पेडणे : कोरोना महामारीच्या पाश्वर्भूमीवर आलेल्या दिवाळी सणासाठी पेडणे बाजारातील विविध दुकानात आकाश दिवे,पतंग,तसेच आकाश दिवे,पतंग करण्यासाठी आकर्षक रंगातील कागद आदी सामानाने दुकाने नटली आहेत.आकाश दिव्या बरोबरच काही दुकानात नरकासुराचे मुखवटेही विक्रीला आहेत तर या व्यतीरिक्त दुकानात रंगी बेरंगी हार, उटणे, विविध प्रकारचे साबण,उदबत्या,मेणबत्त्या विविध प्रकारच्या मिठाई आदी दुकानावर उपलब्ध आहेत.दीडशे रुपया पासून सहाशे सातशे पर्यंत दरात आकाश कंदील तर मुलांसाठी छोट्या आकाराचा नरकासुर मुखवटा हा तीनशे रुपयापासून तीन ते चार हजारपर्यंत उपलब्ध आहे.
दिवाळी दोन दिवसावर येऊन ठेपली असता या पाश्वर्भूमीवर पेडण्यात आज बाजार भरला.बाजारात गावठी व बाजारू पोहे, गावठी व बाजारु केळी,नारळ, शहाळी, सफरचंद, चिकु, पपया, संत्री, मोसंबी, विविध प्रकारची फुले, पुष्पहार अशा फूल व फळफळावळीबरोबरच मातीच्या पणत्या, उटणे, दिवाळीच्या दिवशी पहाटे पायाने चिरडण्यात येणारी कारीटे, दिवाळीचा फराळ खाण्यापूर्वी औषध म्हणून प्राशन करण्यात येणारी सातिंगण झाडाची साल, केळींच्या पानांच्या पेंढ्या आदी अनेक वस्तू व जिन्नस विक्रीला आलेले आहेत.दिवाळीच्या अगोदर आजही अशाच प्रकारचा बाजार भरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.