कोरगाव : सार्वजनिक गाणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे येथील तळ्यात विसर्जन करण्यात आले  Dainik Gomantak
ब्लॉग

पाच दिवसांच्‍या गणरायाला ‘निरोप’

पणजी फटाक्‍यांची आतिषबाजी, ‘गणपती बाप्‍पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्‍या वर्षी लवकर या’च्‍या जयघोषात पाच दिवसांच्‍या गणपतींचे राज्‍यभरात विसर्जन करण्‍यात आले. गेल्‍या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने आज उसंत घेतल्‍याने गणेशभक्‍तांच्‍या उत्‍साहाला उधाण आले होते.

दैनिक गोमन्तक

आगरवाडात शापोरा

नदीत विसर्जन

मोरजी : आगरवाडा येथील पाच दिवसीय गणपतीचे विसर्जन येथील शापोरा नदीत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. संपूर्ण गावातील गणपतींना मिरवणुकीने दिंडीच्या तालावर वाजत गाजत, फटाक्‍यांच्‍या आतषबाजीत नदी तीरावरील घुमकार मंदिरात एकत्रित करण्यात आले. त्याठिकाणी सामूहिक आरती झाल्यानंतर सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर येथील युवकांनी होड्या एकत्रित बांधून तयार केलेल्या सांगडवर श्री गणेश मूर्ती ठेवून रात्री उशिरा नदीपात्रात विसर्जित करण्यात आल्या. ‘कोरोना’ चे संकट दूर होऊ दे!

शापोरा नदी तीरावर विसर्जनासाठी आणलेले गणपती

पेडणे: पेडणे तालुक्यातील विविध भागांत पाच दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला. कोरोना महामारीच्या पाश्वर्भूमीवर संध्याकाळी सहा वाजल्यापासून गणपती विसर्जनासाठी नेले जात होते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनासाठी गणेशभक्तांची गर्दी जाणवत नव्हती, तसेच मिरवणुकाही नव्हत्या. यावेळी पारंपरिक गाऱ्हाण्यासोबत ‘कोरोना महामारीचे उच्चाटन होऊ दे’, अशी विनवणी गणरायाला करण्यात आली. बहुतांश ठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी टाळण्यात आली.

विसर्जनासाठी गणेशमूर्ती नेताना भाविक आणि जिवरक्षक

वास्‍कोत दिंड्या नाहीत

दाबोळी : पाच दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन करण्यात आले. वास्को येथील वाडे तळ्यात, खारीवाडा, बायणा समुद्रकिनारी संध्याकाळपासून विसर्जनाला सुरुवात झाली. प्रत्येक ठिकाणी जीवरक्षक गणेशमूर्तींचे खोल पाण्यात विर्सजन करीत होते. तसेच वाडे तळ्याच्या मधोमध गणपतीचे विसर्जन करत होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. यंदा दिंड्यांना फाटा देण्यात आला होता. दरम्‍यान, येथील जयरामनगर येथील तथास्तू रिव्हीएरा को. ऑपरेटिव्ह सोसायटीच्‍या गणेशमूर्तीचे वाडे येथील तळ्यात विसर्जन करण्यात आले. यावेळी सोसायटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा केल्याचे माजी नगराध्यक्ष तथा सोसायटीचे सदस्य शेखर खडपकर यांनी सांगितले.

मये येथे गणेश विसर्जन करतांना युवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT