Gomantakis got into habit of listening to Konkani songs Dainik Gomantak
ब्लॉग

कोकणी गीतांचा ‘डॉल्बी’ आधारस्तंभ

कोकणी गीते ऐकण्याची सवय गोमंतकीयांना लावली

दैनिक गोमन्तक

कोकणी (Konkani) पदांना एक प्रकारचा तोच - तोचपणा आला होता ती नवीन अवतरलेल्या तंत्राकडे पाठ करुनच होती. त्यांचा शिळेपणा घालवण्याची आणि कोकणी गीतांना (Songs) आधुनिक रसशीतपणा कुणीतरी देण्याची अत्यंत आवश्‍यकता होती. हे काम 2000 च्या पहील्या दशकात दीप कारापूरकर यांनी आपल्या वैयक्तिक पातळीवर अत्यंत व्यवसायिक पद्‌धतीने केलं.

ते सांगतात, ‘‘2003 साली मला वाटू लागलं की मी कोकणीसाठी काहीतरी करायला हवं. त्याच सुमारास सिनेमांची मल्टीप्लेक्स संस्कृती आणि डॉल्बी साऊंड भारतात रुजायला सुरुवात झाली होती. कोकणी गीतानांही एक नवा साज, एक नवा आयाम आणि एक नव्या पद्‌धतीचा आवाज द्यावा असे मला तिव्रतेने वाटू लागले. तिच तिच गाणी आणि त्यांची त्याच त्याच पद्‌धतीने होत असलेल्या हाताळणीमुळे, ती ऐकताना एक प्रकारची मरगळ मनात साठत होती. कोकणी गीतांना एक युथफुल स्वरुप द्यायचा प्रयत्न आपण करावा असे सतत वाटत होते.’’

दीप कारापूरकर यांना कोकणी संगीतात तीव्रतीने जे करावसं वाटत होतं ते त्यानंतर त्यांनी फारच सुंदर तऱ्हेनं केलं. श्रीधर कामत यांनी लिहीलेलं आणि शंकर महोदेवन यांनी गायलेलं ‘नील रंगान रंगला’, उदय भेंब्रे यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘साळोरे यो’ हे शान यांनी गायलेलं किंवा साईश पाणंदीकर यांचं ‘तुजे विणे’ ही अशोक पत्की यांनी आधुनिक तंज्ञाने संगीतबद्‌ध केलेली गाणी साऱ्यांच्या ओठावरुन खेळू लागली. कोकणी पदांसाठी दीप कारापूरकर यांनी केलेली नव्या ‘साऊंड’ची योजना यशस्वी ठरली होती. स्वतः गीतकार, संगीतकार नसतानाही आपल्या तीव्र स्वप्नांचा पाठलाग यशस्वीपणे केल्यानंतर दीप एकापरिने कोकणी संगीताचे प्रणेते ठरले. शान, शंकर महादेवन, साधना सरगम, कुणाल गांजावाला, हरीहरन, महालक्ष्मी अय्यर, रीचा शर्मा, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, ऋषीकेश रानडे, सिद्‌धार्थ महादेवन, विनोद राठोड, वैशाली सामंत, जॉली मुखर्जी, बेला सुलाखे या राष्ट्रीय पातळीवर अत्यंत गाजणाऱ्या गायक - गायीकेच्या आवाजांची कोकणी गीतांसाठी त्यांनी योजना केली. आणि कोकणी गीतांना भारदस्त रुप दिले. अर्थात त्याचबरोबर ओलाव, गौतमी हेदे, राजेश मडगांवकर या गोमंतकीय प्रतिभावंत गायकांनाही मातब्बर गायकांबरोबर आपल्या संगीत अल्बममध्ये गौरवपूर्ण स्थान दिले. 2003 ते 2014 सालापर्यंत सुमारे पन्नास मधूर गीतांची निर्मिती दीप कारापूरकर यांनी केली.

गोव्यात कोकणी बोलणारे खूप आहेत परंतू कोकणी वाचणारे, कोकणी सिनेमा पाहणारे किंवा कोकणी गाणी ऐकणारे फारच कमी आहेत. दीप कारापूरकर म्हणतात, ‘‘त्यांना तशी सवयच लागली नाही.’’ पण पदांच्या बाबतीत आपण कोकणी गीते ऐकण्याची सवय गोमंतकीयांना लावली याबद्दल दीप कारापूरकर समाधानी आहेत. स्वतःच्या या कामगिरीबद्दल दीप कारापूरकर यांनी खुश असावे यात त्यांची कोणतीच आत्मश्‍लाघा नाही. कारण गोमंतकीय कवी आणि त्यांच्या काव्य रचनांना दीप यांनी निश्‍चितच सन्माननीय स्थान प्राप्त करुन दिले आहे.

-दीप कारापूरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT