पं. जितेंद्र अभिषेकी Dainik Gomantak
ब्लॉग

'Pandit Jitendra Abhisheki' गोव्याचा अभिमान

संगीतकार व संगीतज्ञ म्हणून देशभरात ओळख असणाऱ्या 'जितेंद्र अभिषेकी' यांचा जन्म गोव्यातील मंगेशी येथे झाला.

दैनिक गोमन्तक

शास्त्रीय संगीताची एक वेगळी ओळख निर्माण करणारा हुशार हरहुन्नरी गायक (Singer) , संगीतकार (Musician) व संगीतज्ञ म्हणून देशभरात ओळख असणाऱ्या जितेंद्र अभिषेकी (Pandit Jitendra Abhisheki) यांचा जन्म गोव्यातील मंगेशी (Mangeshi) येथे झाला. जितेंद्र अभिषेकी यांचे कुटुंब मंगेशी येथे मंदिरात सेवेकरी होते. अभिषेकी यांचे वडील(Father), बलुबुवा, पंडित हे कीर्तनकार होते, ज्यांनी संस्कृत आणि संगीतावरील प्रेम जितेंद्र अभिषेकी यांना दिले.

गोव्याचा अभिमान पं. जितेंद्र अभिषेकी

अभिषेकी यांच्या संगीतातील औपचारिक शिक्षणाची सुरुवात शेजारच्या बांदोडा गावातील गिरीजाबाई कालेकर (प्रसिद्ध मराठी रंगमंच गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांची बहीण) यांच्याकडे झाली. जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म सप्टेंबर १९२९ दरम्यान झाला. त्यांचे मूळ नाव गणेश व आडनाव नवाथे; पण मंगेशी देवस्थानातील पूजा व अभिषेक सांगणारे भिकाजी उर्फ बाळुबुवा यांचे पुत्र म्हणून आडनाव अभिषेकी झाले. त्यांचे वडील भिकाजी कीर्तनकार होते. जितेंद्र अभिषेकी यांनी वडिलांना कीर्तनात लहानपणी साथ केल्याने स्वर, ताल, लय व उच्चार यांची त्यांना चांगली समज होती. संगीताबरोबरच संस्कृत भाषाही त्यांना शिकविली.

पं. जितेंद्र अभिषेकी यांना वडिलांनी दिली संगीताची देणगी

अभिषेकी यांनी संगीताचे सुरुवातीचे धडे त्यांच्या वडिलांकडून गिरवले. बांदिवड्याच्या गिरिजाबाई केळेकर या त्यांच्या पहिल्या गुरू होत्या. शालेय शिक्षणासाठी १९४३ साली ते पुण्याला रावाना झाले.मराठी, कोंकणी, पोर्तुगीज, इंग्रजी या भाषा त्यांना ज्ञात होत्या, १९४९ मध्ये ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढे. पुण्यात नरहरबुवा पाटणकर व यशवंतराव मराठे यांच्याकडे ते गाणे शिकायला गेले. त्यांनी त्यांच्या किशोर वयातच संगीतावर घट्ट पकड धरली होती. नंतर ते बेळगावला गेले व तेथे पेटीवादक विठ्ठलराव कोरगावकरांकडूनही त्यांनी संगीताचे काही धडे घेतले.

पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिक्षण

(1952) मध्ये मुंबई येथील भवन्स कॉलेजमध्ये, संस्कृत मधून ते बी. ए. झाले . दरम्यान मुंबई आकाशवाणी केंद्रात कोंकणी विभागात संगीत संयोजक म्हणून ते रूजू झाले. नोकरी करीत असतानाच उस्ताद अझमत हुसेन खाँसाहेब यांच्याकडून गायनाचे मार्गदर्शन घेण्याची सुवर्ण संधी त्यांना मिळाली. 1959 मध्ये शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली या नंतर, ज्येष्ठ गायक जगन्नाथबुवा पुरोहित (गुणीदास) यांच्याकडून त्यांना दीर्घकाळ तालीम मिळाली. त्यांना कारकिर्दीत त्यांना अनेक मानसन्मान लाभले, जितेंद्र अभिषेकी यांना शौनक व मेखला ही दोन अपत्ये असून शौनक अभिषेकी हे देखील संगीतात सेवा बजावत आहेत.

पं. जितेंद्र अभिषेकी यांची कारकीर्द

पं. जितेंद्र अभिषेकी हे गोवा कला अकादमीचे सल्लागार व संस्कारभारतीचे सदस्य होते. चिपळूण येथे झालेल्या ७६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते (१९९५). होमी भाभा पुरस्कार (१९६९), नाट्यदर्पण पुरस्कार (१९७८), पद्मश्री सन्मान (१९८८), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८९), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०), गोमंतक मराठी अकादमी पुरस्कार (१९९२), सूरश्री केसरबाई केरकर पुरस्कार (१९९६), मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कार (१९९६), स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (१९९६), बालगंधर्व पुरस्कार (नाट्य परिषद, १९९७) इत्यादी महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

Best 5G Smartphones: 30 ते 40 हजारांमध्ये मिळवा टॉप ब्रँड्सचे 'हे' 5G स्मार्टफोन, फीचर्स अन् सर्व डिटेल्स वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT