जांब
जांब Dainik Gomantak
ब्लॉग

रसरशीत जांब, उष्णतेवरचा सुरस उतारा

दैनिक गोमन्तक

या फळात दात रुतवताना, त्यातल्या भरदार रसरशीतपणामुळे आणि त्याच्या तुरट गोड स्वादामुळे जे सुख दातांच्या कडेवर निर्माण होते ते अवर्णनीय असते. ही फळे अलीकडच्या काळातच बाजारात विक्रीला दिसतात. पूर्वी जांबाच्या फळांनी लगडलेला भार जसा झाडावरून उतरवला जायचा तसे त्याचे वाटप शेजारीपाजारी व्हायचे. झाड कुणाच्याही अंगणात असो पण मुलांनी येता जाता हात उंचावून जांबाचा एखादा घोस तोडावा व त्याचा रसदारपणा तोंडात घोळवत जावे, इतके हे फळ कधीकाळी सहज प्राप्य होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी (आणि वयस्करांसाठीही) उष्णतेवरचा तो एक सु‘रस’ उतारा असायचा.

जांब आता बाजारात आले आहेत. ज्यांच्या जागेत जांबाची झाडे असतील तिथे ती उन्हाळ्याच्या या काळात रसरशीत फळांनी बहरलेली असतील. या फळांच्या रूपाने चवदार पाणीच जणू झाडाला लगडलेले असते. ह्ल्लीच्या काळात एकमेकांचे शेजारी जाणे किंवा मुलांचे हुंदडणे फार कमी झालेले असल्याकारणाने दंगल करून जांब झाडावरून तोडण्यातली मजा फारशी आढळत नाही.

जांब या वनस्पतीचे मोठे झुडूप किंवा वृक्ष 3-12 मी. उंचीपर्यंत वाढतो. पाने साधी, हिरवी गर्द व भाल्यासारखी असून 10—20 सेंमी. लांब आणि 2—4 सेंमी. रुंद असतात. याला फेब्रुवारी महिन्याच्या सुमाराला पांढरी किंवा हिरवट पांढरी, मोहक व सुगंधी फुले येतात. फुलांमध्ये चार दले असून अनेक पुं-केसर असतात. फळे फिकट हिरवी, हिरवी-गुलाबी, जांभळी, रक्तवर्णी किंवा गर्द लाल व गर्द जांभळी अशा वेगवेगळ्या छटांमध्ये असतात. एका वेळी झाडाला सुमारे 700 फळे येतात. फळांचा गर रसाळ, कुरकुरीत, गुलाबाच्या वासाचा व स्वादाचा परंतु कमी गोड असतो. फळांमध्ये करड्या रंगाच्या 1-2 बिया असतात.

जांब फळांपासून मुरंबा व जेली तयार करतात. जांबाची पाने रेचक म्हणून वापरली जातात. पानांपासून मिळविलेले बाष्पनशील तेल स्नायूंच्या दुखण्यावर वापरले जाते. जांबाचे फळ मेंदू आणि हृदय यासाठी शक्तिवर्धक आहे असा आयुर्वेदात उल्लेख आहे.

जांब हा वृक्ष, ‘मिर्टेसी’ कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ‘सायझिजियम जांबोस’ आहे. लवंग, पेरू, मिरी या वनस्पतींचाही याच कुलात समावेश केला जातो. हा वृक्ष मूळचा दक्षिण-पूर्व आशियाच्या उष्ण प्रदेशातील आहे. तो जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी फळांसाठी आणि शोभेसाठी लावलेला दिसून येतो. भारतात केरळमध्ये तो मोठया प्रमाणावर दिसतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT