Youth Trekker Gunjan prabhu Narvekar  Dainik Gomantak
ब्लॉग

Youth Trekker: साद घालती उंच शिखरे!

Youth Trekker: लेह-लडाखमधील चदर ट्रेक सर्वांत वेगाने पूर्ण करणारी गुंजन प्रभू नार्वेकर ही युवा ट्रेकर आहे

Kishor Petkar

Youth Trekker: लेह-लडाखमधील चदर ट्रेक सर्वांत वेगाने पूर्ण करणारी गुंजन प्रभू नार्वेकर ही युवा ट्रेकर आहे आणि या अजोड कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेत तिला सन्मानित केले.

गुंजनला जन्म २ ऑगस्ट २०१० रोजी झाला. लहानपणापासून तिला ट्रेकिंगचे वेड. पालकांनी मुलींची ही आवड जोपासली.

यावर्षी जानेवारीत लेह-लडाखमधील गोठलेल्या झनस्कार नदीवरील ट्रेक मोहीम तीन अवघ्या तीन दिवसांत ११ ते १३ जानेवारी या कालावधीत पूर्ण करून वाहव्वा मिळविली.

ही अजोड कामगिरी साकारली तेव्हा गुंजन १२ वर्षे, ८ महिने आणि २३ दिवसांची होती. चदर ट्रेक सर्वांत कमी वेळेत पूर्ण करणारी युवा ट्रेकर या गुंजनच्या विक्रमावर २५ एप्रिल २०२३ रोजी शिक्कामोर्तब झाले.

पर्वरी येथील ज्ञानविकास स्कूलमध्ये शिकणाऱ्या तेरा वर्षांच्या गुंजन हिने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आगळा पराक्रम साधत साऱ्यांना स्तिमित केले आहे. चदर ट्रेकनंतर गुंजन हिने कांग यात्से-२ (६२५० मीटर), माऊंट रेपोनी मल्लारी-१ (६०९७ मीटर) व माऊंट रेपोनी मल्लारी-२ (६११३ मीटर) ही पर्वतशिखरे पादांक्रांत केली. तिने विश्वविक्रम साधताना ६००० मीटरहून जास्त उंचीचे पर्वत ४९ तासांत (पहिले ते तिसरे शिखर), तर ६२.५ तासांत (बेसकँप ते बेसकँप) चढण्याचा विक्रम नोंदीत केला.

या मोहिमेत तिला वडील पंकज यांची मोलाची साथ लाभली. मरखा खोऱ्यातील पर्वत शिखरे चढण्याच्या अनुभवाविषयी गुंजनने सांगितले, की ‘‘आम्ही मोहिमेवर निघालो तेव्हा हवामान खूपच खराब होते. या कालावधीत तेथे बर्फवृष्टी होण्याची अपेक्षा नव्हती, निरभ्र आकाश अपेक्षित होते. बर्फामुळे मोहीम अवघड बनली. भरपूर बर्फ वाटेत होते. त्यातून वाट काढणे खडतर ठरत होते, सुदैवाने आम्हाला इजा झाली नाही.’’

गिर्यारोहणात अगदी लहान वयात पराक्रम प्रस्थापित केलेल्या गुंजन प्रभू नार्वेकर हिची पराक्रमी कामगिरी अचंबित करणारी आहे. तिला आता जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट साद घालत आहे. काही महिन्यांपूर्वी गुंजन हिने लडाख क्षेत्रातील मरखा खोऱ्यातील तीन शिखरे ६२.५ तासांत सर करण्याचा अनोखा विश्वविक्रम केला. तिच्या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने २०२३ च्या आवृत्तीत घेतली आहे. ट्रेकिंग क्षेत्रातील नवदुर्गेच्या वाटचालीचा थोडक्‍यात परिचय...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT