सुरंगीची फुले Dainik Gomantak
ब्लॉग

चैत्राच्या उन्हात मादक सुगंध दरवळत आला सुरंगीचा बहाव...

काही झाडांची फुले आपल्या रंगीबेरंगी रंगाने वसंताच्या आगमनाची चाहुल देतात

दैनिक गोमन्तक

-अनिल पाटील

वसंत ऋतूच्या आगमनासाठी पर्णविरहित नखशिखांत फुललेली झाडे आपल्याला नक्कीच आकर्षित करत असली तरी काही झाडांची फुले मात्र त्यांच्या मादक सुगंधी सुवासाने आसमंत दरवळून टाकतात. त्यात सर्वात वरचा नंबर लागतो तो मादक सुगंधी सुरंगीचा. पश्चिम घाटामध्ये ‘प्रदेशनिष्ठ’ (indemic) असलेल्या वनस्पती वसंत ऋतूत चैत्राच्या दरम्यान फुलू लागतात. काही झाडांची फुले आपल्या रंगीबेरंगी रंगाने वसंताच्या आगमनाची चाहुल देतात तर सुरंगीसारखी फुले त्यांच्यात दडलेल्या सुगंधी सुवासाने सभोवताल दरवळून टाकतात. सुरंगीचे झाड साधारण आंब्याच्या झाडासारखेच मोठे असते. ते 70-80 वर्षे जगते. फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चपर्यंत साधारण दोन बहरात फुलते. यात नर झाडाला बहर येत नाही, मात्र एकूण उगवणाऱ्या झाडात नराचे प्रमाण जास्त असल्याने सुरंगीच्या झाडांच्या वाढीलाही मर्यादा आहे. एकदा झाड बहरू लागले की किमान दोन पिढ्यांच्या आयुष्यात त्याचा सुगंध दरवळत राहतो. 

या झाडाला फुले येण्याची रीतच अगदी वेगळी. झाडांच्या खोडाना, फांद्यांना ही फुले येतात. जणू नववधूने आपल्या पायात पैंजण बांधले आहे तसे हे कळ्यांचे घोस, गडद तपकिरी खोडांवर उमलू लागतात. पिवळसर पांढऱ्या फुलांचा सुगंध आसमंतात दरवळू लागतो. सुरंगीची फुले अत्यंत आकर्षक चार पांढऱ्या पाकळ्यांची, जाडसर गोल आकाराची आणि मध्यभागी पिवळेधमक परागकण ठासून भरलेली असतात. कळ्या मस्त गोल टपोऱ्या, घट्ट असतात. भल्या पहाटे संधीप्रकाशात, त्या झाडावर चढून त्यांना गोळा करावे लागते कारण उन्हे चढली की सकाळी दहानंतर त्या फुलू लागतात.

ज्यांना कळे काढणे शक्‍य नाही, ते झाडाभोवती शेणाचा सडा काढून किंवा मोठे कापड पसरून ठेवतात. पडलेली फुले गोळा करून ती सुकवली जातात. फुलांचा खरा हंगाम वर्षाला केवळ पंधरा दिवसांचा असतो. या झाडांची कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही.

कोकणात आणि आपल्या गोव्यात त्तरी, डिचोली, फोंडा, सांगे, काणकोण तालुक्यात अनेक ठिकाणी सुरंगीची सदाहरित गर्द हिरवी झाडे आता या कळ्यानी लखडून गेली आहेत. त्यांचे वळेसर, वेणी, गजरे ही रस्त्याकडेचे विक्रेते , मंदिरासमोर फुले विकणाऱ्या महिलाकडे आता मिळत आहेत. इंग्रजीत सुरंगीला ‘इंडियन रोझ चेस्टनट’ म्हणतात. तर शास्त्रीय नाव मामेया सुरीगा आहे. आपल्या शेजारील तळकोकणात सध्या मोठ्या प्रमाणात या फुलांचा महोत्सव सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT