचे (Leadership) व्यवच्छेदक लक्षण म्हणून पुरेसे नाही. लोकप्रिय असलेली व्यक्ती लोकमान्य असतेच असे नाही. ‘समूहावर जिचे वर्चस्व असते ती व्यक्ती म्हणजे नेता’, ही व्याख्याही समर्पक म्हणता येत नाही. कारण एखाद्या व्यक्तीचे समूहावरील वर्चस्व त्याच्यावर लादलेले असू शकते किंवा समूहातील व्यक्तींच्या भीतीवर व लाचारीवर अधिष्ठित असू शकते. नेत्याचे वर्चस्व हे लोकांनी स्वेच्छेने स्वीकारलेले असते व त्याचे आदेश स्वीकारार्ह मानले जात असतात.

गोव्याचे (Goa) प्रवीण सबनीस हे 'अनलिमिटेड अनलर्निंग'चे (Unlimited Unlearning) प्रवर्तक आहेत. जीवन प्रशिक्षक, प्रभाव वक्तृत्व, व्यवसाय मार्गदर्शक (Guide) म्हणून ते काम पाहतात. नेतृत्वगुणासंबंधानेही त्यांच्या कार्यशाळा सुरू असतात. ते म्हणतात, नेतृत्व (Leadership) म्हणजे एखादे पद नव्हे तर ते एक स्थान असते. असे बरेच नेते आहेत ज्यांनी पद मिळवले नसले तरी त्यांच्या कृतीने ते नेते म्हणून सिद्ध झालेले आहेत. प्रवीण पुढे म्हणतात, तात्काळ अनुयायी लाभणे हे नेतृत्वाचे स्पष्ट माप नव्हे. नेतृत्व हे दृष्टी, पुढाकार आणि दृढविश्वासाबद्दल असलेले एक धैर्य आहे, ज्यामुळे चिरस्थायी वारसा मिळतो आणि हा वारसा हेच नेत्याचे खरे माप आहे.

त्यामुळे तो क्षितिजावर उगवल्यावर, त्याच्याकडे अनुयायी नसले तरी त्यांचे नेतृत्वगुण आपण ओळखतो. अर्थात, नेत्याने आपली वैयक्तिक दृष्टी इतरांमध्ये सन्म्मिलित करणे आणि एका विचाराचा समुह तयार करणे महत्वाचे आहेच परंतु सामूहिक दृष्टी आणि ध्येयाशिवाय लोकाना एकत्र करणे निरर्थक आहे.नेत्याने प्रथम स्वतःमध्ये आणि नंतर इतरांमध्ये परिवर्तन घडवणे महत्त्वाचे आहे. आज तयार होत असलेल्या तथाकथित नेत्यांच्या उदंड मांदियाळीत आपल्याला हेच तर लक्षात घ्यायला हवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT