पणती Dainik Gomantak
ब्लॉग

पणती व्यवसायाचे ‘दिवे’ अंधाराखाली!

गोव्यातील पारंपरिक व्यावसायिकांवर संक्रांत: परराज्यातील बाजारपेठेचे आक्रमण

तुकाराम सावंत

डिचोली: दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिव्यांचा सण. पणत्यांची आरास हे दिवाळीचे एक वैशिष्ट्य. नरकासूर प्रतिमा दहन केल्यानंतर घरोघरी पणत्या प्रज्वलीत करूनच दिवाळीचे उत्साही स्वागत करण्यात येते. आजच्या बदलत्या युगातही पणतीचे महत्त्व अद्यापतरी कमी झालेले नाही. तरीदेखील एकेकाळी पणत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या डिचोली शहरातील कुंभारवाडा-बोर्डे येथील पारंपरिक पणती व्यवसायाला आता उतरती कळा लागली असून, हा पारंपरिक व्यवसाय जवळपास लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

पणती व्यवसायामागील अडचणी आणि युवा पिढीची अनास्था आदी काही कारणांमुळे हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असला, तरी कर्नाटकातील खानापूर आणि राजस्थानमधील पणत्यांचे बाजारपेठेतील वाढलेले आक्रमण हेसुध्दा या पारंपरिक व्यवसायाला घरघर लागण्यामागील एक कारण आहे.

पणती

कुंभार म्हटले, की फिरत्या चाकावर मातीला आकार देणारे व्यक्‍तीमत्व डोळ्यासमोर उभे राहते. कुंभार समाजाचे मातीशी नाते जोडलेले आहे. शहरातील कुंभारवाड्यावर कुंभार समाजातील लोकांची जवळपास वीस घरे आहेत. या वाड्यावरील बहुतेक कुंभार बांधव मातीकलेत आहेत. या वाड्यावर गणपतीच्या चित्रशाळाही आहेत. एक काळ असा होता की दिवाळी जवळ आली, की या वाड्यावर पणत्या बनविण्यासाठी लगबग चालायची. बहुतेक कुटुंबे पणत्या बनवत होत्या. पुरुषांबरोबर महिलांचेही हात पणत्या बनवण्याच्या कामात व्यग्र असायचे. एकाच दिवाळी सणावेळी डिचोलीतील कुंभारवाड्यावर दहा हजाराहून अधिक पणत्या बनवण्यात यायच्या. या पणत्या डिचोलीसह म्हापसा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत असे. आमच्या पूर्वजांपासून हा व्यवसाय चालत होता, अशी माहिती ज्येष्ठ माती कलाकार विलास कुंकळ्येकर यांनी दिली.

पणती

भट्ट्याही झाल्या नामशेष...

कुंभारवाडा हा एकेकाळी पणत्या मिळण्यासाठी प्रसिद्ध होता. मात्र, या व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणींमुळे गेल्या सात-आठ वर्षांपासून या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. पणत्या भट्टीत भाजण्यासाठी लागणारी लाकडे मिळणे दुरापास्त झाल्याने आणि माती उपलब्ध होण्यातील अडचण यामुळे बहुतेक माती कलाकारांनी पणती तयार करण्याच्या पारंपरिक व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. त्यातच अनास्था म्हणा किंवा वेळेचा अभाव म्हणा आजची युवा पिढी या पारंपरिक व्यवसायाकडे रस दाखवत नाही. सध्या वाड्यावरील एक-दोन कंटुंबे पणती व्यवसायात असली, तरी पणत्या बनवण्याचे प्रमाण एकदमच कमी आहे. पणत्या आदी मातीच्या कलाकृती भाजण्यासाठी बांधण्यात आलेल्या भट्ट्याही नामशेष झाल्या आहेत. तर आहेत त्यातील काही बंदावस्थेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT