
मडगाव: मांगोरहिल-वास्को येथे दीपक दळवी यांना जबर मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या अझीम शेख याला २१ जुलै रोजी शिक्षा ठोठावली जाणार आहे.
आरोपीला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने जबर मारहाणीच्या (३२४) कलमाखाली दोषी तरखुनाच्या आरोपाखाली निर्दोष ठरविले होते. आज बुधवारी आरोपीच्या शिक्षेवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायालयाने शिक्षा सुनावणीची पुढील तारीख जाहीर केली.
मांगोरहिल-वास्को येथील चोपडेकर बार अॅण्ड रेस्टॉरंटसमोर १ मे २०१९ साली दीपक दळवी व अझीम शेख या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले होते. त्यात दीपक दळवी हे गंभीर जखमी झाले होते. गोमेकॉत उपचार सुरू असताना ९ मे २०१९ त्यांचा मृत्यू झाला होता. मागाहून पोलिसांनी संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.