ती एका छोट्याशा राज्याची शासक असली तरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राला वाचवण्यासाठी पराक्रमी औरंगजेबाविरुद्ध तिने केलेली अवहेलना ही मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली.
तालिकोटाच्या लढाईत विजयनगर साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर त्यांच्या सरदारानी लहान स्वतंत्र राज्ये स्थापन केली. या छोट्याशा राज्यांना पोर्तुगीज, विजापुरी सैन्य आणि मुघल यांच्याकडून सतत धोका होता.
केलाडी राज्याची स्थापना विजयनगरचे सरदार चौडा नायकाने सन १४९९ मध्ये केली . सन १६६४ मध्ये सोमशेखर नायक केलाडीचा राजा झाला. राणी चन्नम्मा केलाडीचा राजा सोमशेखर नायक यांची पत्नी. राजा सोमेश्वराच्या मदतीने राणी चन्नम्मा यांनी राजकारण, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, साहित्य इत्यादी क्षेत्रातील शिक्षण घेतले. ज्या काळात राजा सोमशेखर नायक गंभीर आजारी पडला तेव्हा राणीने केलडीच्या प्रशासन विभागाचा ताबा घेतला.
राणीने केलडीच्या प्रशासन विभागाचा ताबा घेतला. सिंहासन काबीज करू इच्छिणाऱ्या गद्दारांचा राणीने यशस्वी प्रतिकार केला.असुरक्षित केलाडी राज्याच्या सरदारांमधील सत्तासंघर्षाच्या बातम्यांमुळे विजापूरच्या सुलतानाला केलाडीच्या राज्यावर आक्रमण करण्याची संधी मिळाली.सुरुवातीला सुलतानाने आपला दुत जन्नोपंत याला केलाडी राणीशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवले. भरमे मावुतानेही केलाडी राज्य काबीज करण्यासाठी विजापूरच्या सुलतानासोबत कट रचला असे मानले जाते.
युद्धाच्या तयारीसाठी काही वेळ मिळावा म्हणून राणी चेन्नमाने जन्नो पंतांना तीन लाख रुपये देऊ केले. राणीने संपूर्ण सैन्यासह मौल्यवान संपत्ती आणि इतर सर्व साधनसामग्री बिदनूर किल्ल्यावरून भुवनगिरी किल्ल्यावर हलवण्याचा निर्णय घेतला.
आक्रमण करणार्या सैन्याला त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी ही युक्ती होती. जेव्हा सुलतानचे सैन्य बिदनूर किल्ल्यावर पोहोचले तेव्हा त्यांना तो पूर्णपणे रिकामा दिसला ज्यामध्ये कोणतेही उपयुक्त साधन नव्हते.
भुवनगिरी किल्ल्यावर राणी चन्नम्माने आपल्या संख्येने जास्त सैन्य गोळा केले आणि विजापुरी आक्रमणकर्त्यां विरुद्ध गनिमी कावा चालवण्याच्या आपल्या मंत्री आणि लष्करी सल्ल्याचे पालन केले.आधीच निराश झालेल्या सुलतानाच्या सैन्याने भुवनगिरीकडे कूच केले. जरी त्यांची संख्या जास्त असली तरी, चन्नम्माच्या सैन्याने आक्रमक सैन्यावर हल्ला केला. विजापुरी सैन्याचा पूर्णपणे नाश झाला आणि वाईटरित्या पराभव पण.
युद्धानंतर विजयी राणीने विश्वासघातकी भरमे मावुता आणि जन्नोपंत यांना त्यांच्या शिष्यांसह मृत्युदंड दिला.
सन १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने १६८६ मध्ये विजापूर आणि १६८७ मध्ये गोलकोंडावर आक्रमण केले. त्यानंतर त्याने मराठ्यांना वश करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्यांचा राजा छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात यश मिळविले.
छत्रपती संभाजींच्या मृत्यूनंतर १९ वर्षीय राजाराम यांचा रायगडावर राज्याभिषेक झाला.मुघलांनी रायगडाला वेढा घातला. शूर मराठे छत्रपती राजारामला पळून जाऊ देऊ शकले. त्याने केलाडी किल्ल्यावर पोहोचून राणी चन्नम्माशी आश्रय मागितला आणि जिंजी किल्ल्यावर (तामिळनाडू) सुरक्षित जाण्यासाठी विनंती केली.
छत्रपती राजाराम,शिवाजी महाराजांचा जिवंत राहिलेला एकमेव पुत्र, केलाडीच्या राणीला परिस्थितीची चांगली जाणीव होती आणि तिला हे पण माहीत होते की जर तिने छत्रपती राजारामला आश्रय दिला तर आलमगीर औरंगजेब नक्कीच तिच्या राज्यावर आक्रमण करेल.राणीने धैर्याने राजधर्माचे नियम पाळले आणि औरंगजेबाच्या मुघल सैन्याविरुद्ध युद्धाची तयारी केली.
छत्रपती राजारामने केलाडी सोडल्यावर औरंगजेबाने राणी चन्नम्माला पत्र पाठवून मराठा राजाला त्याच्या स्वाधीन करण्याची मागणी केली. राणीने उत्तर दिले की, छत्रपती राजारामने आधीच तिचे राज्य सोडले आहे, यानंतर मुघलांनी केलाडीवर स्वारी केली.
पण गनिमी कावा व डावपेचांचा अवलंब केलाडी योद्ध्यांनी करून आक्रमणकर्त्यांना ठार मारले व केलाडी सैन्याने घोडे आणि रसद सामग्रीसह मोठ्या प्रमाणात मुघल संसाधने ताब्यात घेण्यात यश मिळवले.राणी चन्नम्माच्या लष्करी डावपेचांमुळे आलमगीरने तिला “मादी अस्वल” म्हटले आहे .
युद्ध काही दिवस चालले आणि त्याचा परिणाम शांतता करारात झाला. असे मानले जाते की केलाडी सैन्याने आक्रमण करणाऱ्या सैन्याच्या अर्ध्याहून अधिक सैन्याला मारले होते.युद्धानंतर मुघल सैन्याने जिंजी किल्ल्याला वेढा घालण्याची योजना आखली.
छत्रपती राजारामने जिंजी किल्ल्यावर पोहोचल्यानंतर राणी चन्नम्माला पत्र लिहून पाठिंब्याबद्दल आभार मानले. ती एका छोट्याशा राज्याची शासक असली तरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राला वाचवण्यासाठी पराक्रमी औरंगजेबाविरुद्ध तिने केलेली अवहेलना ही मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली.
तिने छत्रपती राजारामला रस्ता दिला नसता तर औरंगजेबाने त्याला पकडून मारले असते. या कारणास्तव, छत्रपती शिवाजींनी ज्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ते शक्य केले त्यामध्ये राणी चन्नम्माचे योगदान लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.