तलत मेहमूद यांच्या सुरांना उजाळा द्यावा...

जुने हिंदी चित्रपट संगीत हे आपल्या भारतीय संस्कृतीचे एक वैभव आहे.
तलत मेहमूद
तलत मेहमूदDainik Gomantak
Published on
Updated on

शिवराम केरकर

तलत मेहमूदचे मुलायम स्वर कुणाला आवडत नाहीत? गेली पिढी तर त्यांच्या सुरांवर मदहोशपणे मोहित होती. तलत मेहमूद यांच्या सुरांवर असेच मोहित असलेल्यांपैकी एक म्हणजे शिवराम केरकर. तलत महमूद हे त्यांचे अत्यंत आवडते गायक. आईने लावलेल्या रेडिओवर, तलत मेहमूद यांची गाणी ऐकून आपणही ती म्हणावी ही इच्छा अगदी लहानपणी त्यानाही व्हायची. देवाने गोड गळाही दिला होता आणि ती गाण्याचा ते हळूहळू प्रयत्नही करायचे.

त्यांचे कौटुंबिक मित्र शरद गोठिवरेकर तलत मेहमूद यांच्या कार्यक्रमांना तबला-ढोलकीची नेहमी साथ करत. कर्मधर्मसंयोगाने ते शिवराम यांनाही त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला घेऊन जायचे.

तलत मेहमूद
चित्रामधून वास्तविकतेचे दृष्यरचना

आणि अनेकवेळा शरद शिवराम यांना सांगायचे की हे गाणे ऐकत राहा आणि ते शिकून घे. अशाप्रकारे शिवराम यांना तलत मेहमूद यांच्या गाण्याची अधिक आवड निर्माण होऊन ते ती गाणी गायला लागले. मित्रांबरोबर खाजगी कार्यक्रमात त्यांना गाणी म्हणायची यांना फर्माईश होत असे. असेच काही कार्यक्रम व्हायला लागल्यानंतर त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण होऊ लागली की तलत साहेबांच्या गाण्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे करावा. परंतु बँकेत वरच्या हुद्द्यावर काम करत असल्याने आणि वाढत्या व्यापामुळे असा कार्यक्रम करायचा राहिलाच. परंतु निवृत्त झाल्यावर त्यांनी पुन्हा गाण्याचा रियाज चालू केला. आता संधी आल्यानंतर प्रयत्नपूर्वक ते अशा कार्यक्रमाची निर्मिती करत आहेत, ज्यात तलत मेहमूद यांचीच एकल आणि द्वंद्वगीते असतील. त्यांच्या या कार्यक्रमात गोव्याच्या गायिका पद्मजा काकोडकर आणि समीक्षा भोबे या त्यांना साथ करणार आहेत. गोव्याचे संगीतकार विष्णु शिरोडकर यांचा वाद्यवृंद, तसेच मुंबईच्या वादक कलाकारांचा या निर्मितीत समावेश असेल.

तलत मेहमूद
सोसवत नाही हा उन्हाळा, सूर्याच्या तापाने लाहीलाही होते आहे सर्वांना...

जुने हिंदी चित्रपट संगीत हे आपल्या भारतीय संस्कृतीचे एक वैभव आहे. दुर्दैवाने आपली नवी पिढी या संगीतापासून दूर जात एका वेगळ्या प्रकारच्या पाश्चात्य संगीताकडे वळताना दिसत आहे. यात तरूणाईचा दोष नाही कारण जुन्या गीतांचे कार्यक्रमही खूप दुर्मिळ झाले आहेत. अशा वेळी तलत मेहमूदसारख्या थोर कलावंतांची गाणी नव्या पिढीला ऐकवीत व शब्द आणि स्वर यांचा अद्भुत संगम असलेली ही गाणी सादर करून पुन्हा आपल्या जुन्या हिंदी हिंदी चित्रपट संगीताच्या परंपरेला उजाळा द्यावा हा या कार्यक्रमाच्या निर्मितीमागे त्यांचा हेतू आहे.

8 मे रोजी, तलत मेहमूद यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या गीताचा हा कार्यक्रम मिनेझिस ब्रागांझा इन्स्टिट्यूट, पणजी येथे संध्याकाळी सात वाजता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com