Pernem Punav Goa Dainik Gomantak
ब्लॉग

Kojagari Pournima 2022 : पेडणेची आगळीवेगळी 'पुनाव'

गोव्यात फार पूर्वीच्या काळात प्रचलित असलेल्या गांवकरी व्यवस्थेत असलेल्‍या बलुतेदारीच्या खुणा अजूनही या सणात दिसतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Kojagari Pournima 2022 : अन्य ठिकाणी  ‘कोजागरी’ म्हणून साजरी होणारी पौर्णिमेची रात्र पेडणे येथे मात्र ‘पेडण्याची पुनाव’ बनते.  तिथल्या भगवती आणि रवळनाथ मंदिरात पौर्णिमेदिवशीच सकाळपासून  भाविकतेने आणि जल्लोषाने या ‘पुनवे’च्या साजरी करण्यास सुरुवात होते. पुनाव साजरी करण्यासाठी मंदिरात जय्यत तयारीही सुरू झालेली आहे. देव भूतनाथाची, रवळनाथाची दोन तरंगे आणि देवी भगवतीची मूर्ती सजून तयार आहेत.

‘पेडणेची पुनव’ साजरी करण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली हे नेमके सांगणे कठीण आहे. पेडणे महालातल्या राजघराण्याच्या किर्तीचा हा सण जरी आठवण करून देत असला तरी असे मानले जाते की, हे राजघराणे अस्तित्वात यायच्या आधीही हा सण साजरा केला जायचा. मात्र राजघराण्‍याच्या सहभागातून या सणाला वैभवी उत्साहाची जोड लाभली.

गोव्यात फार पूर्वीच्या काळात प्रचलित असलेल्या गांवकरी व्यवस्थेत असलेल्‍या बलुतेदारीच्या खुणा अजूनही या सणात दिसतात. तेथील कोटकर मंडळी तोरण तयार करतात, तरंगांना कापड (साड्या) नेसवण्याचे काम  गुरव, कुंभार आणि सुतार बांधवांकडे असते तर महार बांधवांकडे ढोल वाजवण्याची जबाबदारी असते. उत्सवात दोन तरंगे नाचतात. एक रवळनाथ देवाचे तर दुसरे देव भूतनाथाचे. भूतनाथाचे स्थान जवळच असलेल्या डोंगरावर आहे मात्र त्याला स्वत:चे मंदिर नाही. स्वतःचे मंदिर नसल्यामुळे त्याचा निवास भगवती मंदिरातच असतो.

असे मानले जाते की देव भूतनाथाच्या तरंगात वाईट शक्तींनी पछाडलेल्यांना, त्या शक्तीपासून मुक्त करण्याची दैवी ताकद असते. या श्रध्देवर विश्‍वास ठेवणारे आणि न ठेवणारेदेखील पुनवेच्या रात्री घडणारा हा विधी पाहण्यासाठी उत्सुकतेने हजर असतात. हजारोंच्या संख्येने तिथे उपस्थित असलेल्या भाविकांच्या मुखातून, जोषात वाजणाऱ्या ढोलाच्या तालावर ‘हर हर महादेव’ हा घोष नकळतपणेच उमटतो. देव भूतनाथाला स्वतःचे मंदिर नसल्याने तो याप्रसंगी आपल्यासाठी मंदिराची मागणी करतो. मंदिर ‘एका रात्रीत व एका वातीत’ बांधले जायला हवे अशी त्याची अट असते. याबाबतीत फार आग्रही असतो. भाविक जसजसा त्याला शांत करायचा प्रयत्न करतात तसतसा तो अधिकच क्रोधित होत जातो.

भूतनाथाला शांत करण्याच्या प्रयासात शेवटी ‘बांदतु’ हे शब्द भाविकांच्या तोंडून उमटतात.   या ‘बांदतू’ या शब्दांमध्ये एक विशेष चलाखी असते. पेडणे भाषेच्या शैलीत उच्चारात उद्‍गारलेल्या या शब्दाचा ‘आम्ही बांधू’ असा अर्थ तयार होतो, तसाच ‘बांध तू’ असा दुसराही त्याचा अर्थ होतो. अशा शाब्दिक विभ्रमात देव भूतनाथाला अडकवले जाते. मात्र आपले देऊळ आपल्याला हवे त्या पध्दतीने बांधले जाईल ही हमी मिळाल्यामुळे देव भूतनाथ शांत होतो व या पुनवेचा जल्लोष समाप्त होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT