Kunbi Saree
Kunbi Saree Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Culture: गाल्फ महोत्सवात कुणबी साडी

गोमन्तक डिजिटल टीम

आसावरी कुलकर्णी:-

अलिकडच्या काळात, गोव्यातील अनेकांनी पारंपारिक कुणबी साडीला एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त करुन देण्यात विविध प्रकारे हातभार लावला आहे आणि तिला वस्त्रप्रावरणांच्या जगात एक ‘ग्लॅमरस’ स्थान मिळवून दिले आहे. कुणबी साडीचे आकर्षक स्वरुप लोकांपर्यत पोहचवण्यात छायाचित्रकार आसावरी निर्मल कुलकर्णी हिचा देखील महत्वाचा वाटा आहे. तिने आपल्या छायाचित्रांमधून ‘कुणबी साडी’ ला महत्वाचा विषय बनवून वेळोवेळी सादर केले आहे.

गोव्यात हल्लीच संपन्न झालेल्या, ‘गोवा आर्ट ॲण्ड लिटरेचर फेस्टीवल’ (गाल्फ)मध्ये, छायाचित्रांमधून, कुणबी साडीला तिने प्रयत्नपूर्वक कसे मांडले आहे याबद्दल आसावरी बोलली. ‘आमचे दायज: कुणबी साडी’ या विषयावर बोलताना, छायाचित्रकला ह्या प्रभावी माध्यमाचा उपयोग करुन या साडीची ओळख ती जगाला करुन द्यायचा प्रयत्न कशी करते आहे हे तिने स्पष्ट केले. आसावरीने ही साडी परिधान केलेल्या कुणबी स्त्रियांचे, तसेच नियोजनपूर्वक घेतलेले इतर स्त्रियांचे फोटो यावेळी सादर केले.

कुणबी साडी नेसताना त्या समुदायातल्या स्त्रिया सहसा ब्लाऊज परिधान करत नसत. विशेष फोटोशूटच्या दरम्यान, इतिहास अभ्यासक हेता पंडीत यांनी फक्त ब्लाऊजशिवाय ही साडी नेसण्यास मान्यता दिली. इतरांनी, त्यांना आवडणाऱ्या पद्‍धतीनुसार ही साडी नेसली. ही साडी नेसणाऱ्या स्त्रियांना, त्या गोव्याच्या एका आकर्षक वारसाचा भाग आहेत ही जाणीव व्हावी आणि या साडीत त्या सुंदर दिसाव्यात हाच आसावरीचा त्या फोटो शूटमागचा उद्देश होता.

गोमंतकीय कुणबी समुदायाबद्दल माहीती देताना आसावरीने सांगीतले, ‘ही कष्टाळू जमात आहे आणि शारीरिक कामे करताना त्यांना आपले हात मातीत मळवण्यात वावगे वाटत नाही. त्यातल्या स्त्रिया सफेद चौकटीच्या रेषा असणाऱ्या लाल रंगाची साडी ब्लाऊजशिवाय नेसत पण अलिकडच्या काळात त्या फुगीर बाह्यांचा सफेद ब्लाऊज घालतात.’

कुणबी साड्यांमध्ये आजच्या काळात इतर रंगही कसे लोकप्रिय बनले आहेत हे देखील आसावरीने आपल्या व्याख्यानात सांगीतले, ‘कुणबी साडीमध्ये नीळा, काळा आणि इतर रंगही अलिकडे आढळतात. काळा रंग हा शोक प्रदर्शनाचा भाग आहे. आपले सत्र आटोपताना आसावरीने काही छायाचित्रे दाखवली, जी तिने 1999 या वर्षी घेतली होती. गोव्याचा लुप्त होणार्या, ‘कुणबी साडी’ या वारसाकडे जगाचे लक्ष जावे म्हणून आसावरी दीर्घकाळ सक्रीय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT