No Parking Zone: अवैधरित्या पार्किंगवर कारवाईची मागणी

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून नो पार्किंग झोन असतानाही वाहने पार्क करणे हे प्रकार वारंवार घडत आहे.
No Parking Zone
No Parking ZoneDainik Gomantak
Published on
Updated on

मांद्रे मतदारसंघातील आगरवाडा, मोरजी, आश्‍वे, मांद्रे, हरमल, पालये या भागातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून नो पार्किंग झोन असतानाही वाहने पार्क करणे, फूटपाथवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी वेगवेगळे साहित्य डम करून ठेवणे, असे प्रकार वारंवार घडत आहे. या प्रकाराला आळा कोण घालणार किंवा त्याच्यावर कारवाई कोण करणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

नुकत्याच झालेल्या मोरजी ग्रामपंंचायत सभेत उपसरपंच पवन मोरजे यांनी काही ठराविक रस्ते नो पार्किंग झोन म्हणून जाहीर केले आहेत. त्या ठिकाणी वाहने पार्क केली तर वाहतूक पोलीस कारवाई करणार, असे सांगितले होते. त्यानुसार पंचायतीने विठ्ठलदास वाडा, न्यूववाडा या ठिकाणी नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले.

No Parking Zone
Vegetable Market: गावठी भाजीला वाढती मागणी, टोमॅटोत चढउतार

तसे फलक त्या ठिकाणी पंचायतीने लावलेले आहेत. ज्या ठिकाणी नो पार्किंग फलक लावलेले आहेत, त्याच ठिकाणी दिवसाचे 24 तास वाहने पार्क करत असल्याचे चित्र दिसत आहे. या वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी गजानन शेटगावकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com