Wildlife Dainik Gomantak
ब्लॉग

मानवी कॅमेराने टिपला पक्षी, प्राण्यांचा वत्सलभाव...

‘जीवनाचे आतील आणि बाहेरचे सौंदर्य हे विशिष्ट वेळी टिपण्याची कला म्हणजे फोटोग्राफी.

दैनिक गोमन्तक

मयंका हळर्णकर

कुटुंबवत्सलता’ हा चराचराचाच गुण आहे. पक्षी आणि प्राणी, ‘रक्षाबंधन’, ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’ वगैरे दिवस साजरे करत नसतील कदाचित, पण त्यांच्यातला ‘मातृभाव’ आणि ‘भातृभाव’ माणसांपेक्षा नक्कीच वेगळा नसेल. मयंका हळर्णकर हिच्या कॅमेऱ्याने त्यांच्यामधला हा वत्सलभाव कौशल्याने टिपला आहे. मयंकाने तिच्या कॅमेऱ्यात टिपलेली पक्षांची काही छायाचित्रे गोमंतकच्या वाचकांनी याआधी पाहिलेली आहेत. तिची छायाचित्रे पाहताना, तिचे छायाचित्रणाचे कौशल्य तर जाणवतेच पण तिने आपल्या संयमाची पाहिलेली परीक्षाही लक्षात येते. ही छायाचित्रे तिच्या कॅमेऱ्यात सहज कैद झालेली नसतीलच. तिने वाट पाहिलेली असेल आणि मग एका क्षणी छायाचित्रात दिसत असलेल्या पात्रांनी तिच्या फ्रेममध्ये प्रवेश करून ह्या लोभसवाण्या नाट्याला आकार दिला असेल.

छायाचित्रकार मयंका म्हणते, ‘जीवनाचे आतील आणि बाहेरचे सौंदर्य हे विशिष्ट वेळी टिपण्याची कला म्हणजे फोटोग्राफी. जेव्हा निसर्गसौंदर्य छायाचित्रीत करण्याची वेळ येते, तेव्हा ते छायाचित्रकार आणि विषय यांचे एक प्रकारे मनोमीलन असते, ज्यातून एक परिपूर्ण हास्य चेहऱ्यावर उमलते, ओठांचे कोपरे आणि डोळ्यांच्या कडा एकमेकांशी मेळ खातात. पक्षीण आपल्या लहान पिलांना घास भरवते ते पाहणे आणि कॅमेऱ्यात पकडणे हे आनंददायी असतेच. इटुकल्या खारी आपल्या भावंडांसमवेत एकमेकांबरोबर खेळतात तेव्हा तुम्हाला हसू येतेच.

छायाचित्रकाराने ‘प्रकाश’ पाहिलाच पाहिजे. महान छायाचित्रकार प्रकाशाचे गुणावगुण प्रत्यक्ष अनुभवतात. फोटोग्राफी म्हणजे, आपल्या निरीक्षणशक्तीतून आपण काय पाहू इच्छितो, कसे पाहतो आणि अचूक क्षणी नेमके कशा प्रकारे कॅमेऱ्यात पकडतो यासंबंधीची कला आहे.छायाचित्रण म्हणजे छायाचित्र ‘निर्माण’ करणे!पाहणे, प्रतिमा डोळ्यांसमोर आणणे आणि ती कैद करणे याची क्षमता म्हणजे छायाचित्रण!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT