Dengue Dainik Gomantak
ब्लॉग

Dengue: गुनगुना रहे हैं डास, डर लगे हमे गली-गली

डास या किड्याला आता एक प्रकारचे आर्थिक ‘स्टेटस’ मिळाले

दैनिक गोमन्तक

दरवर्षी ऑगस्ट - सप्टेंबर हे महिने आले, की ‘गुनगुना रहे हैं डास, डर लगे हमे गली-गली’ असे गाणं गुणगुणायची वेळ तुमच्या आमच्यावर येते! डास (Dengue) या किड्याला आता एक प्रकारचे आर्थिक ‘स्टेटस’ मिळाले आहे, असे म्हणणे वावगे नाही!

2020मध्ये जागतिक पातळीवर निव्वळ डासांना दूर ठेवण्याच्या औषधांची उलाढाल 4.8 अब्ज डॉलर होती. या औषधांमध्ये कॉइल्स, किंवा स्प्रे आहेतच; पण अंगाला आणि कपड्यांना लावता येतील, अशी उत्पादनेदेखील आहेत. ‘खिचीखिची त्वचा’ झालेल्यांसाठीही काही उत्पादने आहेत. म्हणजेच डास या किड्याने आता औषध या अवकाशातून सौंदर्य उत्पादने या अवकाशातदेखील भरारी घेतली आहे! एवढेच नाही तर टिकाऊ मालाच्या डिझाईनमध्येही डास डोकावताना दिसतात. कोविडपश्चात काळातील वातानुकूल हे निव्वळ स्मार्ट, वीज वाचवणारे आणि आवाजाने नियंत्रित होणारे नाहीत, तर डासांना दूर ठेवणारेही आहेत. बाजारात ‘अल्ट्रासाउंड टेक्नॉलॉजी’चा वापर करून डासांना दूर ठेवणारे टीव्हीदेखील आलेले आहेत. ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने विमा कंपन्यांकरीता नवीन सूचना जाहीर केल्या आहेत.

अनेक विमा कंपन्या डासांनी पसरणाऱ्या रोगांवर स्वतंत्र विमा उत्पादने तयार करत आहेत. ती ‘मशकरक्षक’ या मानकावर आधारित असावीत, अशी सूचना दिली गेली आहे. डासांमुळे मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया हे रोग सार्वजनिक आरोग्याला धोकादायक आहेत. दिल्ली सरकारने ‘दस हफ्ते, दस बजे, दस मिनिट’ या घोषणेतून लोकांना दर आठवड्यातील दहा मिनिटे स्वतःच्या घरात कुठे साठलेले पाणी नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे.

औषधांपासून विम्यापर्यंत सर्व क्षेत्रांत डासांची गुणगुण स्पष्ट आहे. डासांमुळे पसरणारी रोगराई टाळता येण्यासारखी आहे. पण याकरीता डासांच्या विविध रोग पसरवणाऱ्या प्रजातींची संख्या कधी आणि कुठे वाढते आहे, याची माहिती असणे गरजेचे आहे. इथे उपयुक्त असते डासांचे सर्वेक्षण! विविध देशांमध्ये राष्ट्रीय किंवा उपराष्ट्रीय पातळीवरची आरोग्य खाते प्रचलित सांख्यिकी तंत्र वापरून चक्क डासांचे सर्वेक्षण करतात. यात बरेचसे सर्वेक्षणाचे काम मलेरिया पसरवणाऱ्या डासांवर झालेले दिसते. झाडीमध्ये, पाण्याच्या डबक्यांमध्ये, वसाहतींमध्ये सापडणाऱ्या डासांचे तसेच अंडी आणि पिल्लांचे नमुने घेऊन कुठच्या भागात मलेरियाच्या डासांची संख्या वाढू शकेल याचे अंदाज बांधले जातात. डासांच्या सर्वेक्षणाकरिता हल्ली विशिष्ट प्रकारचे सापळेदेखील तयार केले गेलेले आहेत. पण हे सापळे तयार करणे फार अवघड असते. याचे मुख्य कारण हेच, की जगात माहीत असलेल्या 3000पेक्षा अधिक डासांच्या प्रजाती आहेत.

काही प्रजाती रात्री शिकार करतात, काही दिवसा. काही डास अंगाच्या उबेवरून शिकार वेधतात, तर काही कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणावरून. अंडी घालू पाहणारी मादी उब नव्हे तर थंडाव्याच्या शोधात असते. तेथे तिला अंडी घालण्याकरिता पाणी मिळण्याची शक्यता अधिक असते. तर, सापळे कसे तयार करावे, कुठे आणि किती रचावे हा मुळातच खूप अवघड विषय आहे. कुठल्या प्रकारचे सापळे कुठल्या प्रजातींकरिता योग्य आहेत, हे प्रस्थापित करण्याकरिता देखील संख्याशास्त्राचे निकषच वापरले जातात. वेळोवेळी तयार केलेल्या आकडेवारीमुळे अनेक देशांमध्ये शास्त्रीय अंगाने मलेरिया प्रतिबंधक धोरणे राबवली गेली आहेत. 2000 पासून आफ्रिकेमध्ये मलेरियाचे प्रमाण 70 टक्क्यांनी घटले आहे. अशा शास्त्रीय मोहिमांचा या यशात मोठा वाटा आहे.

- डॉ. मानसी फडके

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT